एक्स्प्लोर
Nagpur Protest: 'प्रशासनानं एकदम दुर्लक्ष केलंय', संतप्त आंदोलकांची सरकारवर टीका
नागपूरमध्ये (Nagpur) आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पावसाचा फटका बसला आहे. परसोडीच्या मैदानावर (Parsodi Ground) पावसामुळे प्रचंड चिखल झाल्याने आंदोलकांना जवळच्या मंगल कार्यालयात स्थलांतरित करण्यात आले आहे. 'प्रशासनानं एकदम दुर्लक्ष केलंय, सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी त्यांची होती', असा थेट आरोप आंदोलकांनी केला आहे. पावसामुळे झालेल्या चिखलामुळे दिव्यांग बांधवांसह सर्व आंदोलकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. प्रशासनाने पाण्याची आणि विजेची लाइन बंद केल्याचा दावाही आंदोलकांनी केला. अशा परिस्थितीत एका मंगल कार्यालयाच्या मालकाने विनामूल्य हॉल उपलब्ध करून दिल्याने आंदोलकांना मोठा दिलासा मिळाला. गैरसोय झाली असली तरी, जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















