एक्स्प्लोर

मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले, विद्यापीठ राजकीय दबावाला बळी, अमित ठाकरेंची टीका

22  सप्टेंबर 2024 रोजी मुंबई विद्यापीठाच्या (Mumbai University) पदवीधर सिनेट निवडणुका पार पडणार होत्या. मात्र, विद्यापीठाने रात्री एक परिपत्रक काढून निवडणुका पुढे ढकलल्याचे जाहीर केलंय.

Amit Thackeray on Mumbai University Election : 22  सप्टेंबर 2024 रोजी मुंबई विद्यापीठाच्या (Mumbai University) पदवीधर सिनेट निवडणुका पार पडणार होत्या. मात्र, विद्यापीठाने पुन्हा एकदा मागील वेळेसारखंच रात्रीच एक परिपत्रक काढून निवडणुका अनिश्चित काळासाठी पुढे ढकलल्याचे जाहीर केलं आहे. ही काही पहिली वेळ नाही. मागील निवडणुका जाहीर झाल्यानंतरही रात्रीच्या वेळीच राजकीय दबावाला बळी पडून परिपत्रक काढले गेले होते. आता दुसऱ्यांदा अशाच प्रकारे सिनेट पदवीधर निवडणुकांसंदर्भात परिपत्रक काढण्यात आले आहे. प्रत्येक वेळी रात्रीच परिपत्रक निघते, त्यामुळं मुंबई विद्यापीठाचा कारभार रात्रीस खेळ चाले या मालिकेसारखा चालू आहे की काय? असा प्रश्न सर्वांना पडला असल्याचे मत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे. याबाबत अमित ठाकरे ( Amit Thackeray ) यांनी ट्वीटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. 

मुळात कोणतीही निवडणूक, मग ती स्थानिक स्वराज्य संस्थेची असो, विधानसभेची असो, लोकसभेची असो, अथवा मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुका असो, या सहकारी व पदाधिकाऱ्यांच्या मेहनतीवर आणि परीश्रमांवर लढवल्या जातात. त्यासाठी राजकीय संघटनांचे, विद्यार्थी संघटनांचे अनेक सहकारी व पदाधिकारी दिवस-रात्र परिश्रम करत असतात. परंतू, मुंबई विद्यापीठाने जर सिनेट पदवीधर निवडणुका जाहीर करुन रद्द करण्याचेच धोरण अवलंबले असेल, तर याचा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना जाहीर निषेध करते. निवडून आलेले सिनेट सदस्य हे विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी लढून त्यांना त्यांचे हक्क मिळवून देतात. त्यामुळेच या निवडणुकांचे गांभीर्य विद्यापीठाला लवकरात लवकर समजले तर बरे होईल असे अमित ठाकरे यांनी म्हटलं आहे. 

मुंबई विद्यापीठ हे राजकीय दबावाला बळी पडतेय

मागील वेळीसुद्धा जेव्हा विद्यापीठाने निवडणुका रद्द केल्या होत्या, तेव्हा मी स्वतः पत्रकार परिषद घेऊन या बाबतीत मुंबई विद्यापीठाच्या अनाकलनीय कारभाराचा जाहीर निषेध केला होता. मुंबई विद्यापीठ हे राजकीय दबावाला बळी पडत असून, एक स्वतंत्र यंत्रणा म्हणून त्यांनी काम करणे अपेक्षित आहे. परंतु, त्यांची ही भूमिका संशयास्पद असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. म्हणूनच यावेळी जेव्हा मुंबई विद्यापीठाने पुन्हा निवडणुका जाहीर केल्या, त्याचवेळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने या निवडणुकांचा सखोल अभ्यास केला आणि निवडणुका कायद्याला धरून नसल्याचे लक्षात आल्याने, त्या पुन्हा पुढे ढकलल्या जातील अशी शक्यता आधीच व्यक्त केली होती.

विद्यापीठ प्रशासनाने निवडणुकीचा चालवलेला हा खेळ बंद करावा

माझे सहकारी निवडणूक लढवण्याच्या बाजूने होते. त्यांचा सन्मान राखत, त्यांना विद्यापीठाचा भविष्यातील भोंगळ कारभार समजावून सांगितला आणि त्यांनाही परिस्थितीची जाणीव झाली. त्यामुळेच माझ्या सहकारी आणि पदाधिकाऱ्यांचे परीश्रम वाया जाऊ नयेत, म्हणून आम्ही 22 सप्टेंबर 2024 रोजी होणाऱ्या सिनेट पदवीधर निवडणुका न लढवण्याचा निर्णय घेतला. आज मुंबई विद्यापीठाने परिपत्रक काढून निवडणुका अनिश्चित काळासाठी पुढे ढकलल्या आहेत, हे पाहून आम्ही घेतलेला निर्णय योग्य असल्याचे सिद्ध झाल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. मुंबई विद्यापीठ प्रशासनाला लवकरच निवडणुकीचा चालवलेला हा खेळ बंद करण्याची सद्बुद्धी येवो, ही अपेक्षा व्यक्त करतो असेअमित ठाकरे म्हणाले. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेच्या निकालापूर्वी मुंबईतून मोठी अपडेट, काँग्रेसच्या नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, मुंबई पोलीस अलर्ट मोडवर
काँग्रेसच्या नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, मुंबई पोलीस अलर्ट मोडवर
Prakash Ambedkar : विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
Maharashtra Vidhan Sabha Result 2024: विधानसभेच्या निकालापूर्वी महायुतीने ‘प्लॅन बी’ आखला, बहुमत मिळालं नाही तर.....
एक्झिट पोलचे निकाल अनुकूल, पण महायुतीचा भरवसा नाही, बॅकअप प्लॅन आखला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेच्या निकालापूर्वी मुंबईतून मोठी अपडेट, काँग्रेसच्या नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, मुंबई पोलीस अलर्ट मोडवर
काँग्रेसच्या नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, मुंबई पोलीस अलर्ट मोडवर
Prakash Ambedkar : विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
Maharashtra Vidhan Sabha Result 2024: विधानसभेच्या निकालापूर्वी महायुतीने ‘प्लॅन बी’ आखला, बहुमत मिळालं नाही तर.....
एक्झिट पोलचे निकाल अनुकूल, पण महायुतीचा भरवसा नाही, बॅकअप प्लॅन आखला
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
ब्रेकअप झाल्यामुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
ब्रेकअपमुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Embed widget