ड्रग्ज प्रकरणात कॉमेडियन भारती सिंगला अटक, एनसीबीकडून पती हर्ष याचीही चौकशी
कॉमेडियन भारतीसिंग आणि हर्ष लिंबाचिया यांच्या घरी एनसीबीने छापा टाकला आहे. छाप्यात एनसीबीला संशयास्पद पदार्थ (गांजा) सापडले आहेत.चौकशीनंतर भारतीला अटक करण्यात आली आहे तर हर्षची चौकशी करण्यात आली आहे.
मुंबई : कॉमेडियन भारती सिंगला ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने अटक केली आहे. त्याचवेळी तिचा नवरा हर्ष याच्याकडेही चौकशी केली जात आहे. यापूर्वी एनसीबीने भारतीसिंग आणि हर्ष लिंबाचिया यांच्या घरावर छापा टाकला होता. छाप्यात एनसीबीला संशयास्पद पदार्थ (गांजा) सापडला. दुपारी तीन वाजेपासून सुरु असलेल्या चौकशीनंतर भारतीला अटक करण्यात आली आहे.
दोघांच्या घरातून 86.5 ग्रॅम गांजा जप्त
घरात गांजा सापडल्यानंतर दोघांनाही प्रथम एनसीबीने ताब्यात घेतले. चौकशीनंतर भारती सिंग हिला अटक करण्यात आली आहे. शुक्रवारी एक ड्रग पॅडलरला पकडण्यात आले. त्याच्या चौकशीनंतर आज भारती आणि हर्षच्या घरावर छापा टाकण्यात आला. या छाप्यात दोघांच्या घरात 86.5 ग्रॅम गांजा सापडला. या जप्तीनंतर दोघांना एनसीबी कार्यालयात आणण्यात आले.
भारती आणि हर्ष यांनी गांजा घेत असल्याचे कबूल केलं - सुत्र
भारती आणि हर्ष या दोघांचीही स्वतंत्र खोल्यांमध्ये बसून चौकशी केली गेली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारती हिची चौकशी केली असता तिने गांजा सेवन केल्याची कबुली दिली. हर्षही एकत्र गांजा सेवन करायचा.
चौकशीसाठी भारती आणि हर्षला घेऊन एनसीबीची टीम रवाना, घरातील छाप्यात गांजा जप्त
भारतीची वैद्यकीय चाचणी होणार
थोड्या वेळाने, भारतीला वैद्यकीय तपासणीसाठी नेले जाणार आहे. त्यानंतर, बहुधा ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे एनडीपीएस कोर्टात हजर होतील. जर आज रात्री हे शक्य नसेल तर उद्या सादर केले जाणार आहे.
हर्षवरही अटकेची टांगती तलवार
हर्षवरही अटकेची टांगती तलवार आहे. त्याची अजूनही चौकशी सुरू आहे. त्याचे निवेदन घेतले जात आहे. परंतु, हर्षालाही रात्री उशिरा किंवा रात्री आठनंतर अटक करण्याची शक्यता आहे.
कोण आहे भारती सिंह? भारती सिंह ही स्टॅण्डअप कॉमेडियन आणि अभिनेत्री आहे. सध्या ती 'द कपिल शर्मा शो'मध्ये काम करत आहे. भारतीने 2017 मध्ये लेखक हर्ष लिंबचियासोबत लग्न केलं. तिने आपल्या कारकीर्दीची सुरुवात 'इंडियन लाफ्टर चॅलेन्ज'मधून केली होती. यानंतर तिने अनेक कॉमेडी शोमध्ये काम केला. यामध्ये कॉमेडी सर्कस, कॉमेडी सर्कस महासंग्राम, कॉमेडी सर्कस का जादू, कहानी कॉमेडी सर्कस की आणि कॉमेडी नाईट्स बचाओ यांचा समावेश आहे.
Drug connection | कॉमेडियन भारती सिंह आणि तिचा पती हर्षच्या घरी एनसीबीचा छापा