Mumbai Rains Live Updates: मुंबईत पावसाची विश्रांती, लोकल ट्रेनची वाहतूक पूर्वपदावर, हवामान खात्याचा ऑरेंज अलर्ट कायम
Mumbai Rain Live updates Today : मुंबईत मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे लोकल ट्रेन आणि मोनो रेलच्या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. काल रात्रीपर्यंत लोकल ट्रेनची वाहतूक विस्कळीत होती.
LIVE

Background
Heavy Rain in Mumbai Today Update : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत तुफान पाऊस सुरु आहे. बुधवारी हवामान खात्याने मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे. काल मंगळवारी तुफान पावसामुळे रस्ते आणि रेल्वे वाहतुकीचे तीनतेरा वाजले होते. त्यामुळे घराबाहेर पडलेल्या नागरिकांचे प्रचंड हाल झाले होते. मध्य, हार्बर, पश्चिम रेल्वे अशा सर्व मार्गावर लोकल ट्रेनची वाहतूक विस्कळीत झाली होती. ही वाहतूक अद्यापही पूर्णपणे सुरळीत झालेली नाही. त्यामुळे आजही मुंबईकरांनी आणि मुंबईत येणाऱ्यांनी विचार करुनच घराबाहेर पडावे, असा सल्ला प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा गुजरातकडे सरकत आहेत. हे क्षेत्र बुधवारी गुजरातकडे सरकल्यानंतर पावसाचा जोर कमी होईल असं हवामान खात्याच म्हणणं आहे. काल रात्री पावसाने थोडीफार उसंत घेतली असली तरी पहाटेपासून आकाशात काळ्या ढगांची गर्दी पाहून येत्या काही तासांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
Mumbai Rain : कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर मुसळधार पावसामुळे उल्हास नदीवरील पूल पाण्याखाली, महामार्ग वाहतुकीस बंद
कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर मुसळधार पावसामुळे उल्हास नदीवरील पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून हा महामार्ग तातडीने बंद करण्यात आला आहे.
दरम्यान, नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या नदीवर नव्याने पूल उभारण्याचे काम सुरू असून, त्या ठिकाणी तब्बल 30 कामगार अडकले होते. स्थानिकांच्या मदतीने या सर्व कामगारांना सुरक्षित स्थळी हलवले.
सततच्या पावसामुळे नंदुरबार जिल्ह्यातील तापी नदीला मोठा पूर
पाणी पातळीत वाढ झाल्याने हतनूर धरणाचे 41 पैकी 24 दरवाजे उघडल्याने तापी नदीला पूर....
नंदुरबार जिल्ह्यातील प्रकाशा आणि सारंगखेडा या मध्यम प्रकल्प बॅरेज मधून तापी नदीत 2 लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू....
प्रकाशा आणि सारंगखेडा तापी नदीच्या काठावरील 33 गावांना सतर्कतेचा इशारा....
प्रकाशा बॅरेज चे 6 दरवाजे उघडले पूर्ण क्षमतेने.....
संभाव्य धोके टाळण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन...
धरणातून तापी नदीत पत्रात 1 लाख 57 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू....























