एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
आमच्या घरातील मुलांनी राजकारणात येऊ नये, #माझाट्विटरकट्टा वर सुप्रिया सुळेंचं मत
#माझाट्विटरकट्टा कार्यक्रमात सुप्रिया सुळेंना राजकारण, शिक्षणापासून विविध विषयांवरील प्रश्न विचारण्यात आले.
मुंबई : "आमच्या घरातील मुलांनी राजकारणात येऊ नये, हे माझं वैयक्तिक मत आहे," असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितलं. 'एबीपी माझा'च्या #माझाट्विटरकट्टा या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. सुप्रिया सुळेंच्या या वक्तव्याने नुकतेच राजकारणात सक्रिय झालेले पार्थ पवार यांच्या निवडणूक लढवण्याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार मावळ मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा रंगली होती.
#माझाट्विटरकट्टा कार्यक्रमात सुप्रिया सुळेंना राजकारण, शिक्षणापासून विविध विषयांवरील प्रश्न विचारण्यात आले. 51 मिनिटं चालेल्या या लाईव्ह कार्यक्रमात बरेच प्रश्न विचारण्यात आले होते. त्यापैकी सुमारे 30 ते 35 प्रश्नांची उत्तरं सुप्रियाताईंनी दिली. ट्विटर युझर्सनी या #माझाट्विटरकट्टा ला भरभरुन प्रतिसाद दिला होता.
'राजकारणात येऊ नका'
यावेळी अमित कांबळे नावाच्या एका ट्विटर युझरने, पुढच्या पिढीला सक्रिय राजकारणात काम करताना पाहून वडीलकीचा कोणता सल्ला द्याल, असा प्रश्न विचारला. त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "आमच्या घरातल्या सगळ्या मुलांशी मी बोलत असते आणि मी सगळ्याच मुलांना सांगत असते की राजकारणात येऊ नका. माझ्या मुलांना तर मी रोजच सांगते. आमच्या घरातल्या मुलांना माझा तोच सल्ला असतो की, आम्ही राजकारणात आहोतच, तुम्ही आधी तुमचं करिअर पूर्ण करा. चांगल्या दर्जाचं शिक्षण पूर्ण करा. राजकारणात का यायचं आहे, याची स्पष्टता तुम्हाला असायला हवी. स्वत:ला जे आवडतं ते त्यांनी करावं, या मताची मी आहे. माझ्या मुलांनी राजकारणात येऊ नये हे माझं वैयक्तिक मत आहे. माझ्या मुलांना तर मी हे शंभर वेळा सांगितलं आहे."
राष्ट्रवादीच्या 'त्या' कार्यकर्त्यांना नोटीस पाठवून जाब विचारणार : सुप्रिया सुळे पार्थ पवार राजकारणात सक्रिय खरंतर पार्थ पवार गेल्या काही महिन्यांपासून राजकारणात सक्रिय झालेले दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या बारामतीमधील कार्यक्रमात ते उपस्थित होते. यानंतर ते अनेक राजकीय कार्यक्रमात सक्रिय दिसले. एवढंच नाही तर ते मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चाही रंगली आहे. मात्र मुलांनी राजकारणात येऊ नये, या सुप्रिया सुळेंच्या वक्तव्यानंतर पार्थ यांच्या निवडणूक लढवण्याच्या चर्चांना काहीसा ब्रेक लागल्याचं दिसतं. माझ्या आणि दादामध्ये कधीही अंतर येणार नाही! भविष्यात नेतृत्त्व करण्याची वेळ आली तर पक्षाची धुरा कोण सांभाळेल या प्रश्नावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "पक्ष संघटनेची वेळ आली तर ती धुरा दादाच सांभाळेल. मी दिल्लीतलं काम पाहते, दादा महाराष्ट्रातलं काम सांभाळतो. एक गोष्ट मी जबाबदारीने सांगू इच्छिते की, माझ्या आणि दादामध्ये कधीही, ऑन रेकॉर्ड, कधीही अंतर येणार नाही. आमचं नातं, इतकं प्रेमळ आणि निखळ आहे की एका सत्तेच्या खुर्चीसाठी आम्ही भांडणार नाही. माय ब्लड इज 100 पर्सेंट थिकर दॅन वॉटर."ताई.. आपल्या पुढच्या पिढीला सक्रिय राजकारणात आपण काम करत पाहताना आपण एक वडीलकीचा कोणता सल्ला आपण द्याल...#AskSupriyaSule #माझाट्विटरकट्टा #SupriyaSule #ABPmajha
— Amit Kamble (@AmietKamble) February 18, 2019
पाहा व्हिडीओ यूट्यूब व्हिडीओ@supriya_sule ताई.. भविष्यात ताई आणि दादा दोघांत पक्षनेतृत्व करायची वेळ आली तर दोघापैकी कोण समर्थपणे पक्षधुरा सांभाळेल ?? (एकच उत्तर अपेक्षित )@NCPspeaks#AskSupriyaSule #माझाट्विटरकट्टा
— Anil Shinde (@AnilShinde5678) February 18, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
राजकारण
राजकारण
मुंबई
Advertisement