Mumbai Local Megablock : मुंबईकरांनो आज लोकलनं प्रवास करायचाय? त्याआधी जाणून घ्या मेगाब्लॉकबाबत...
Mumbai Local Megablock : मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर आज, म्हणजे 12 जून, रविवारी प्रवास करणार असाल तर ही बातमी नक्की वाचा. रविवारी मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे.
Mumbai Local Megablock : मुंबईकरांनो (Mumbai) आज घराबाहेर पडण्याचा विचार करत असाल, तर जरा थांबा. मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर आज रविवारी प्रवास करणार असाल तर ही बातमी नक्की वाचा. रविवारी मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. रविवार असल्यामुळे आज धावणाऱ्या लोकलची संख्या काही प्रमाणात कमी असणार आहे. मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे आणि हार्बर रेल्वे या तीन्ही रेल्वे मार्गावर रविवारी (12 जून) रोजी मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे जर तुम्ही घराबाहेर जाण्याचा विचार करणार असाल तर रेल्वेचं वेळापत्रक पाहूनच बाहेर पडा, असे आवाहन रेल्वेकडून करण्यात आले आहे. रेल्वे रुळांची दुरुस्ती आणि तांत्रिक कामांसाठी मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तर पश्चिम रेल्वे मार्गावर वसई रोड ते भाईंदरदरम्यान रात्री जम्बो ब्लॉकची घोषणा करण्यात आली आहे.
मध्य रेल्वे मार्ग
कुठे - सीएसएमटी ते विद्याविहार अप आणि डाऊन धीम्या मार्गावर
कधी- रविवारी सकाळी 10.55 ते दुपारी 3.55 पर्यंत
सीएसएमटी येथून सकाळी 10.48 ते दुपारी 3.49 पर्यंत सुटणाऱ्या धीम्या रेल्वेगाड्या सीएसएमटी ते विद्याविहार स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवल्या जातील. या ट्रेन भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांवर थांबतील आणि पुढे धीम्या डाऊन मार्गावर वळवल्या जातील. याशिवाय घाटकोपर येथून सकाळी 10.41 ते दुपारी 3.52 पर्यंत सुटणाऱ्या अप धीम्या सेवा विद्याविहार ते सीएसएमटीदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकात थांबतील.
हार्बर मार्ग
कुठे - सीएसएमटी चुनाभट्टी, वांद्रे हार्बर डाऊन मार्गावर
कधी- रविवारी सकाळी 11.40 ते सायंकाळी 4.40 पर्यंत आणि चुनाभट्टी/वांद्रे- सीएसएमटी अप हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.10 पर्यंत.
पश्चिम रेल्वे
कुठे- वसई ते भाईंदर स्थानकादरम्यान अप-डाऊन जलद मार्गावर आणि वांद्रे ते माहीमदरम्यान
कधी - रविवारी रात्री 12.30 ते पहाटे 4 वाजेपर्यंत.
अप-डाऊन जलद मार्गावरील काही लोकल सेवा रद्द. हार्बर मार्गावरील वांद्रे ते माहीम स्थानकादरम्यान तांत्रिक कामांसाठी रविवारी सकाळी 10.55 ते दुपारी 4.55 वाजेपर्यंत अप आणि डाऊन मार्गवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पुढील 15 दिवस डाऊन दिशेने जाणारी लोकल माहीम थांबणार नाही.
हे मेंटेनन्स मेगा ब्लॉक्स पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत. प्रवाशांना विनंती करण्यात येते की, होणार्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे, असं मध्य रेल्वेनं म्हटलं आहे.