एक्स्प्लोर
Hasan Mushrif ON Voter List: सदोष मतदार याद्यांवरुन निवडणुका नकोत, मुश्रीफांचा घरचा आहेर
सदोष मतदार याद्यांच्या मुद्द्यावरून मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी विरोधी महाविकास आघाडीच्या (MVA) भूमिकेला पाठिंबा दिला आहे. 'सदोष मतदार याद्यांवरती निवडणुका नकोत', असे स्पष्ट मत व्यक्त करत मुश्रीफ यांनी खळबळ उडवून दिली आहे. विरोधी पक्षांनी मुंबईत काढलेल्या मोर्चाला प्रतिसाद देताना, सदोष याद्यांवर निवडणुका घेण्यास आपल्या पक्षाचा आणि युतीचाही आक्षेप असल्याचे ते म्हणाले. देशाची लोकसंख्या आणि छपाईतील चुकांमुळे मतदार याद्यांमध्ये त्रुटी राहतात, असे नमूद करत त्यांनी या चुका दुरुस्त करण्यास सरकारची हरकत नसल्याचेही स्पष्ट केले. या भूमिकेमुळे अजित पवार (Ajit Pawar) गटाची राष्ट्रवादी काँग्रेसदेखील विरोधकांच्या मागणीशी सहमत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
बातम्या
वर्धा
Advertisement
Advertisement
















