एक्स्प्लोर

Mumbai News: सतर्क राहा, NIA कडून मुंबई पोलिसांना ई-मेल; मुंबईत धोकादायक व्यक्तीचा वावर असल्याचाही उल्लेख

Mumbai Cirme News: सतर्क राहा, NIA कडून मुंबई पोलिसांना एक ई-मेल पाठवण्यात आला आहे. मुंबईत एका धोकादायक व्यक्तीचा वावर असल्याचा उल्लेखही या पत्रात करण्यात आला आहे.

Mumbai Cirme News : राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएकडून (NIA) मुंबई पोलिसांना (Mumbai Police) सतर्क राहण्याचा ई-मेल (E-Mail) पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईत (Mumbai News) सध्या एका धोकादायक व्यक्तीचा वावर असल्याचा उल्लेख या ई-मेलमध्ये असल्याचं कळत आहे. सरफराज मेमन असं या व्यक्तीचं नाव असून ही व्यक्ती परदेशात प्रशिक्षण घेऊन आलेली असून धोकादायक असल्याने सतर्क राहावं अशा सूचना एनआयएने केल्याचं कळत आहे. त्यानंतर आता राज्यातल्या तपास यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. 

मुंबईत (Mumbai Crime News) एक धोकादायक व्यक्ती फिरत असून त्यासंदर्भात माहिती देणारा ई-मेल एनआयएकडून (NIA Email to Mumbai Police) मुंबई पोलिसांना करण्यात आला आहे. NIA कडून मुंबई पोलिसांनी पाठवण्यात आलेल्या ई-मेलमध्ये सतर्क राहण्याचा आणि सावधगिरी बाळगण्याचा इशारा (Warning to be Alert and be Careful) देण्यात आला आहे. एनआयएकडून ई-मेल आल्यानंतर तपास यंत्रणा (Investigative System) सतर्क झाल्या आहेत. 

सरफराज मेमन नावाची व्यक्ती मुंबईत पोहोचल्याची NIA ची माहिती

NIA ने आपल्या ईमेलमध्ये 'धोकादायक' या शब्दाचा उल्लेख करत मुंबई पोलिसांना सतर्क राहायला सांगितलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, NIA ने आपल्या ई-मेलमध्ये संशयित व्यक्तीचं नाव सरफराज मेमन असल्याचं सांगितलं असून ही व्यक्ती मुंबईत पोहोचली असल्याचं एनआयएने ई-मेलमध्ये म्हटलं आहे. 

संशयित व्यक्तीचं चीन हाँगकाँग, पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण

मुंबईत फिरत असलेली संशयित धोकादायक व्यक्ती इंदूरची राहणारी असून या व्यक्तीने चीन, हाँगकाँग आणि पाकिस्तानमध्ये ट्रेनिंग घेतली आहे. त्यामुळे ही व्यक्ती खूपच धोकादायक ठरु शकते, असंही एनआयएने म्हटलं आहे. एनआयकडून मुंबई पोलिसांना करण्यात आलेल्या ई-मेलमध्ये या संशयित व्यक्तीची कागदपत्रही पाठवली आहेत. मेलसोबत NIA ने आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट आणि एलसी कॉपीही जोडल्या आहेत. दरम्यान, यासंदर्भात मुंबई पोलिसांनी इंदूर पोलिसांसोबतही संवाद साधत सविस्तर माहिती दिली आहे. 

मुंबईतील सुरक्षा वाढवली

मुंबई कायमच दहशतवाद्यांचे लक्ष्य असतं. 26/11 दहशतवादी हल्ल्यानंतर गेल्या काही वर्षात आपल्या सुरक्षा यंत्रणांनी मुंबईसारख्या शहरांचं दहशतवादी हल्ल्यांपासून संरक्षण केलं आहे. मुंबईतील प्रमुख धार्मिक स्थळे, पंचतारांकित हॉटेल, महत्त्वाची सरकारी आणि बिगर सरकारी स्थळांवर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. ताजमहाल पॅलेस हॉटेल, ताज लॅण्ड्स एंड हॉटेल, सिद्धिविनायक मंदिर, बाबुलनाथ मंदिर, मुंबादेवी मंदिर, हाजीअली दर्गा, मुंबई स्टॉक एक्स्चेंज, मंत्रालय, मुंबईसह उच्च न्यायालय आणि इतर महत्वाच्या आस्थापनांसह सुरक्षा वाढली आहे.

हेही वाचा

Terror Threat In Mumbai: NIA ला ई-मेलद्वारे मुंबईवर हल्ला करण्याची धमकी, देशभरात अलर्ट

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget