एक्स्प्लोर

चौकशीसाठी भारती आणि हर्षला घेऊन एनसीबीची टीम रवाना, घरातील छाप्यात गांजा जप्त

कॉमेडियन भारती आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांच्या घरात एनसीबीने छापा टाकला. यावेळी गांजा सापडल्याचं कळतं. यानंतर एनसीबीचं पथक दोघांना चौकशीसाठी घेऊन गेलं आहे.

मुंबई : कॉमेडियन भारती आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांच्या घरात अंमली पदार्थ विरोधी विभागाने छापा टाकला. छाप्यानंतर भारती आणि हर्ष यांना घेऊन एनसीबीचं पथक रवाना झालं आहे. ड्रग पेडलरच्या माहितीवरुन समीर वानखेडे यांच्या नेतृत्त्वात एनसीबीच्या पथकाने मुंबईतील अंधेरी, लोखंडवाला आणि वर्सोवा या ठिकाणी छापा टाकला. या कारवाईत गांजा जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर बॉलिवूडच्या ड्रग कनेक्शनमध्ये आतापर्यंत आश्चर्यचकित करणारी अनेक नावं समोर आली आहेत. यामध्ये आता भारती सिंह आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया याचा समावेश आहे. ड्रगशी संबंधित तपास करण्यासाठी एनसीबीचं पथक आज सकाळी सातच्या सुमारास अंधेरीतील भारतीच्या घरात पोहोचलं. सूत्रांच्या मते भारतीच्या घरात गांजा सापडला आहे. परंतु किती प्रमाणात गांजा सापडला याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. यानंतर एनसीबीने त्यांना समन्स बजावलं आणि दोघांना चौकशीसाठी घेऊन गेले आहेत.

बॉलिवूडच्या ड्रग्ज कनेक्शनमध्ये आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींची नावं समोर आली आहेत. सुशांत सिंह राजपूतची गर्लफ्रेण्ड रिया चक्रवर्तीपासून याची सुरुवात झाली आणि त्यानंतर दीपिका पदुकोण, सारा अली खान, रकुल प्रीत सिंह, अर्जुन रामपाल, त्याची गर्लफ्रेण्ड गॅब्रिएला डेमेट्रिएड्स यांच्यासह अनेक नावं समोर आली आणि त्यांची चौकशीही झाली आहे.

कोण आहे भारती सिंह? भारती सिंह ही स्टॅण्डअप कॉमेडियन आणि अभिनेत्री आहे. सध्या ती 'द कपिल शर्मा शो'मध्ये काम करत आहे. भारतीने 2017 मध्ये लेखक हर्ष लिंबचियासोबत लग्न केलं. तिने आपल्या कारकीर्दीची सुरुवात 'इंडियन लाफ्टर चॅलेन्ज'मधून केली होती. यानंतर तिने अनेक कॉमेडी शोमध्ये काम केला. यामध्ये कॉमेडी सर्कस, कॉमेडी सर्कस महासंग्राम, कॉमेडी सर्कस का जादू, कहानी कॉमेडी सर्कस की आणि कॉमेडी नाईट्स बचाओ यांचा समावेश आहे.

Drug connection | कॉमेडियन भारती सिंह आणि तिचा पती हर्षच्या घरी एनसीबीचा छापा

महत्त्वाच्या बातम्या

Subodh Bhave on Pravin Tarde: सुबोध भावेंची प्रवीण तरडेंसाठी खास पोस्ट; वाढदिवसानिमित शेअर केला जुना फोटो, नव्या नाटकाचीही केली घोषणा
सुबोध भावेंची प्रवीण तरडेंसाठी खास पोस्ट; वाढदिवसानिमित शेअर केला जुना फोटो, नव्या नाटकाचीही केली घोषणा
Rajnikant Anirudh Kavya Marriage: अनिरुद्ध - काव्याच्या लग्नात रजनीकांत यांचा जलवा, प्रसिद्ध गाण्यावर थिरकले; शाही लग्नातील व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल
अनिरुद्ध - काव्याच्या लग्नात रजनीकांत यांचा जलवा, प्रसिद्ध गाण्यावर थिरकले; शाही लग्नातील व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल
Avinash Arun Second Marriage: 'प्रहार' सिनेमाच्या दिग्दर्शकाने दिली गुडन्यूज; दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, मराठी अभिनेत्रीसोबतचं पहिलं लग्न मोडलं, आता नव्या संसाराचा श्रीगणेशा
'प्रहार' सिनेमाच्या दिग्दर्शकाने दिली गुडन्यूज; दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, मराठी अभिनेत्रीसोबतचं पहिलं लग्न मोडलं, आता नव्या संसाराचा श्रीगणेशा
Subodh Bhave: सरकारी कार्यक्रमात मराठी कलाकारांना पाठीमागे उभं केलं जातं, हिंदी कलाकारांना डोक्यावर घेतात, ते पाहून प्रचंड राग येतो; सुबोध भावे स्पष्टच बोलले
सरकारी कार्यक्रमात मराठी कलाकारांना पाठीमागे उभं केलं जातं, हिंदी कलाकारांना डोक्यावर घेतात, ते पाहून प्रचंड राग येतो; सुबोध भावे स्पष्टच बोलले

व्हिडीओ

Satej Patil Coffee With Kaushik: शांत झालेल्या गोकुळमध्ये पवारांची एन्ट्री, सतेज पाटलांचे गौप्यस्फोट
Sanjay Raut PC : शरद पवार गट चर्चेलाच तयार नाही, मग सुनेत्रा पवार विलीनीकरण कोणासोबत करणार?
Hasan Mushrif PC Kolhapur : संजय राऊतांनी आमच्यापक्षात नाक खुपसू नये, हसन मुश्रीफांचा इशारा
NCP Crisis : शरद पवारांच्या राष्ट्रवादीत विलीनीकरणावरून चार वेगवेगळे मतप्रवाह
Omraje Nimbalkar call : आमच्या गावचा रस्ता कधी करता ? खासदार ओमराजेंना चिमुकल्याचा थेट सवाल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nvidia Spy Controversy : चीनवर निर्बंध आणण्यासाठी अमेरिका खोट्या कहाण्या रचतंय, एनव्हिडिया हेरगिरी वादावर चीनचा पलटवार
चीनवर निर्बंध आणण्यासाठी अमेरिका खोट्या कहाण्या रचतंय, एनव्हिडिया हेरगिरी वादावर चीनचा पलटवार
शेतात सोन्याचे सात हांडे पुरल्याची बतावणी; जालन्यात मांत्रिकासह नऊ जणांना अटक, अघोरी पुजेचं साहित्यही जप्त
शेतात सोन्याचे सात हांडे पुरल्याची बतावणी; जालन्यात मांत्रिकासह नऊ जणांना अटक, अघोरी पुजेचं साहित्यही जप्त
Pune Crime News: आळंदीत दिवसाढवळ्या थरार; भरवस्तीत तरुणावर धारदार कोयत्याने जीवघेणा हल्ला, घटनेचा व्हिडिओ समोर, नेमकं काय घडलं?
आळंदीत दिवसाढवळ्या थरार; भरवस्तीत तरुणावर धारदार कोयत्याने जीवघेणा हल्ला, घटनेचा व्हिडिओ समोर, नेमकं काय घडलं?
Home Loan : डिसेंबरमध्ये गृहकर्ज आणखी महागणार? आरबीआयनं रेपो रेट वाढवल्यास नवं घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांना धक्का बसण्याची शक्यता, तज्ज्ञांचा अंदाज काय?
डिसेंबरमध्ये गृहकर्ज आणखी महागणार? आरबीआयनं रेपो रेट वाढवल्यास नवं घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांना धक्का बसण्याची शक्यता
दुष्काळात मराठवाड्याला काहीसा दिलासा; जायकवाडीतून डावा-उजव्या कालव्यात सोडले पाणी, बळीराजा सुखावला
दुष्काळात मराठवाड्याला काहीसा दिलासा; जायकवाडीतून डावा-उजव्या कालव्यात सोडले पाणी, बळीराजा सुखावला
Gold Silver Rate: सोन्यात साडेचार हजारांची तर चांदीत तब्बल 7 हजारांची घसरण; जागतिक घडामोडींचा सराफा बाजारावर मोठा परिणाम
सोन्यात साडेचार हजारांची तर चांदीत तब्बल 7 हजारांची घसरण; जागतिक घडामोडींचा सराफा बाजारावर मोठा परिणाम
नाशिकमध्ये अमृत भारत एक्स्प्रेसच्या डब्यात कारवाई, 1 कोटी 48 लाखांच्या रोकडसह संशयित व्यक्ती ताब्यात
नाशिकमध्ये अमृत भारत एक्स्प्रेसच्या डब्यात कारवाई, 1 कोटी 48 लाखांच्या रोकडसह संशयित व्यक्ती ताब्यात
Chhagan Bhujbal on NCP Merger Video: विलिनीकरणाबाबत अजित पवार अन् जयंत पाटलांची माझ्यासमोरच चर्चा झाली होती; छगन भुजबळांचा गौप्यस्फोट
Video: विलिनीकरणाबाबत अजित पवार अन् जयंत पाटलांची माझ्यासमोरच चर्चा झाली होती; छगन भुजबळांचा गौप्यस्फोट
Embed widget