एक्स्प्लोर
उल्हासनगरमध्ये घरात घुसून वृद्ध महिलेची हत्या

उल्हासनगर: घरात घुसून एका वृद्ध महिलेची हत्या केल्याची धक्कादायक घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे. वीणा रमनानी असं या वृद्धेचं नाव असून त्या घरात एकट्याचा घरात होत्या. तर त्यांचा मुलगा आणि सून बाजूच्या इमारतीत राहतात. सकाळी त्यांचा मुलगा दीपक आपल्या आईसाठी चहा घेऊन आला तेव्हा हा सर्व प्रकार समोर आला. तोंडावर उशी दाबून मारेकऱ्यांनी वीणा रमनानी यांची हत्या केली. तसेच वीणा यांच्या हातातील बांगड्या आणि कानातील रिंगा ही मारेकऱ्यांनी चोरून नेल्या आहेत. त्यामुळे ही हत्या चोरीच्या उद्देशाने झाली असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, वीणा यांच्या घराचं दार तोडण्यात आलं नव्हतं. त्यामुळं कोणी ओळखीच्याच व्यक्तीने ही हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
व्यापार-उद्योग
राजकारण
राजकारण























