Malaria Rise In Mumbai : मुंबईकरांनो सावधान! वाढतायत मलेरियाचे रूग्ण; 'बीएमसी'कडून काळजी घेण्याचे आवाहन
Mumbai News : मुंबईत मलेरियाचे रुग्ण वाढत असल्याने बीएमसीने लोकांना खबरदारी घेण्यास सांगितले आहे. यंदा 5 जूनपर्यंत शहरात मलेरियाचे 950 तर डेंग्यूचे 94 रुग्ण आढळून आले आहेत.
Malaria Cases In Mumbai : पावसाळा सुरू होण्यापूर्वीच जूनच्या पहिल्या पाच दिवसांत मुंबईत मलेरियाचे 57 रुग्ण आढळले आहेत. यातील बहुतांश प्रकरणे जी दक्षिण (एल्फिन्स्टन) आणि ई (भायखळा) वॉर्डातून येत आहेत. शहरात शनिवारी पावसाळा सुरू झाल्यानंतर डासांपासून पसरणाऱ्या आजारांमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याने, बीएमसीने लोकांना स्वतःहून औषधे घेणे टाळण्याचे निर्देश दिले आहेत. मलेरियाचे रुग्ण वाढत असल्याने डासांची उत्पत्ती होऊ नये यासाठी सर्व खबरदारी घ्यावी, असे बीएमसीने आवाहन केले आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला जारी करण्यात आलेल्या बीएमसी अॅडव्हायझरीमध्ये बेड नेट आणि विंडो शीट वापरण्यास सांगण्यात आले आहे.
यावर्षी 5 जूनपर्यंत मुंबईत मलेरियाचे 950 तर डेंग्यूचे 94 रुग्ण आढळले आहेत. या संदर्भात मृत्यूची कोणतीही माहिती समोर आली नाही. बीएमसीच्या प्राथमिक तपासणीत असे दिसून आले आहे की, प्रकरणे रहिवासी क्षेत्रातून आणि बांधकाम साइट्स दोन्हीमधून येत आहेत.
बीएमसीच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली 'ही' माहिती
मलेरिया आणि COVID-19 ची लक्षणे सारखीच असल्याने, डॉक्टरांनी रुग्णांना ताप, डोकेदुखी, पुरळ, स्नायू आणि सांधेदुखी, उलट्या आणि जुलाबाची तक्रार असल्यास उपचारात विलंब टाळण्याचा इशारा दिला आहे. बीएमसीच्या कार्यवाहक आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे म्हणाल्या, “आम्ही रोगाचा स्रोत शोधण्यासाठी सर्व मलेरिया प्रकरणांची वैयक्तिकरित्या तपासणी करत आहोत. कोविड-19 च्या भीतीमुळे अनेक लोक ताप आणि अंगदुखी यांसारख्या लक्षणांसह हॉस्पिटलमध्ये धाव घेत आहेत, ज्यामुळे वेळेवर निदान आणि उपचार होण्यास मदत होते.” इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, मलेरियाशिवाय मुंबईत जूनपूर्वी डेंग्यूचे 10 रुग्ण आढळले होते. पाच दिवसांत. याच कालावधीत, ई, एच पश्चिम (खार) आणि एच पूर्व (वांद्रे) वॉर्डांमध्ये वेक्टर-जनित गॅस्ट्रोची 78 प्रकरणे नोंदवली गेली.
महत्वाच्या बातम्या :