Narendra Mehta : आठवी पास असून पदवीधर निवडणुकीसाठी मतदान केलं का? भाजपच्या माजी आमदार नरेंद्र मेहतांची पहिली प्रतिक्रिया
Narendra Mehta : आपण आठवी पास असल्याचा अभिमान असल्याचं भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी म्हटलं आहे. तसेच दोन हजार जणांना रोजगार दिला, अनेक कुटुंबांना आधार दिल्याचं मेहता म्हणाले.
मुंबई : केवळ आठवी पास असतानाही भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता (Narendra Mehta) यांनी कोकण पदवीधर मतदारसंघासाठी (Konkan graduate constituency election 2024) मतदान केल्याचं सोशल मीडियावर व्हायरल होत होतं. त्यावर आता नरेंद्र मेहता यांनी प्रतिक्रिया दिली आहे. फक्त फोटो देण्यासाठी मी मतदान केल्याची पोज दिली, मी मतदान केलं नसल्याचं नरेंद्र मेहता यांनी स्पष्ट केलं. आठवी पास असल्याचा मला अभिमान आहे, आपण 2,000 लोकांना रोजगार दिल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच या प्रकारच्याअफवा पसरवून आपली बदनामी केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
काय म्हणाले नरेंद्र मेहता?
काही माध्यमांमधून माझी बदनामी केली जात आहे. पदवीधर मतदारसंघाचं मततदान त होतं त्यावेळी कार्यकर्त्यांसोबत फोटो काढताना ती पोझ दिली. मी मतदान केलयं असं कुठेही म्हटलं नाही. पदवीधर मतदारसंघाचं मतदान करताना बोटाला शाई ही उजव्या हाताला लावली जाते आणि मी मतदानास प्रोत्साहित करण्यासाठी कार्यकर्त्यासोबत डावा हात दाखवत होतो. मला अभिमान आहे मी आठवी पास असल्याचा, मी दोन हजार जणांना नोकऱ्या दिल्या.
बुधवारी पदवीधर मतदारसंघाची निवडणूक होती. निवडणुकीवेळी आम्ही अनेकदा फोटो पोस्ट करत असतो. एका पत्रकाराने बातमी दिली की, मी पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदान केले. पदवीधर निवडणुकीत शाई ही डाव्या नव्हे तर उजव्या हातावर लावली जाते. या निवडणुकीत मतदान करायला निवडणूक यादीत तुमचे नाव असणे गरजेचे असते. माझी बदनामी करण्यासाठी खोट्या बातम्या छापल्या जात आहेत. मी एरवी बोलत नाही, पण लोकांमध्ये गैरसमज पसरु नये म्हणून बोलावे लागत आहे.
आठवी पास असल्याचा अभिमान आहे
मी आठवी पास असल्याचे सांगितले जाते. तर मला आठवी पास असल्याचा अभिमान आहे. या आठवी पास माणसाने मीरा-भाईंदर शहरातील 2,000 लोकांना रोजगार दिले. त्यांच्या कुटुंबांना आधार दिला, रोजगार दिला असे नरेंद्र मेहता यांनी म्हटले.
बोटावर मतदानाची शाई कशी आली? नरेंद्र मेहतांचं स्पष्टीकरण
नरेंद्र मेहता यांनी सोशल मीडियावर जो फोटो पोस्ट केला होता त्यामध्ये त्यांच्या बोटावर मतदानाची शाई दिसत आहे. याबाबत स्पष्टीकरण देताना मेहता यांनी म्हटले की, पदवीधर निवडणुकीवेळी उजव्या हातावर शाई लावली जाते. मी पोस्ट केलेल्या फोटोत माझ्या बोटावर मतदानाची शाई दिसत आहे, मात्र ती शाई डाव्या हाताच्या बोटावर होती, ही शाई लोकसभा निवडणुकीवेळी लावण्यात आली होती, असे नरेंद्र मेहता यांनी संगितले.
ही बातमी वाचा: