नरेंद्र मोदी मला सरदार पटेल यांच्यापेक्षा मोठे नेते वाटू लागलेत, संजय राऊतांचा खोचक टोला
सरदार वल्लभभाई पटेल हे आमचे आदर्श आहेत. अलिकडच्या काळात भाजपचं त्यांच्यावरील प्रेम वाढलं आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
मुंबई : गुजरातच्या अहमदाबादमधील मोटेरा स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव देण्यात आलं आहे. यावरुन अनेकांनी टीका केली. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी याबाबत बोलताना म्हटलं की, गुजरात राज्य सरकारला जे योग्य त्यांनी ते केलं. मला तर आता पंतप्रधान नरेंद्र मोदीसरदार वल्लभभाई पटेल यांच्यापेक्षा मोठे वाटू लागले आहेत, असा खोचक टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
सरदार वल्लभभाई पटेल हे आमचे आदर्श आहेत. अलिकडच्या काळात भाजपचं त्यांच्यावरील प्रेम वाढलं आहे. गुजरातमधील स्टेडियमला काय नाव द्यावं हा त्यांचा सरकारचा निर्णय आहे. तुम्ही आणि आम्ही यामध्ये काय बोलू शकतो. स्टेडियमच्या नावाबाबतचा निर्णय क्रिकेट बोर्डाचाही असू शकतो. एखादा राजकीय पक्षाने काय करायला हवं आणि काय नाही हे आम्ही ठरवू शकत नाही. त्यांना योग्य वाटलं असेल ते त्यांनी केलं. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी मला आता सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पेक्षाही मोठे वाटू लागले आहे, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.
Motera Stadium Renamed: जगातील सर्वात मोठ्या मोटेरा स्टेडियमचं 'नरेंद्र मोदी स्टेडियम' नामकरण
PHOTO : कसं आहे मोटेरा स्टेडिअम?
राष्ट्रपतींच्या हस्ते नरेंद्र मोदी स्टेडियमचं उद्घाटन
देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते नरेंद्र मोदी स्टेडियमचं उद्घाटन करण्यात आलं. या उद्घाटन सोहळ्याला देशाचे गृहमंत्री अमित शाह देखील उपस्थित होते. 'नरेंद्र मोदी स्टेडियम' स्टेडियम जगातील सर्वात मोठं क्रिकेट स्टेडियम असून यामध्ये 1 लाख 10 हजार प्रेक्षकांच्या बसण्याची व्यवस्था आहे.
कसं आहे 'नरेंद्र मोदी स्टेडियम'?
अहमदाबादमधील मोटेरा स्टेडियम 700 कोटींहून अधिक खर्च करुन बांधले आहे. यामध्ये 1,10,000 प्रेक्षक बसण्याची क्षमता आहे. मेलबर्न क्रिकेट ग्राउंड स्टेडियम तयार करणार्या कंपनीने हे स्टेडियम डिझाइन केले आहे. यात 76 कॉर्पोरेट बॉक्स, चार ड्रेसिंग रूम आणि तीन सराव मैदाने आहेत. स्टेडियम व्यतिरिक्त, इनडोअर क्रिकेट अॅकाडमी व्यतिरिक्त जलतरण तलाव, स्क्वॅश आणि टेबल टेनिसची सुविधा आहे. मोटेरा स्टेडियमच्या लाईट्सही खूप वेगळ्या आहेत. फ्लड लाइट्स ऐवजी जागा एलईडी लाइट्स लावण्यात आल्या आहेत ज्या सौर उर्जेवर चालतात. याशिवाय स्टेडियममध्ये थ्रीडी थिएटरसुद्धा आहेत. ड्रेसिंग रूमशी जोडलेले उत्कृष्ट जिम देखील आहेत.