Mumbai Heavy Rains: मुंबईकरांनो सावधान, घराबाहेर पडताना विचार करा, पुढील चार तास अतिवृष्टी होणार, हवामान खात्याची महत्त्वाची अपडेट
Mumbai Rain news: मुंबईत आजही मुसळधार पाऊस, आकाशात काळ्या ढगांची गर्दी, हवामान खात्याचा रेड अलर्ट खरा ठरला. गरज असेल तरच घराबाहेर पडा, महापालिकेची नागरिकांना सूचना

Mumbai Heavy Rains: गेल्या तीन दिवसांपासून मुंबईत सुरु असलेल्या मुसळधार पावसाचा जोर मंगळवारी चौथ्या दिवशीही कायम आहे. काल रात्रीपासून मुंबईत पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. आज पहाटे या पावसाचा जोर आणखीनच वाढला आहे. हवामान खात्याने कालच मुंबई, ठाणे आणि कोकणातील काही जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला होता. हा रेड अलर्ट खरा ठरला आहे. त्यानुसार मुंबईत गेल्या काही तासांपासून विनाखंड मुसळधार पावसाच्या (Heavy Rain) सरी कोसळत आहेत. मुंबई आणि उपनगरात सर्वत्र पावसाचा जोर आहे. सध्याची स्थिती पाहता पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. मंगळवारी सकाळी हवामान खात्याकडून मुंबईतील पावसासंदर्भात (Mumbai Rain news) एक महत्त्वाचा अंदाज जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार येत्या तीन ते चार तासांमध्ये मुंबईत अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. या काळात मुंबईत पावसाच्या जोरदार सरी बरसणार आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिका प्रशासनाने नागरिकांना गरज नसल्यास घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. मुंबईतील शाळा आणि महाविद्यालयांना कालच सुट्टी जाहीर करण्यात आली होती. मुंबई विद्यापीठाच्या परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र गुजरातकडे सरकत आहे. हे क्षेत्र मुंबईजवळ असल्याने त्याचा प्रभाव मंगळवारी देखील जाणवणार आहे. मंगळवारी मुंबईत मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. हे क्षेत्र बुधवारी गुजरातकडे सरकल्यानंतर पावसाचा जोर कमी होईल, असं हवामान खात्याकडून सांगण्यात आले होते. मुंबईत रात्रभर पाऊस कोसळत असून आज दिवसभर अशीच परिस्थिती असणार आहे. त्यामुळे गरज असेल तरच बाहेर पडा असे आवाहन पालिकेच्यावतीने करण्यात आले आहे. मुंबईतील परळच्या पुलाखाली मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून कामावर जाणाऱ्या नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
मुसळधार पावसामुळे मुंबईतील सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. दादरच्या हिंदमाता परिसरात गुडघाभर पाणी साठले आहे. परळ परिसरातही मोठ्याप्रमाणावर पाणी साचले आहे. सोमवारी मुसळधार पाऊस असला तरी पाण्याचा बऱ्यापैकी निचरा होत होता. मात्र, गेल्या काही तासांमध्ये सतत पाऊस सुरु असल्याने आता पाणी तुंबायला लागले आहे. पाण्याचा उपसा करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पंपांची क्षमताही कमी ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता पुढील काही तासांमध्ये मुंबईत नक्की काय होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
Heavy Rain Mumbai: मुंबईच्या पश्चिम उपनगरात मुसळधार पाऊस
मुंबईच्या पश्चिम उपनगरात रात्री पासून जोरदार पाऊस सुरू आहे.पश्चिम उपनगरात अंधेरी जोगेश्वरी,गोरेगाव, मालाड,कांदिवली,बोरिवली,दहिसर, विलेपार्ले, सांताक्रूझ,वांद्रे या सर्व परिसरात पाऊस सुरू आहे. पावसाचा जोर कमी असल्यामुळे पश्चिम उपनगरात कुठेही सखल भागात पाणी भरले नव्हते. जर असाच जोरदार पाऊस सुरु राहिला तर पश्चिम उपनगरात जे सखल भाग आहे त्या ठिकाणी पाणी भरायला सुरुवात होईल.
Mumbai Local Train news: मुंबईतील लोकल ट्रेनची परिस्थिती काय?
मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मध्य रेल्वेची वाहतूक 20 ते 25 मिनिटे उशिराने सुरु आहे. हार्बर रेल्वे 10 ते 15 मिनिटे उशिराने धावत आहे. तर पश्चिम रेल्वेमार्गावरील गाड्याही 10 मिनिटे उशीरा आहेत.
आणखी वाचा
























