एक्स्प्लोर
Chandrashekhar Bawankule : पात्र शेतकऱ्यांचीच कर्जमाफी करू', बावनकुळेंची मोठी घोषणा
शेतकरी नेते बच्चू कडू (Bachchu Kadu) यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर, सरकारने कर्जमाफीसाठी (Loan Waiver) एक प्रशासकीय समिती स्थापन केल्याची माहिती भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी दिली आहे. बावनकुळे म्हणाले, 'आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, अजित पवारजी, एकनाथ शिंदेजी यांनी आपल्या संकल्पनामध्ये दिलंय की आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू पण पात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी केली पाहिजे'. त्यांनी स्पष्ट केले की कर्जमाफी दोन प्रकारच्या शेतकऱ्यांसाठी तपासली जाईल. एक, जे नैसर्गिक आपत्तीमुळे कर्ज फेडू शकत नाहीत आणि दुसरे, ज्यांना फार्म हाऊस किंवा इतर कारणांसाठी कर्ज घेऊन त्याची गरज नाही. सरकारची भूमिका सकारात्मक असून, पात्र शेतकऱ्यांनाच कर्जमाफी देण्यावर सरकार ठाम असल्याचे त्यांनी सांगितले.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
चंद्रपूर
महाराष्ट्र
महाराष्ट्र
भारत
Advertisement
Advertisement

















