एक्स्प्लोर

डोंबिवलीत मित्राकडून मित्राची हत्या, वडिलांना जास्त सन्मान कोण देतं? सिद्ध करण्यावरुन झालेला वाद

मित्राच्या हत्येप्रकरणी आरोपी बबलू याला  अटक करण्यात आली आहे. आज बबलूला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने त्याला 12 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास डोंबिवली जीआरपी करत आहे.

कल्याण : डोंबिवली प्रवासी हत्याप्रकरणी वेगळे वळण लागले आहे.  मित्रानेच मित्राची हत्या केली नंतर स्वतःला वाचवण्यासाठी लुटीच्या बनाव केला. टिळकनगर पोलिसांनी आरोपी बबलू चौहान याचा हा  बनाव उघड करत त्याला बेड्या ठोकल्या आहेत. कोण आपल्या वडिलांना जास्त सम्मान देतो या कारणावरून  दोघांमध्ये भांडण झालं, दारूच्या नशेत बबलू याने बेचल चौहान हत्या करून त्याचा मृतदेह रेल्वे ट्रॅकवर टाकून दिला होता. मात्र पोलिस चौकशीत त्याचा हा बनाव टिकू शकला नाही व बबलू ने गुन्ह्याची कबुली दिली. अवघ्या काही तासात पोलिसांनी हा बनाव उघड करत आरोपी बबलू याला  बेड्या ठोकल्यात. हा गुन्हा डोंबिवली जीआरपी कडे वर्ग करण्यात आला असून आज बबलूला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने त्याला 12 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास डोंबिवली जीआरपी करत आहे.

डोंबिवली पूर्व  शेलार नाका परिसरात राहणाऱ्या बेचल प्रसाद चौहान  आणि त्याचा मित्र बबलू चौहान हे राहत होते. दोघे सुतार काम व रंगकाम करायचे. दोघे सोमवारी रात्री आपल्या गावी उत्तर प्रदेशला जाण्यासाठी निघाले. मंगळवारी सकाळी बबलू हा भाजपच्या जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांच्या सोबत टिळक नगर पोलीस ठाण्यात पोहोचला. लुटीच्या इराद्याने तीन जणांनी रिक्षामधून खाली उतरून मला आणि माझ्या मित्राला मारहाण केली, मी कसाबसा वाचून आलो आहे. माझा मित्र अजून सापडलेला नाही असं बबलू याने पोलिसांना सांगितले. 

घटना कुठे घडली आहे हे पाहण्यासाठी भाजपा जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे आणि पोलीस ठाकुर्ली येथील खंबाळपाडा परिसरात असलेल्या 90 फीट रोडवर पोहचले. बेचन प्रसाद यांच्या मृतदेह रेल्वे ट्रॅकवर छिन्नभिन्न अवस्थेत पडला होता. बबलू याच्या सांगण्यावरून  लुटारूंनी बेचन याची हत्या केली असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला. मात्र लूट झाली असली तरी दोघांची बॅग आणि मोबाइल घटनास्थळी सापडल्याने नक्की लूट करण्यासाठी हा प्रकार घडलाय का असा संशय पोलिसाना होता. 

या दृष्टीने  डोंबिवलीच्या जीआरपी पोलिसांनी आणि टिळकनगर पोलिसांनी या प्रकरणाच्या समांतर तपास सुरू केला. जखमी बबलू याला पोलिसांनी विचारपूस सुरू केली. मात्र बबलू हा  पोलिसांना उलट-सुलट जबाब देत होता. यावरून पोलिसांना संशय आला. कल्याणचे डीसीपी सचिन गुंजाळ, एसीपी जे डी मोरे, टिळक नगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय आफळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू झाला. चौकशी दरम्यान बबलू यानेच आपला मित्र बेचन प्रसादची हत्या केल्याची कबुली दिली. 

या दोघांमध्ये सोमवारी संध्याकाळी आपल्या वडिलांना जास्त आदर कोण करतो यावरून वाद झाला. आपण गावी जाऊन एकमेकांच्या वडिलांना विचारायचे की कोण तुम्हाला जास्त सन्मान देतो असे त्यांनी ठरवले. दोघे आपल्या गावी उत्तर प्रदेश येथील सिद्धार्थनगर जिल्ह्यात जाण्यासाठी निघाले. कल्याण रेल्वे स्थानकाहून दीड वाजताची ट्रेन होती. त्याआधी दोघांनी दारू प्यायली. त्यानंतर रिक्षाने कल्याण रेल्वे स्थानकावर जाण्यासाठी निघाले. मात्र खंबाळपाडा परिसरात असलेल्या 90 फिट रोडवर त्यांचे या मुद्द्यावरच परत भांडण झाले. या वादात बबलू यांनी आपल्याकडील असलेल्या धारदार शस्त्राने बेचल याची हत्या केली आणि त्याचा मृतदेह रेल्वे ट्रॅकवर टाकून पसार झाला. प्रकरण उघडकीस आल्यानंतर टिळक नगर पोलिसांनी बबलू याला डोंबिवली रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. पुढील तपास डोंबिवली रेल्वे पोलीस करणार आहेत.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

BKC Metro Fire : आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 15 November 2024Abdul Sattar On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या टीकेवर अब्दुल सत्तार यांचं प्रत्युत्तर काय?BKC Metro Station Fire : बीकेसी अंडरग्राऊंड मेट्रो स्थानकाला आगSharad Pawar Ichalkaranji : शरद पवारांची इचलकरंजीत भर पावसात सभा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BKC Metro Fire : आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांचा बोचरा पलटवार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांचा बोचरा पलटवार
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
Sharad Pawar : आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
Embed widget