एक्स्प्लोर

Mumbai Pollution : प्रदूषणामुळं मुंबईचा 'श्वास' गुदमरला, हवेची पातळी घसरण्याचं कारण काय?

प्रदूषणामुळं मुंबईकरांचा श्वास गुदमरला आहे. मुंबईत हवेची पातळी घसरली आहे. त्यामुळं नागरिकांनी काळजी घेणं गरजेचं आहे.

Mumbai Pollution : गेल्या काही दिवसांपासून मुंबईची हवा (Mumbai Air quality) बिघडल्याचे चित्र आहे. मुंबईच्या हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस घसरत चालली आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईची हवा अत्यंत खराब पातळीपर्यंतही पोहोचली होती. आता पुन्हा त्याच धोक्याच्या पातळीवर मुंबईची हवा आली आहे. त्यामुळं मुंबईकरांनी काळजी घेणं गरजेचं आहे. 

समुद्राकडून येणाऱ्या वाऱ्याचा वेग मंदावला

मुंबईतील हवेची गुणवत्ता सध्या अतिखराब वर्गात पोहोचली आहे. वातावरणात पसरलेली धूळ आणि धुराचे कण यामुळं दृश्यमानता अतिशय कमी झाली आहे. या परिस्थितीमुळं मुंबईकरांना सध्या खोकला आणि घश्याचे त्रास जाणवू लागले आहेत. अशा परिस्थिती श्वसनाचे विकार असलेल्यांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे. तापमानात अचानक झालेली घट आणि समुद्राकडून येणाऱ्या वाऱ्याचा मंदावलेला वेग यामुळं पुढचे काही दिवस हीच परिस्थिती कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याशिवाय मुंबईत कोस्टल रोड, मेट्रो यासारखी विकासकामंही युद्धपातळीवर सुरू असल्यानं हे प्रदूषण येत्या काळातही कायम राहणार आहे.

मुंबईचा एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) 293

वाढत्या प्रदुषणामुळं मुंबईतील हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस खराब होत चालली आहे. सध्या मुंबईचा एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) 293-खराब आणि 300-400 'अत्यंत खराब' पातळीच्या जवळ पोहोचली आहे. ज्यामुळं मुंबईकरांना श्वसनाच्या समस्या जाणवू लागल्या आहेत. मागील आठवड्यात, मुंबईतील हवेची पातळी 232 आणि 270 च्या दरम्यान होती. त्यामुळं ती मध्यम पातळीवर घसरली होती. सध्या मुंबईचा AQI 'खराब' दर्शवण्यात आला असून पुढील दोन दिवस तो 'खराब'च राहण्याची शक्यता आहे. असा अंदाज SAFAR च्यावतीनं सांगण्यात आला आहे. त्यामुळं सध्याच्या काळात खासकरून श्वसनाचे आजार असणाऱ्या नागरिकांनी काळजी घ्यावी, तसेच मास्कचा वापर करणं फायद्याचं ठरेल.

प्रदुषणाची पातळी घसरण्याचं कारण काय?

प्रदुषणाची ही पातळी अचानक घसरण्यामागंच मुख्य कारण म्हणजे तापमानात झालेली घट आणि समुद्रातून येणाऱ्या वाऱ्यांचा कमी झालेला वेग हे आहे. यामुळं वाहनांमधून उत्सर्जित होणारा धूर आणि धूळ वातावरणात तसेच राहतात. त्यामुळं प्रदुषण वाढल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली आहे. साधारणत: हिवाळ्यात नोव्हेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत मुंबईची हवा सर्वात जास्त प्रदूषित असते. यंदा मात्र नोव्हेंबरचा शेवटचा आठवडा आणि डिसेंबरचा पहिला आठवडा सर्वात प्रदूषित होता. ज्यात AQI ही गेल्या तीन-चार वर्षांपेक्षा जास्त होता. नोव्हेंबरच्या दुसऱ्या  आठवड्यात तर मुंबईनं दिल्लीपेक्षा जास्त AQI नोंदवला होता.

महत्त्वाच्या बातम्या:

Vidarbha Air quality : राज्यात अमरावतीची हवा सर्वात स्वच्छ, तर चंद्रपूरची हवा देशात सर्वाधिक प्रदूषित

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
कोणी हस्तक्षेप करुन कुणबी प्रमाणपत्र रद्द केली असतील तर त्यावर यंत्रणा बसवण्याचा विचार, जरांगेंच्या टीकेनंतर उदय सामंतांचं प्रत्युत्तर 
कोणी हस्तक्षेप करुन कुणबी प्रमाणपत्र रद्द केली असतील तर त्यावर यंत्रणा बसवण्याचा विचार, जरांगेंच्या टीकेनंतर उदय सामंतांचं प्रत्युत्तर 
धक्कादायक! तोल गेला हात निसटला, धावत्या लोकलमधून थेट खाली पडला, मुंबई फिरण्यासाठी गेलेल्या 17 वर्षीय युवकाचा  मृत्यू
धक्कादायक! तोल गेला हात निसटला, धावत्या लोकलमधून थेट खाली पडला, मुंबई फिरण्यासाठी गेलेल्या 17 वर्षीय युवकाचा  मृत्यू
Vasai News: हातात एक वर्षाची चिमुकली, स्कूटीवरून प्रवास; वाऱ्याने केस विस्कटले, आई केस बांधत असतानाच अनर्थ घडला, वसईतील काळीज पिळवटून टाकणारी घटना
हातात एक वर्षाची चिमुकली, स्कूटीवरून प्रवास; वाऱ्याने केस विस्कटले, आई केस बांधत असतानाच अनर्थ घडला, वसईतील काळीज पिळवटून टाकणारी घटना

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Embed widget