एक्स्प्लोर

उड्डाणपुलासाठी राष्ट्रवादी आक्रमक, नवाब मलिक जेसीबीवर चढले, आश्वासनानंतर आंदोलन मागे

आज लोकार्पण करणारच या ठाम भूमिकेवर आमदार नवाब मलिक होते. त्यामुळे पुलाचे उद्घाटन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे हजारो कार्यकर्ते चुनाभट्टी येथील एव्हरार्ड नगर आणि या परिसरात जमा झाले होते. मात्र त्यापूर्वीच प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

मुंबई : मुंबईची वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मुंबईत नवे उड्डाणपूल बांधण्यात आले आहेत. यापैकीच एक पूर्व द्रुतगती मार्गावरून बीकेसीला जाणाऱ्या नवा उड्डाणपुलाचे कामही अंतिम टप्प्यात आहे. परंतु हा उड्डाणपूल फक्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यासाठीच खुला केला जात नसल्याचा आरोप करीत राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित आमदार नवाब मलिक यांनी या मार्गावर आंदोलन केले. या वेळी पोलिसांचा मोठा फौजफाटा या ठिकाणी तैनात करण्यात आला होता. यावेळी मुंबईतून शेकडो राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते. या पुलाच्या सुरुवातीला तयार करण्यात आलेली भिंत जेसीबीने तोडून टाकून हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचा प्रयत्न मलिक यांनी जेसीबी वर चढून केला. यावेळी नवाब मलिक यांची समजूत काढण्यासाठी पोलीस अधिकारी आणि एमएमआरडीएचे अधिकारी देखील दुसऱ्या जेसीबी वर चढले आणि त्यांची समजूत काढली. अखेर आठ दिवसात हा पूल काहीही करून सुरू करणार असे आश्वासन मिळाल्यानंतर राष्ट्रवादीने हे आंदोलन मागे घेतले. एव्हरार्ड नगर येथे सकाळी नवाब मलिक यांनी आंदोलनाला सुरुवात केली. यावेळी इथे आणण्यात आलेल्या जेसीबी मशीनवर नवाब मलिक आणि त्यांचे कार्यकर्ते उभे होते, त्याच मशीनवर येवून एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी एमएमआरडीएच्या आयुक्तांना फोनवरून बोलून हे आश्वासन दिले. आज लोकार्पण करणारच या ठाम भूमिकेवर आमदार नवाब मलिक होते. त्यामुळे पुलाचे उद्घाटन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे हजारो कार्यकर्ते चुनाभट्टी येथील एव्हरार्ड नगर आणि या परिसरात जमा झाले होते. मात्र त्यापूर्वीच प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते चुनाभट्टी येथील या पूलाच्या जवळ येण्यापूर्वीच त्यांना प्रियदर्शनीच्या पुलाजवळ अडवण्यात आले.  त्याच ठिकाणी मलिक यांना हे आंदोलन मागे घ्यावे, आम्ही येत्या आठ दिवसात हा पूल सुरू करू असे आश्वासन देण्यात आले. त्यानंतर आमदार नवाब मलिक यांनी आपण हे आंदोलन मागे घेत असल्याचे यावेळी जाहीर केले. चुनाभट्टी येथील एव्हरार्ड नगर ते एमएमआरडीए या पट्ट्याला जोडणारा हा पूल आघाडी सरकारच्या काळात मंजूर करण्यात आला होता. त्यावेळी त्याची काही कामे सुरू झाली होती परंतु मागील पाच वर्षात या पुलाचे काम अत्यंत संथ गतीने झाले. विधानसभा निवडणुकीच्या काही दिवस अगोदर या पुलाचे पूर्ण काम झाले होते, मात्र त्याचे उद्घाटन झाले नसल्याने आमदार नवाब मलिक यांनी या पुलामुळे स्थानिकांना प्रचंड वाहतुकीचा त्रास होत असल्याने आपण याचे उद्घाटन करणार असल्याचा इशारा दिला होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Baba Siddique Death Update| बाबा सिद्दीकांचा गोळीबारात मृत्यू, लिलावती रुग्णालयाबाहेर सुरक्षा वाढवली
Baba Siddique Death Update| बाबा सिद्दीकांचा गोळीबारात मृत्यू, लिलावती रुग्णालयाबाहेर सुरक्षा वाढवली
Baba Siddique Shot Dead: देवीच्या मिरवणुकीतील फटाक्यांच्या आवाजात बाबा सिद्दिकींवर फायरिंग, गोळी कारच्या बुलेटफ्रुफ काचेत घुसली
देवीच्या मिरवणुकीतील फटाक्यांच्या आवाजात बाबा सिद्दिकींवर फायरिंग, गोळी कारच्या बुलेटफ्रुफ काचेत घुसली
Baba Siddique Shot Dead in Mumbai: बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर देवेंद्र फडणवीस तातडीने लीलावती रुग्णालयात, सिद्दिकींच्या समर्थकांची घोषणाबाजी
बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर देवेंद्र फडणवीस तातडीने लीलावती रुग्णालयात, सिद्दिकींच्या समर्थकांची घोषणाबाजी
Baba Siddique Firing: बाबा सिद्दिकींना 15 दिवसांपूर्वी धमकी, वाय दर्जाची सुरक्षाही दिली, पण घात झालाच
बाबा सिद्दिकींना 15 दिवसांपूर्वी धमकी, वाय दर्जाची सुरक्षाही दिली, पण घात झालाच
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis on Baba Siddque | बाबा सिद्दीकींचा गोळीबारात मृत्यू, फडणवीस थेट लीलावती रुग्णालयातBaba Siddique Dead Update | बाबा सिद्दीकींच्या हत्या प्रकरणात बिश्नाई गँगच्या अॅगलने पोलिसांचा तपास सुरुEknath Shinde On Baba Siddique Dead | बाबा सिद्दीकींच्या आरोपींना कडक कारवाई होईल- एकनाथ शिंदेBaba Siddique Death Update| बाबा सिद्दीकांचा गोळीबारात मृत्यू, लिलावती रुग्णालयाबाहेर सुरक्षा वाढवली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Baba Siddique Death Update| बाबा सिद्दीकांचा गोळीबारात मृत्यू, लिलावती रुग्णालयाबाहेर सुरक्षा वाढवली
Baba Siddique Death Update| बाबा सिद्दीकांचा गोळीबारात मृत्यू, लिलावती रुग्णालयाबाहेर सुरक्षा वाढवली
Baba Siddique Shot Dead: देवीच्या मिरवणुकीतील फटाक्यांच्या आवाजात बाबा सिद्दिकींवर फायरिंग, गोळी कारच्या बुलेटफ्रुफ काचेत घुसली
देवीच्या मिरवणुकीतील फटाक्यांच्या आवाजात बाबा सिद्दिकींवर फायरिंग, गोळी कारच्या बुलेटफ्रुफ काचेत घुसली
Baba Siddique Shot Dead in Mumbai: बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर देवेंद्र फडणवीस तातडीने लीलावती रुग्णालयात, सिद्दिकींच्या समर्थकांची घोषणाबाजी
बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर देवेंद्र फडणवीस तातडीने लीलावती रुग्णालयात, सिद्दिकींच्या समर्थकांची घोषणाबाजी
Baba Siddique Firing: बाबा सिद्दिकींना 15 दिवसांपूर्वी धमकी, वाय दर्जाची सुरक्षाही दिली, पण घात झालाच
बाबा सिद्दिकींना 15 दिवसांपूर्वी धमकी, वाय दर्जाची सुरक्षाही दिली, पण घात झालाच
Baba Siddique Firing: वांद्र्याच्या खेरवाडी सिग्नलवर काय घडलं, बाबा सिद्दिकींवर गोळीबार कसा झाला?
तीन गोळ्या, तीन आरोपी, बाबा सिद्दिकी यांच्यावर हल्ला, नेमकं काय घडलं?
Uddhav Thackeray Dasara Melava : चंद्रचूडसाहेब अजूनही वेळ गेलेली नाही, तारखांवर तारखा आणि भाषणे देऊ नका; उद्धव ठाकरेंचा 'सर्वोच्च' टोला!
चंद्रचूडसाहेब अजूनही वेळ गेलेली नाही, तारखांवर तारखा आणि भाषणे देऊ नका; उद्धव ठाकरेंचा 'सर्वोच्च' टोला!
Ind vs Ban: संजूचे 8, सूर्या 5, रियान-हार्दिकचे 4-4 अन् रिंकूचा 1 षटकार; भारताचे तुफानी 22 छक्के
Ind vs Ban: संजूचे 8, सूर्या 5, रियान-हार्दिकचे 4-4 अन् रिंकूचा 1 षटकार; भारताचे तुफानी 22 छक्के
Uddhav Thackeray Dussehra Rally : भाजपला राजकारणातील खांदा द्यायचा आहे, ही वृत्ती संपवावीच लागेल; उद्धव ठाकरेंचा घणाघात
भाजपला राजकारणातील खांदा द्यायचा आहे, ही वृत्ती संपवावीच लागेल; उद्धव ठाकरेंचा घणाघात
Embed widget