एक्स्प्लोर

Narendra Modi Stadium: मोदींच्या नावे असलेल्या स्टेडियमला दोन विकेट एन्ड, अदानी एन्ड आणि रिलायन्स एन्ड

अहमदाबादच्या ( Ahmedabad) स्टेडियमला नरेंद्र मोदी (Narendra Modi stadium) यांचे नाव देण्यात आलं आहे. या स्टेडियमला दोन विकेट एन्ड असून त्याचे नाव अदानी एन्ड (Adani end) आणि रिलायन्स एन्ड (Reliance end) असं आहे.

अहमदाबाद: जगातल्या सर्वात मोठ्या अहमदाबादमधील मोटेरा स्टेडियमला आज नरेंद्र मोदींचे नाव देण्यात आलं आहे. देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते नरेंद्र मोदी स्टेडियमचं उद्घाटन करण्यात आलं आहे. या स्टेडियमला दोन बॉलिंग एन्ड आहेत, एक अदानी एन्ड आणि दुसरं रिलायन्स एन्ड. आता या गोष्टीवरुन सोशल मीडियावर आता कमेन्टचा पाऊस पडताना दिसत आहे.

नरेंद्र मोदी हे उद्योगपतींच्यासाठी काम करत असल्याचा आरोप सातत्याने त्यांच्यावर होतोय. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींचे सरकार हे 'हम दो हमारे दो' यांचं सरकार असल्याचा आरोप केलेला. आता ज्या अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमला नरेंद्र मोदींचं नाव देण्यात आलंय त्या स्टेडियमवर दोन बॉलिंग एन्ड आहेत, म्हणजे पीचच्या दोन्ही बाजूने गोलंदाजी करता येते. यातील एका बॉलिंग एन्डचे नाव अदानी एन्ड तर दुसऱ्या बॉलिंग एन्डचे नाव रिलायन्स एन्ड आहे.

आता या गोष्टीवरुन राहुल गांधी यांनी पुन्हा मोदी सरकारवर टीका केली आहे. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, "या आता हे सुंदर सत्य बाहेर आलं आहे. नरेंद्र मोदी स्टेडियमला दोन एन्ड आहेत, एक अदानी एन्ड तर दुसरं रिलायन्स एन्ड. आणि त्याचे अध्यक्ष जय शाह आहेत."

सोशल मीडियावरही या गोष्टीवरुन मोठी टीका होत आहे तर यावर गमतीदार कमेंन्टही केल्या जात आहेत.

कसं आहे 'नरेंद्र मोदी स्टेडियम'? अहमदाबादमधील मोटेरा स्टेडियम 700 कोटींहून अधिक खर्च करुन बांधले आहे. यामध्ये 1,10,000 प्रेक्षक बसण्याची क्षमता आहे. मेलबर्न क्रिकेट ग्राउंड स्टेडियम तयार करणार्‍या कंपनीने हे स्टेडियम डिझाइन केले आहे. यात 76 कॉर्पोरेट बॉक्स, चार ड्रेसिंग रूम आणि तीन सराव मैदाने आहेत. स्टेडियम व्यतिरिक्त, इनडोअर क्रिकेट अॅकाडमी व्यतिरिक्त जलतरण तलाव, स्क्वॅश आणि टेबल टेनिसची सुविधा आहे. मोटेरा स्टेडियमच्या लाईट्सही खूप वेगळ्या आहेत. फ्लड लाइट्स ऐवजी जागा एलईडी लाइट्स लावण्यात आल्या आहेत ज्या सौर उर्जेवर चालतात. याशिवाय स्टेडियममध्ये थ्रीडी थिएटरसुद्धा आहेत. ड्रेसिंग रूमशी जोडलेले उत्कृष्ट जिम देखील आहेत.

Motera Stadium Renamed: जगातील सर्वात मोठ्या मोटेरा स्टेडियमचं 'नरेंद्र मोदी स्टेडियम' नामकरण

महत्त्वाच्या बातम्या

नाद केला पण वाया नाही गेला! 12 वर्षांची मेहनत, तब्बल 40 परीक्षांमध्ये अपयश, संघर्षातून घडलेल्या मनोजची यशोगाथा 
नाद केला पण वाया नाही गेला! 12 वर्षांची मेहनत, तब्बल 40 परीक्षांमध्ये अपयश, संघर्षातून घडलेल्या मनोजची यशोगाथा 
जगातील सगळ्यात हलकं हेल्मेट! वजन फक्त 1050 ग्रॅम, सुरक्षेच्या बाबतीत मजबूत, शानदार कार्यक्रमात अनावरण
जगातील सगळ्यात हलकं हेल्मेट! वजन फक्त 1050 ग्रॅम, सुरक्षेच्या बाबतीत मजबूत, शानदार कार्यक्रमात अनावरण
वारसा हक्क ते गुंतवणूक! भारतीय महिला बनणार 73 लाख कोटी रुपयांच्या मालक, अहवालातून महत्वाची माहिती समोर
वारसा हक्क ते गुंतवणूक! भारतीय महिला बनणार 73 लाख कोटी रुपयांच्या मालक, अहवालातून महत्वाची माहिती समोर
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा

Embed widget