मुंब्रा बायपास आणखी दोन दिवस राहणार बंद, पर्यायी मार्ग कोणते? वाचा सविस्तर
मुंब्रा बायपास पुलावर अनेक खड्डे पडले होते तरीदेखील यावर वाहतूक सुरू होती. मात्र एक मोठा आरपार खड्डा पडल्यानंतर वाहतूक शाखेला जाग आली आणि त्यानंतर या पुलावरील काम पीडब्ल्यूडीने हाती घेतले होते.
मुंबई : मुंब्रा बायपास पुलावर पडलेल्या खड्ड्यांमुळे हा पुल गेले अनेक दिवस बंद आहे. पीडब्ल्यूडीने काम हाती घेतल्यानंतर काम वेळेत पूर्ण न झाल्याने हा पुल अवजड वाहनांसाठी आणखी दोन दिवस म्हणजेच 16 ऑगस्टपर्यंत बंद असणार आहे, अशी माहिती वाहतूक शाखेचे उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी दिली.
मुंब्रा बायपास पुलावर अनेक खड्डे पडले होते तरीदेखील यावर वाहतूक सुरू होती. मात्र एक मोठा आरपार खड्डा पडल्यानंतर वाहतूक शाखेला जाग आली आणि त्यानंतर या पुलावरील काम पीडब्ल्यूडीने हाती घेतले होते. हे काम 9 ऑगस्ट पर्यंत पूर्ण करण्यात येईल असे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. मात्र काम वेळेत पूर्ण न झाल्याने हा पुल आणखी चार दिवस बंद ठेवण्यात आला होता. मात्र या पुलावरील खड्डे बुजवण्याचे काम अद्यापही पूर्ण न झाल्याने हा पुल अवजड वाहनांसाठी आणखी दोन दिवस बंद ठेवण्यात आला आहे, अशी माहिती वाहतूक शाखेचे उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी दिली .
प्रवेश बंद - तळोजा, पनवेल, महापेकडून मुंब्रा बायपास मार्गे जाणाऱ्या जड, अवजड वाहनांसाठी शीळ फाटा येथे प्रवेश बंद.
पर्यायी मार्ग - तळोजा, पनवेल, महापेकडून मुंब्रा बायपास कडे येणारी जड अवजड वाहने महापे मार्गे कोपरखैरणे पुलाखालून राबळे-ऐरोली- आनंदनगर चेक नाका मार्गे पुढे जाईल.
वाहतुकीस मुभा - कल्याण, डोंबिवली, पनवेल, महापे कडून मुंब्रा बायपास मार्गे हलकी चारचाकी वाहने व अत्यावश्यक सेवेतील वाहने रेतीबंदर रेल्वे पुलकडून खारेगाव टोलनाका मार्गे जातील.
इतर महत्त्वाच्या बातम्या
- महाराष्ट्रात राष्ट्रीय महामार्गाच्या कामात अडचणी, आपण लक्ष घालावं; नितीन गडकरी यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
- Partition Horrors Remembrance Day : पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा! 14 ऑगस्ट 'फाळणी वेदना दिन' म्हणून साजरा होणार
- मॉल, शॉपिंग सेंटरमध्ये प्रवेशासाठी घातलेल्या लसीकरणाच्या अटीला दुकान मालकांकडून कडाडून विरोध