एक्स्प्लोर

MLC Election 2024: भाजपच्या आठवी पास नरेंद्र मेहतांनी पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदान केलं? सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल

Maharashtra Politics: विधानपरिषद निवडणुकीत भाजपच्या माजी आमदाराचा प्रताप.आठवी पास असूनही नरेंद्र मेहता यांनी पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदान केल्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने चर्चांना उधाण.

मिरा रोड: मिरा भाईंदरचे भाजपाचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्या फेसबुकच्या त्या पोस्टवरुन सध्या मिरा भाईंदरमध्ये  नरेंद्र मेहता यांना  चांगलेच ट्रोल करण्यात येत आहे. बुधवारी कोकण पदवीधर मतदारसंघासाठी (Konkan graduate constituency election 2024) मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी नरेंद्र मेहता (Narendra Mehta) यांनी आपल्या फेसबुक पोस्टवर आपल्या पत्नीसमवेत हाताच्या बोटाची शाई दाखवत एक फोटो पोस्ट केला होता. मतदान करा, मतदान (Voting) करणे गरजेच आहे. कोकण पदवीधर मतदार संघ निवडणूक २०२४ साठी आम्ही आपलं मतदान केलं आहे. मतदानाचं कर्तव्य पूर्ण करुन, लोकशाही मजबूत करण्यासाठी आम्ही योगदान दिलं आहे. आपणही मतदान करुन योग्य उमेदवार निवडा, अशा आशयाची पोस्ट नरेंद्र मेहता यांनी केली होती. 

मात्र, पालिका आणि आमदारकीच्या निवडणूकीत सादर केलेल्या शपथपञात नरेंद्र मेहता यांनी आपलं शिक्षण आठवी पास झाल्याच लिहलं होतं. त्यामुळे आठवी पास असलेल्या मेहता यांनी पदवीधर मतदार संघाच्या निवडणूकीत मतदान कसे केले? असा आश्यर्याचा सवाल उपस्थित करुन,  ही पोस्ट समाजमाध्यमांवर सध्या चांगलीच व्हायरल होत आहे.  त्यामुळे मेहतांवर सगळीकडून टीकेची झोड उठू लागली आहे. 

नरेंद्र मेहता यांचं स्पष्टीकरण, म्हणाले...

जनतेला मुर्ख बनवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप मेहतावर केला जात आहे.  यावर नरेंद्र मेहता यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना, माझ्या पत्नीने आज मतदानाचा हक्क बजावला. मी ही तेथे पक्षाच कार्य करत असताना,  कार्यकर्त्यांनी माझं आणि माझ्या पत्नीचं एकञ फोटो काढण्यासाठी उभं केलं. बोट दाखवण्यासाठी सांगितल्याने मी दाखवलं. मात्र, कुठेही मी मतदान केल्याचे म्हटले नसल्याचा दावा नरेंद्र मेहता यांनी केला आहे. मात्र, फोटोत नरेंद्र मेहता यांच्या बोटावर मतदानानंतर लावण्यात येणारी शाई दिसून येत आहे. ही शाई त्यांच्या बोटावर का लावली, हा प्रश्न अनुत्तरितच आहे.

शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीत 71.87 टक्के मतदान

विधानपरिषदेच्या मुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक, कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक अशा चार मतदारसंघांमध्ये बुधवारी मतदान संपन्न झाले. संध्याकाळी सहा वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार, या चारही मतदारसंघात मिळून सरासरी 71.87 टक्के मतदान झाले. यापैकी मुंबई पदवीधर मतदारसंघात 56 टक्के, मुंबई शिक्षक मतदारसंघात 75 टक्के, नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघात 93.48 टक्के आणि कोकण पदवीधर मतदारसंघात 63 टक्के मतदान झाले. आता 1 जुलैला मतमोजणी होणार आहे. त्यावेळी कोण बाजी मारणार,याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

कोकण विभाग पदवीधर मतदार संघातील मतदानाची टक्केवारी 

जिल्हयाचे नाव   एकुण मतदान     एकूण टक्केवारी

1) पालघर                                   १८२९०                   ६३.२३
                 
2) ठाणे                                      ५७७५३                  ५८.४२

3) रायगड                                   ३६७६२                   ६७.५९

4) रत्नागिरी                                     १५६८१                  ६९.१४

5) सिंधुदूर्ग                                      १४८११                  ७९.८४

    एकूण                                       १४३२९७                ६४.१४

आणखी वाचा

उमेदवार जाहीर करूनही कोकण पदवीधर मतदारसंघातून राज ठाकरेंची माघार, भाजपचे निरंजन डावखरेच निवडणूक लढवणार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Beed Crime: कळंबमध्ये 'त्या' महिलेच्या सडलेल्या मृतदेहाचं जागेवरच पोस्टमार्टेम, बीड पोलिसांनी झटपट अंत्यविधीही उरकला, आता नवी अपडेट समोर
कळंबमध्ये 'त्या' महिलेच्या सडलेल्या मृतदेहाचं जागेवरच पोस्टमार्टेम, झटपट अंत्यविधीही उरकला, नवी अपडेट समोर
Mumbai Crime: नायगावमध्ये प्रेयसीने लिव्ह-इनमध्ये राहायला नकार दिला, प्रियकराने आयुष्य संपवलं, मग तिनेही.... प्रेमकहाणीच्या 'एक दुजे के लिए' स्टाईल शेवटाने नायगाव हादरलं
प्रेयसीचा लिव्ह इनमध्ये राहायला नकार, प्रेमकहाणीच्या 'एक दुजे के लिए' स्टाईल शेवटाने नायगाव हादरलं
Beed : बीडच्या 'त्या' महिलेचा खून? सरपंच हत्या प्रकरणाचे गूढ वाढलं
Beed : बीडच्या 'त्या' महिलेचा खून? सरपंच हत्या प्रकरणाचे गूढ वाढलं
Jail Rules : पती-पत्नी तुरुंगात एकत्रित राहू शकतात का? काय आहेत नियम? 
पती-पत्नी तुरुंगात एकत्रित राहू शकतात का? काय आहेत नियम? 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 08AM TOP Headlines 08 AM 01 April 2025Majha Gaon Majha Jilha | माझं गाव माझा जिल्हा, बातम्यांचा सुपरफास्ट आढावा :01 April 2025 : 7 AMABP Majha Marathi News Headlines 07AM TOP Headlines 07 AM 01 April 2025Top 100 Headlines : टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा : 01 April 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed Crime: कळंबमध्ये 'त्या' महिलेच्या सडलेल्या मृतदेहाचं जागेवरच पोस्टमार्टेम, बीड पोलिसांनी झटपट अंत्यविधीही उरकला, आता नवी अपडेट समोर
कळंबमध्ये 'त्या' महिलेच्या सडलेल्या मृतदेहाचं जागेवरच पोस्टमार्टेम, झटपट अंत्यविधीही उरकला, नवी अपडेट समोर
Mumbai Crime: नायगावमध्ये प्रेयसीने लिव्ह-इनमध्ये राहायला नकार दिला, प्रियकराने आयुष्य संपवलं, मग तिनेही.... प्रेमकहाणीच्या 'एक दुजे के लिए' स्टाईल शेवटाने नायगाव हादरलं
प्रेयसीचा लिव्ह इनमध्ये राहायला नकार, प्रेमकहाणीच्या 'एक दुजे के लिए' स्टाईल शेवटाने नायगाव हादरलं
Beed : बीडच्या 'त्या' महिलेचा खून? सरपंच हत्या प्रकरणाचे गूढ वाढलं
Beed : बीडच्या 'त्या' महिलेचा खून? सरपंच हत्या प्रकरणाचे गूढ वाढलं
Jail Rules : पती-पत्नी तुरुंगात एकत्रित राहू शकतात का? काय आहेत नियम? 
पती-पत्नी तुरुंगात एकत्रित राहू शकतात का? काय आहेत नियम? 
EPFO चं मोठं पाऊल, ऑटो-सेटलमेंटची मर्यादा 1 लाखांवरुन 5 लाखांवर नेणार, यूपीआय अन् एटीएममधून पैसे काढता येणार
ईपीएफओचे दोन क्रांतिकारी निर्णय, ऑटो-सेटलमेंटची रक्कम 5 लाखांवर नेणार तर....
Indian Army : इंडियन आर्मीमध्ये अग्नीवीर म्हणून काम करण्याची संधी, अर्ज करण्यासाठी राहिले शेवटचे काही दिवस
इंडियन आर्मीमध्ये अग्नीवीर म्हणून काम करण्याची संधी, 21 ते 28 हजार रुपये दरमहा मिळणार, जाणून घ्या प्रक्रिया
धक्कादायक! भावी नवऱ्यालाच संपवण्याची सुपारी दिली; नवरी फरार, मारहाण करणाऱ्या 5 जणांना अटक
धक्कादायक! भावी नवऱ्यालाच संपवण्याची सुपारी दिली; नवरी फरार, मारहाण करणाऱ्या 5 जणांना अटक
Dattatray Bharne : पुण्यात पवार,पाटील-देशमुखांना न मिळालेली पदं मला नशिबाने मिळाली; मंत्री झाल्यानंतर दत्तामामा भरणेंना अजितदादांचा विसर? 
पुण्यात पवार,पाटील-देशमुखांना न मिळालेली पदं मला नशिबाने मिळाली; मंत्री झाल्यानंतर दत्तामामा भरणेंना अजितदादांचा विसर? 
Embed widget