Nitesh Rane : दसऱ्याच्या मुहूर्तावर खरं सांगा, दिशाच्या मृत्यूवेळी तुमचा मुलगा कुठं होता, नितेश राणेंचं उद्धव ठाकरेंना चॅलेंज
दिशा सालियान आणि सुशांतसिंह प्रकरणात तुमचा मुलगा आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) होता की नाही हे सांगण्याची हिम्मत दाखवा", असं आव्हान भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी दिलं.
मुंबई : "दहातोंडी रावण (Ravan Dahan) आज शिवतीर्थावर (Shivtirth) उभं राहून भाषण करणार आहे. संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, आज खरं बोलण्याचा दिवस आहे. त्याप्रमाणे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज खरं बोलावं, दिशा सालियान आणि सुशांतसिंह प्रकरणात तुमचा मुलगा आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) होता की नाही हे सांगण्याची हिम्मत दाखवा", असं आव्हान भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी दिलं. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
नितेश राणे म्हणाले, "आज सकाळी मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी विजय दशमीच्या निमित्ताने मार्गदर्शन केले. त्यांच्या भाषणातून देशाला आणि विश्वाला विचार देण्याचं काम दरवर्षी होतं आणि आज रावण दहनाचे काम होते. आज दहा तोंडी रावण शिवतीर्थावर उभं राहून भाषण करणार आहे. संजय राऊत बोलले की आज खरे बोलण्याचा दिवस आहे. मी उद्धव ठाकरेंना म्हणतोय की तुम्ही खरे बोला. दिशा सालियान आणि सुशांत सिंह प्रकरणात तुमचा मुलगा होता का? तुमचा मुलगा कुठे होता हे सांगण्याची हिंमत दाखवा"
तुमचा कामगार ड्रग्समुक्त कामावर बोलतो, मणिपूरच्या घटनेवर बोलतो पण तुमचा मुलगा निर्दोष आहे का हे बोलण्याची हिंमत शिवतीर्थावरून दाखवा, असं नितेश राणे म्हणाले.
.. तर लोक चप्पलने मारतील
उद्धव ठाकरे हे वडिलांना तेलकट जेवण द्यायचे, गोळ्या वेळेवर देत नव्हत अनेक गोष्टी आहेत ज्या त्यांनी बाळसाहेबांसोबत केल्या हे जर शिवसैनिकांना कळले ना तर त्याला चप्पलने मारतील, असं नितेश राणे म्हणाले.
संजय राऊत यांनी स्वतः चा इतिहास सांगावा. जनसंघ आणि आणीबाणीच्या काळात तू होता का? आज शिवतीर्थावर 2 हजार खुर्च्याही लागल्या नाहीत. मैदानाच्या एका भागात दसरा मेळावा घेतात. आणि मग मैदान ओसंडून वाहतंय हे दाखवणार. तुमच्या टीजरमध्ये तुम्हाला सांगावं लागते आदित्य आणि उद्धवला सांभाळा, असा हल्लाबोल नितेश राणे यांनी केला.
सगळ्यांनी उद्धव आणि आदित्यला सांभाळायचे असे ब्लॅकमेल करुन बोलवून घेतलं. मग महाराष्ट्र कधी सांभाळायचा? असा सवाल नितेश राणे यांनी विचारला.
उद्धव ठाकरे हा दहा तोंडी रावण हमासचे समर्थन, जिहादींचा साथीदार, हिंदू द्वेषी याला दहन करण्याची वेळ आली आहे.2024 ला आमचे सरकार याला दहन करेल, असं नितेश राणे म्हणाले.
आदित्य ठाकरेंचा हा शेवटचा दसरा मेळावा
आदित्य ठाकरे यावर्षी शेवटच्या दसऱ्या मेळाव्याला दिसेल. आदित्य ठाकरे यांच शेवटचा दसरा मेळावा आहे तो देश सोडून जाईल. दिशा सालियन, सुशांत सिंह प्रकरणात अटकेची भीती आदित्य ठाकरेंना झालेली आहे, असा दावा नितेश राणे यांनी केला.
रोहित पवारांना कामधंदे राहिले नाही
नितेश राणे यांनी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यावरही टीका केली. रोहित पवार यांना काम धंदे राहिले नाहीत, स्वतः च्या आयुष्यासाठी ही संघर्ष यात्रा काढत असेल, असा निशाणा नितेश राणे यांनी केला. संघर्षयात्रा काढण्यापेक्षा त्यांनी चारधाम यात्रा काढावी, असं नितेश राणे म्हणाले.
मनोज जरांगे पाटील यांना आवाहन
मनोज जरांगे पाटील यांना 24 तासासाठी आरक्षण हवं की कायमस्वरुपी टिकणारं हवं, असा सवाल नितेश राणे यांनी केला. पिढ्या अन् पिढ्या टिकणारं आरक्षण देणार आहोत, म्हणून कोणतेही अल्टिमेटम न देता एकत्र यावे खांद्याला खांदा लावून आपण टिकणारं आरक्षण मिळवूया, असं आवाहन नितेश राणे यांनी केलं.
संबंधित बातम्या
Nitesh Rane Vs Sanjay Raut : दसरा मेळाव्यावरून ठाकरे गट आणि भाजपमध्ये जुंपली ABP Majha