एक्स्प्लोर

Mumbai Police New Year Celebration : न्यू ईयर सेलिब्रेशनसाठी लोकांचा उत्साह; मुंबई पोलीस अलर्ट मोडवर, समुद्र किनारी सुरक्षा वाढवली

Mumbai Police on New Year Celebration : न्यू ईयर सेलिब्रेशन मूडला गालबोट लागू नये यासाठी मुंबई पोलीस अलर्ट मोडवर आहे. मुंबई पोलिसांकडून ठिकठिकाणी बंदोबस्तात वाढ केली आहे. पोलिसांनी समुद्रकिनारी देखील सुरक्षा वाढवली आहे.

Mumbai Police on New Year Celebration :  सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नव्या वर्षाचे (New Year Celebration) उत्साहात स्वागत करण्यासाठी मुंबईतील विविध ठिकाणांसह गेट वे ऑफ इंडियासह इतर समुद्र किनारी मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. सेलिब्रेशन मूडला गालबोट लागू नये यासाठी मुंबई पोलीस अलर्ट मोडवर आहे. मुंबई पोलिसांकडून ठिकठिकाणी बंदोबस्तात वाढ केली आहे. पोलिसांनी समुद्रकिनारी देखील सुरक्षा वाढवली आहे.  नवीन वर्ष संपूर्ण शहरात शांततेत साजरे व्हावे यासाठी मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) संपूर्ण मुंबईतील समुद्रकिनारी सुरक्षा वाढवली आहे. मुंबई पोलिसांनी 18 बोटी सागरी सीमेवर तैनात केल्या आहेत. 18 बोटींपैकी 16 बोटी महत्त्वाच्या ठिकाणी तर 2 बोटी स्टँडबाय ठेवण्यात आल्या आहेत.

या बोटींवर प्रत्येकी 1 पोलीस अधिकारी आणि 4 पोलीस हवालदार शस्त्रांसह असतील. 31 डिसेंबरच्या सकाळपासून 1 जानेवारीच्या सकाळपर्यंत 24 तास तैनात पोलीस बंदोबस्त असणार आहे. 

या ठिकाणी असणार नौका तैनात...

गेटवे ऑफ इंडिया- ताज हॉटेल, मरीन ड्राईव्ह, गिरगाव चौपाटी, वरळी सीफेस, वांद्रे ताज लँड, जुहू चौपाटी, अक्सा बीच, ट्रॉम्बे माहुल जेट्टी, भाऊचा धक्का आदी महत्त्वाच्या ठिकाणांवर नौका तैनात करण्यात आल्या आहेत. सेलिब्रेशनसाठी लोकांनी समुद्रात जाऊ नये यासाठीही पोलीस लक्ष देणार आहेत. कोणतीही अनुचित घटना घडू नये, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठीदेखील पोलीस काळजी घेणार आहेत. 


पोलिसांचे 'ऑपरेशन ऑल आऊट'; नाकाबंदी, कॉम्बिंग ऑपरेशन

नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनला गालबोट लागू नये यासाठी मुंबईत पोलिसांकडून ठिकठिकाणी नाकाबंदी, बंदोबस्त करण्यात आला आहे. वाहतुकीचे नियम न पाळणार, हेल्मेटचा वापर न करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई सुरू आहे. त्याशिवाय, पोलिसांनी ऑपरेशन ऑल आउट राबवले. पोलिसांनी कॉम्बिंग ऑपरेशनमध्ये काही जणांना ताब्यात घेतले आहे. अजामिनपत्र वॉरंटची अंमलबजावणी करून 77 जणांना अटक करण्यात आली आहे. बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगणाऱ्या 49 कारवाया करण्यात आलेल्या असून त्यात चाकू तलवारी शस्त्रे जप्त करण्यात आलेले आहेत. 

दारू जुगार आदी अवैधपणे व्यवसाय सुरू असलेल्या एकूण 95 ठिकाणी छापे टाकून 63 आरोपी त्यांना अटक करण्यात आली आहे. मुंबई शहराबाहेर तडीपार केलेल्या परंतु मुंबई शहरात विनापरवाना प्रवेश केलेला 50 तडीपार आरोपींना अटक करण्यात आली आहे.

या कॉम्बिंग ऑपरेशनसाठी 212 ठिकाणी नाकेबंदी करण्यात आली होती. तर, एकूण 7964 वाहनांची तपासणी करण्यात आली. 

वाहतूक व्यवस्थेत बदल 

नव वर्षाच्या स्वागतासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. अशातच नववर्षाच्या निमित्तानं सर्व काही सुरळीत होण्यासाठी प्रशासनंही पुर्ण तयारीत आहे. नव्या वर्षाच्या पूर्वसंध्येला वाहतूक कोंडी (Traffic Congestion) आणि गर्दी (Crowd) टाळण्यासाठी मुंबई पोलिसांनी आणि वाहतूक पोलिसांनी मुंबईतील गिरगाव, जुहू चौपाटी, गेटवे ऑफ इंडिया या परिसरामध्ये वाहतुकीत आणि पार्किंगच्या व्यवस्थेत काही बदल केलेले आहेत.  

इतर महत्त्वाच्या बातम्या : 

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन मंजूर
Maharashtra Live News Updates: डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन मंजूर
Narendra Dabholkar and Sachin Andure: मोठी बातमी: डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन, जन्मठेपेच्या शिक्षेलाही स्थगिती
मोठी बातमी: डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन, जन्मठेपेच्या शिक्षेलाही स्थगिती
Mira Bhayandar Accident News: भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
CM Devendra Fadnavis Maharashtra Government: मोठी बातमी: मुख्यमंत्र्यांना कोणत्याही मंत्र्याचा निर्णय फिरवण्याचा अधिकार, राज्य सरकारकडून नियमात महत्त्वाचा बदल
मोठी बातमी: मुख्यमंत्र्यांना कोणत्याही मंत्र्याचा निर्णय फिरवण्याचा अधिकार, राज्य सरकारकडून नियमात महत्त्वाचा बदल

व्हिडीओ

Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut : 'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
Mumbai Navy Nagar Family Death Case: पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
Aus vs Ban 2nd Test Squad Update : सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
Global Food Crisis Warning Marathi News: 2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
Laxman Hake and Manoj Jarange Patil: तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
Mira Bhayandar Accident News: भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
BMC BEST Depot Redevelopment: मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
Narendra Dabholkar and Sachin Andure: मोठी बातमी: डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन, जन्मठेपेच्या शिक्षेलाही स्थगिती
मोठी बातमी: डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन, जन्मठेपेच्या शिक्षेलाही स्थगिती
Embed widget