एक्स्प्लोर

Dharavi Omicron case : धारावीत ओमायक्रॉनचा शिरकाव, आफ्रिकेतून धारावीत आलेला व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह

Dharavi Omicron Latest Updates : धोकादायक देशामधून येणाऱ्या प्रवाशांवर बारीक नजर ठेवली जात असली तरी ओमायक्रॉन (Omicron) संकट देशात येऊन ठेपलं आहे. आता धारावीवर देखील ओमायक्रॉनचं सावट आलं आहे.

Dharavi Omicron case : राज्यात कोरोनाचा नवा विषाणू ओमायक्रॉन (Omicron) हळूहळू हात पसरतोय. धोकादायक देशामधून येणाऱ्या प्रवाशांवर बारीक नजर ठेवली जात असली तरी ओमायक्रॉन संकट देशात येऊन ठेपलं आहे. आता धारावीत देखील ओमायक्रॉनचा शिरकाव झाला आहे.  पूर्व  आफ्रिकेतील टांझानिया येथून आलेल्या एका व्यक्तीला ओमायक्रॉनची लागण झाली आहे.

पूर्व अफ्रिकेतील टांझानिया येथून  आलेला या व्यक्तीचा कोविड रिपोर्ट काही दिवसांपूर्वी पॉझिटीव्ह आला होता. त्याचे स्वॅब जिनोम सिक्वेंसिंगकरता कस्तुरबा रुग्णालयातील प्रयोगशाळेत पाठवला होता. त्याचा अहवाल प्राप्त झाला असून त्याला ओमायक्रॉनची लागण झाली आहे.  कोविड रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर या व्यक्तीला सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे होते. या व्यक्तीला कोणतीही लक्षणे नाहीत. या व्यक्तीच्या निकट संपर्कात आलेल्या व्यक्तींची तपासणी केली गेली आहे. आज धारावीतील एकाला आणि या अगोदर मुंबईतील दोन जणांना ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग झाल्याचे सिध्द झाले आहे . यामुळे महाराष्ट्रातील ओमायक्रॉन विषाणू आढळलेल्या रुग्णांची संख्या आता 11 झाली आहे. 

राज्यात 10  ओमायक्रॉन रुग्णांवर उपचार सुरू

राज्यात 10  ओमायक्रॉन रुग्णांवर उपचार सुरू आहेत त्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झालीय. या नव्या विषाणूबाबत अनेकांमध्ये भितीचं वातावरण आहे. दरम्यान यावर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली असून त्यांनी म्हटलं आहे की, धारावीनं यापूर्वीही शून्य रुग्ण आकडा अनेकदा गाठला आहे. धारावी लढलीय त्यामुळं घाबरुन जाऊ नये, असं त्यांनी म्हटलं आहे. या नव्या व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेनं कडक पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे.  धोकादायक देशामधून येणाऱ्या प्रवाशांवर बारीक नजर ठेवली जात आहे. परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी पाच सूत्री अॅक्शन प्लॅन तयार केला आहे.  

काय आहे अॅक्शन प्लॅन?

  • एअरपोर्ट सीईओ कडून हाय रिस्क देशातून येणाऱ्या प्रवाशांची यादी आपात्कालीन कक्षाला पाठवली जाणार 
  • प्रवाशांची यादी सोपी व्हावी यासाठी सॉफ्टवेअरची निर्मिती 
  • ही आपात्कालीन कक्षाकडून मुंबई महापालिकेच्या 24 वॉर्डतील वॉर रूमला प्रवाशांच्या पत्त्यासह पाठवली जाणार 
  • वॉर रूम मधून प्रवाशांची सतत 7 दिवस संपर्क ठेवण्यात येणार 
  • विलगीकरणाचे नियम प्रवासी नीट पाळत आहे की नाही यांची खबरदारी घेतली जाणार 
  • वॉर रूमने वॉर्डात 10 अॅम्ब्युलेंस तयार ठेवणार
  •  महापालिकेची पथकही बनवली जाणार 
  • महापालिकेची पथक प्रवाशांच्या घरी जावून देखील तपासणी करणार
  •  प्रवासी राहत असलेल्या सोसायटीला पत्र दिलं जाणार 
  • प्रवासी विलगीकरणाचे नियम पाळतो की नाही यावर पालिकेची बारीक नजर असणार 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

संबंधित महत्त्वाच्या बातम्या :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

India Open 2025 Badminton : अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
Beed : कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahakumbh 2025: IIT Bombay चा एरोस्पेस इंजिनिअरकसा बनला साधू? UNCUT कहाणीManjili karad PC : मी मराठा असल्याने जरांगेंनी मला न्याय द्यावा; वाल्मिक कराडच्या पत्नीचं आवाहनWalmik Karad Custody : वाल्मिकला 7 दिवसांची पोलीस कोठडी, वकिलासह समर्थकांचा राडा | VIDEOPM Modi Speech ISKON Temple Navi Mumbai भारताला समजून घेण्यासाठी अध्यात्म समजून घेणं महत्वाचं : मोदी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
India Open 2025 Badminton : अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
Beed : कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यास पोलिसाकडून मारहाण, व्हिडिओ समोर येताच निलंबन
NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यास पोलिसाकडून मारहाण, व्हिडिओ समोर येताच निलंबन
पोरींचा नाद खुळा... टीम इंडियाचा 304 धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली; मैदानावर चौकार, षटकारांची आतषबाजी
पोरींचा नाद खुळा... टीम इंडियाचा 304 धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली; मैदानावर चौकार, षटकारांची आतषबाजी
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देवाभाऊ' म्हणताच मुख्यमंत्री फडणवीस गोड हसले; शिंदेही खुलले, पाहा फोटो
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देवाभाऊ' म्हणताच मुख्यमंत्री फडणवीस गोड हसले; शिंदेही खुलले, पाहा फोटो
Ladki Bahin Yojna Court Case : मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीस सरकारची कोर्टात महत्त्वाची माहिती; जनहित याचिकेवर सुनावणी
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीस सरकारची कोर्टात महत्त्वाची माहिती; जनहित याचिकेवर सुनावणी
Embed widget