एक्स्प्लोर
Raj Thackeray Satyacha Morcha : मतदार याद्यांमधील घोळविरोधातील मोर्चासाठी राज ठाकरे लोकलने प्रवास करणार
मतदार यादीतील घोळ (Voter List Scam) आणि मतचोरीच्या (Vote Theft) मुद्द्यावरून महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि मनसे आक्रमक झाली असून, मुंबईत 'सत्याचा मोर्चा' आयोजित करण्यात आला आहे. भाजपला बिनशर्त पाठिंबा देणारे राज ठाकरे (Raj Thackeray) आता 'मतचोरी आणि मतदार याद्यांमधील घोळासंदर्भात' आक्रमक भूमिका घेत महाविकास आघाडीच्या सुरात सूर मिसळताना दिसत आहेत. या मोर्चात सहभागी होण्यासाठी राज ठाकरे यांनी दादर (Dadar) ते चर्चगेट (Churchgate) असा प्रवास पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) लोकलने केला. त्यांच्यासोबत मनसे नेते बाळा नांदगावकर आणि अविनाश अभ्यंकर हेही उपस्थित होते. राज ठाकरेंच्या या भूमिकेमुळे ठाकरे बंधू (Thackeray Brothers) पुन्हा एकत्र येणार का, या चर्चांना उधाण आले आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















