एक्स्प्लोर
राणेंनी शिवसेना सोडू नये म्हणून शेवटपर्यंत त्यांच्याजवळ बसून होतो : गडकरी
मुंबई : नारायण राणे यांनी शिवसेना सोडू नये म्हणून त्यांच्याकडे शेवटपर्यंत बसून होतो, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. नारायण राणे भाजपमध्ये येणार का, या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी राणेंसोबतच्या मैत्रीच्या आठवणींना उजाळा दिला. एबीपी माझाच्या ‘माझा कट्टा’ या कार्यक्रमात नितीन गडकरी यांनी राजकीय आणि वैयक्तिक अशा अनेक मुद्द्यांवर मनमोकळा संवाद साधला.
“राणे माझे मित्र आहेत. कालही होते, आजही आहेत आणि उद्याही राहतील. राणेंनी शिवसेना सोडू नये म्हणून त्यांच्याकडे शेवटपर्यंत बसून होतो. पण ती परिस्थितीच तशी होती. आता त्यांनी कोणत्या पक्षात जावं, हा त्यांचा प्रश्न. ते वेगळ्या मार्गावर आहेत, मी वेगळ्या मार्गावर आहे. त्यांचा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे.”, असे नितीन गडकरी म्हणाले.
गडकरी महाराष्ट्रात येणार का?
“दिल्लीत गेल्यानंतर महाराष्ट्रात पुन्हा यायला तयार नव्हतो. सुरुवातील मी दिल्लीत जायला तयार नव्हतो. मी मनस्वी कार्यकर्ता आहे. दिल्लीचे हॉटेल कधीच आवडले नाहीत. पनीर आणि आलू पराठा वगैरे. दिल्लीचा मला कंटाळाच होता. दिल्लीत कधी राहायचोच नाही. मात्र, दिल्लीत राहिलो, तेव्हा आता महाराष्ट्रात यायचं नाही.”, असे सांगत गडकरींनी महाराष्ट्रात परतण्याची इच्छा नसल्याचे स्पष्ट केले.
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेबद्दल सांगताना गडकरी म्हणाले, “मुंबई-पुणे एक्स्प्रेस बांधण्यासाठी 3600 कोटींचं टेंडर होतं. रिलायन्सचं टेन्डर रद्द केलं. त्यावेळी अनेकजण बोलले. पण मी 1650 कोटीत बांधलं. 2 हजार कोटी रुपये वाचले. आमच्या काळात कामं स्वस्तात झाली आणि चांगली झाली.”
गडकरींच्या विभागाची आर्थिक रचना काय?
“माझं फायनान्शियल बजेट मोठं इंटरेस्टिंग आहे. माझ्या विभागासाठी 65 हजार कोटी माझं भारत सरकारचं बजेट आहे. त्यानंतर 10 हजार कोटी रुपये माझं टोल इन्कम आहे. त्यामुळे हे 10 हजार कोटी रुपये समजा मी 15 वर्षांसाठी मॉनेटाईज केले, तर किमान 1 लाख 80 हजार ते 2 लाख कोटी रुपये कुणीही द्यायला तयार होईल. त्याचसोबत 70 हजार कोटी रुपयांचे बाँड्स काढण्याचे अधिकार मला आहे. माझे 105 प्रोजेक्ट सरकारी पैशांनी पूर्ण झाले आहेत, ते जर मी मॉनेटाईज केले तर सव्वा लाख कोटी माझ्या विभागाला मिळतील. शिवाय, पुढल्या दोन वर्षात दीड लाख कोटी मला बजेटमधून मिळतील. या कामातून पुन्हा टोल लागेल, पुन्हा पैसे मिळतील. त्यामुळे सुमारे 15 लाख कोटींचे मी रस्ते बांधू शकतो.”, असं सविस्तरपणे नितीन गडकरी यांनी त्यांच्या विभागाची आर्थिक बाजू समजावून सांगितली.
VIDEO : नितीन गडकरी यांच्याशी दिलखुलास गप्पा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement