एक्स्प्लोर
300 रुपयांसाठी मित्राची हत्या, 17 वर्षीय आरोपी अटकेत
फक्त ३०० रुपये दिले नाहीत म्हणून एका १७ वर्षीय मुलाने आपल्या मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना मुंबईत घडली आहे

प्रातिनिधिक फोटो
मुंबई : केवळ ३०० रुपये दिले नाहीत म्हणून एका १७ वर्षीय मुलाने आपल्या मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना मुंबईत घडली आहे. इम्रान कुरेशी असं हत्या झालेल्या मुलांचं नावं आहे. काही दिवसांपूर्वी इम्रानने आपल्या मित्राच्या दुकानातून ३०० रुपयांचं मांस खरेदी केलं होतं. यानंतर दोघांमध्ये ३०० रुपयांवरुन वाद सुरु होता. या वादाचं पर्यावसन एकाची हत्या होण्यामध्ये झालं. या १७ वर्षीय मुलाने आपला मित्र इम्रानच्या पोटावर आणि गळ्यावर चाकूने वार करुन त्याची हत्या केली. पण हे कुणाला कळू नये आणि हा रेल्वे अपघात वाटावा यासाठी त्याने मित्राचा मृतदेह रेल्वे रुळांवर फेकून दिला होता. अखेर शवविच्छेदन अहवालात इम्रानची हत्या झाल्याचं स्पष्ट झालं. यानंतर पोलिसांनी त्वरीत तापस करुन १७ वर्षीय आरोपीला अटक केली. दरम्यान, पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
आणखी वाचा























