एक्स्प्लोर
Advertisement
मुंबईत कोरोना रुग्णसंख्या दिल्लीपेक्षा कमी, मात्र मृत्यूदर दिल्लीहून अधिक
मुंबईतील रुग्णसंख्या दिल्लीपेक्षा जवळपास 10 हजारांनी कमी आहे. मुंबईत सध्या कोरोना रुग्णांची संख्या 76 हजारांच्या पुढे गेली आहे. तर दिल्लीत कोरोनाबाधितांची संख्या 85 हजारांहून जास्त आहे.
मुंबई : एकीकडे मुंबईत सरासरी रुग्णदर कमी होतोय असं म्हणत प्रशासन स्वत:ची पाठ थोपटवून घेत आहे. मात्र असं असलं तरी कोरोनाचं जीवघेणं संकट मुंबईच्या डोक्यावरुन हटत नाहीय. मुंबईतील कोरोनाचा मृत्यूदर हा देशाची राजधानी दिल्लीपेक्षाही जास्त आहे. महत्वाचं म्हणजे दिल्लीपेक्षा मुंबईत कोरोना रुग्ण कमी असूनही मुंबईचा मृत्यूदर मात्र जास्त आहे.
मुंबईत सध्या कोरोना रुग्णांची संख्या 76 हजारांच्या पुढे गेली आहे. तर दिल्लीत कोरोनाबाधितांची संख्या 85 हजारांहून जास्त आहे. मुंबईतील रुग्णसंख्या दिल्लीपेक्षा जवळपास 10 हजारांनी कमी आहे. मात्र मुंबईतला कोरोनाचा मृत्यूदर 5.81 टक्के आहे, तर दिल्लीचा कोरोना मृत्यूदर 3.01 टक्के आहे. महााष्ट्रात सध्याच्या घडीला 1 लाख 69 हजारांपेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्र राज्याचा मृत्यूदर हा 4.47 टक्के इतका आहे. महत्वाचं म्हणजे सर्वाधिक मृत्यूदर असलेल्या देशातील जिल्ह्यांमध्ये 7 जिल्हे महाराष्ट्रातली आहेत. महाराष्ट्रातील सर्वाधिक मृत्यूदर असलेले 7 जिल्हे सोलापूर- 9.99 टक्के जळगाव - 6.85 टक्के मुंबई- 5.25 टक्के नाशिक- 5.56 टक्के औरंगाबाद - 4.60 टक्के उस्मानाबाद- 4.65 टक्के पुणे- 3.36 टक्के ठाणे - 2.05 टक्के coronavirus | मुंबईतील उच्चभ्रू वस्त्यांमध्ये कोरोनाचा वाढता संसर्गअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement