एक्स्प्लोर
मला भाजपकडून उमेदवारी, तरीही शिवसेना सत्तेत : राणे
'भाजपने मला राज्यसभा दिली आहे. त्यामुळे आता हिंमत असेल तर शिवसेनेनं सत्तेतून बाहेर जाऊन दाखवावं.'
मुंबई : 'मला भाजपने उमेदवारी दिली. मी राज्यसभा खासदार झालो. त्यामुळे आता शिवसेनेनं सत्तेतून बाहेर पडायला हवं होतं.' असा खोचक टोला नारायण राणे यांनी शिवसेनेला लगावला आहे.
'जसं सांगतात तसं वागत नाही. त्या पक्षाला शिवसेना म्हणतात. भाजपने मला राज्यसभा दिली आहे. त्यामुळे आता हिंमत असेल तर शिवसेनेनं सत्तेतून बाहेर जाऊन दाखवावं. पण शिवसेना आणि उद्धव ठाकरे सत्तेच्या बाहेर जाऊ शकत नाही.' असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेवर टीका केली. त्यामुळे राणेंच्या या टीकेला शिवसेना काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
VIDEO :
दरम्यान, भाजपच्या विजया रहाटकर यांनी राज्यसभेच्या निवडणुकीतून आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने राज्यसभेची निर्माण झालेली चुरस मात्र आता संपली आहे. कारण, राज्यातील सहा जागांसाठी आता केवळ सहा उमेदवार राहिले आहेत.
यात भाजपाचे तीन आणि शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा प्रत्येकी एक उमेदवार आहे. मात्र, ऐनवेळी रहाटकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने राज्यसभेसाठी चुरस निर्माण झाली होती. त्यामुळे आता नारायण राणेंच्या राज्यसभेवर जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
राजकारण
राजकारण
क्राईम
Advertisement