एक्स्प्लोर
मुंबईतल्या बीकेसीत होणारा सनबर्न फेस्टिव्हल रद्द
मुंबई : मुंबई महापालिकेप्रमाणेच मुंबई पोलिसांनीही सनबर्न फेस्टिव्हलला परवानगी नाकारली आहे. त्यामुळे सनबर्नला मुंबईतला कार्यक्रम रद्द करावा लागणार आहे.
सनबर्नने सुरुवातीला मुंबईतल्या महालक्ष्मी रेसकोर्सवर इंटरनॅशनल म्युझिक फेस्टिव्हलचं आयोजन केलं होतं. मात्र आवश्यक त्या परवानग्या न घेतल्यामुळे मुंबई महापालिकेनं रेसकोर्सवर कार्यक्रम आयोजित करायला नकार दर्शवला. तसंच या कार्यक्रमाचं तिकीट खरेदी करु नये, असं आवाहनही केलं.
त्यानंतर सनबर्नने बीकेसी ग्राऊंडवर कार्यक्रम घेण्याचं ठरवलं. मात्र पोलिसांनी परवानगी नाकारल्यामुळे सनबर्नला इथेही कार्यक्रम घेता येणार नाही.
संबंधित सरकारी यंत्रणांकडून परवानग्या न घेतल्यामुळे सनबर्नने बंगळुरुमध्ये आयोजित केलेला कार्यक्रमही अडचणीत आला होता. तर पुण्यातील फेस्टिव्हलमध्येही नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी सनबर्नला 1 कोटी 40 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement