एक्स्प्लोर

Mumbai Crime: पोलीस शिपाई विशाल पवारच्या मृत्यूबाबत धक्कादायक माहिती, फटका गँगच्या लाल विषारी इंजेक्शनमुळे नव्हे तर या कारणामुळे...

Mumbai News: 28 एप्रिलच्या रात्री विशाल पाटील याच्यासोबत मुंबई लोकल ट्रेनमध्ये काय घडलं होतं? रेल्वे पोलिसांकडून न्यायालयात महत्त्वाचा अहवाल सादर. धक्कादायक माहिती, विशालचा मृत्यू नेमका कसा झाला?

मुंबई: काही दिवसांपूर्वी मुंबई पोलीस दलातील शिपाई पदावर कार्यरत असलेल्या विशाल पवार या कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू झाला होता. सुरुवातीला विशाल पवार (Vishal Pawar) याने फटका गँगने आपल्याला विषारी इंजेक्शन दिल्याचा दावा केला होता. यानंतर काही तासांतच त्याचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली होती. यानंतर रेल्वे पोलिसांनी (Railway Police) याप्रकरणाचा तपास सुरु केला होता. या तपासात आता धक्कादायक माहिती समोर आली आहे.
 
मुंबई पोलिस दलातील शिपाई विशाल पवार मृत्यू प्रकरणी रेल्वे पोलिसांनी बी समरी अहवाल न्यायालयात दाखल केला आहे. 28 एप्रिल रोजी लोकल ट्रेनमधून (Mumbai Local Train) प्रवास करत असताना माटुंगा येथे फटका गँगने (Fatka Gang)  मोबाईल हिसकावल्याचा दावा विशालने केला होता. चोरांचा पाठलाग केला त्यावेळी त्यांनी विषारी इंजेक्शन देऊन बेशुद्ध केलं असे विशालने तक्रारीत म्हटले होते. उपचारादरम्यान विशालचा मृत्यू झाला होता. रेल्वे पोलिसांनी  घटनेचं गांभीर्य ओळखून सीसीटीव्ही आणि मृत व्यक्तीचे मोबाईल फोन, सीडीआर आणि लोकेशन तपासल्यानंतर विशाल त्यावेळी घटनास्थळी असल्याचे कोणतेही पुरावे मिळाले नव्हते. तपासात वेगळीच माहिती समोर आली होती. अतिमद्यपान सेवन केल्यामुळे विशाल हा ड्युटीवर हजर न राहिल्याने त्याने हा बनाव रचल्याचे पुढे तपासात समोर आले. या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी आता हा गुन्हा रद्द करण्याबाबत न्यायालयात बी समरी रिपोर्ट सादर केला आहे.

विशाल पवार रात्री 12 वाजता दादरमधील कैलास लस्सीच्या दुकानाजवळ दिसला

विशाल पवारच्या मृत्यूनंतर मुंबईत एकच खळबळ उडाली होती. त्यामुळे लोहमार्ग पोलिसांनी तातडीने आणि कसून याप्रकरणाचा तपास सुरु केला. रेल्वे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासल्यावर विशाल पवारने दावा केल्याप्रमाणे त्याच्यात आणि चोरांमध्ये कोणतीही झटापट झाली नसल्याने आढळून आले. विशाल पवार याने 28 एप्रिलच्या रात्री साडेनऊ वाजता लोकल ट्रेनच्या दरवाजात उभे असताना फटका गँगने आपला मोबाईल हिसकावल्याचे म्हटले होते. त्यानंतर माटुंगा आणि सायन रेल्वे स्थानकांदरम्यान आपली चोरांशी झटापट झाली आणि त्यांनी आपल्या विषारी इंजेक्शन दिल्याचा दावा विशालने मृत्यूपूर्वी केला होता. मात्र, रेल्वे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता  घटनेच्या रात्री 12 वाजेपर्यंत तो दादरच्या कैलास लस्सी दुकानाजवळ असल्याचे दिसून आले होते. 

आणखी वाचा

विशाल पवार रात्री 12 वाजता दादरमधील कैलास लस्सीच्या दुकानाजवळ दिसला; जबाबात वेगळचं बोलला, गूढ उलगडणार?

About the author सुरज सावंत

सुरज सावंत हे जवळपास 10 वर्षांपासून माध्यमात कार्यरत आहेत. राजकारण, क्राईम यावर त्यांचा विशेष पकड आहे.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
Eknath Shinde: मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
मोठी बातमी! केवळ 500 रुपयांत स्टेडियम दिलं, 29 वर्षांचा करार; कोट्यवधींचा महसूल बुडवल्याचा धक्कादायक प्रकार
मोठी बातमी! केवळ 500 रुपयांत स्टेडियम दिलं, 29 वर्षांचा करार; कोट्यवधींचा महसूल बुडवल्याचा धक्कादायक प्रकार

व्हिडीओ

Uddhav Thackeray On Amit Shah : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा अमित शाहांवर वार
Uddhav Thackeray PC FULL : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा Amit Shah यांच्यावर वार
Mahapalikecha Mahasangram Bhiwandi : पाणी, रस्ते,आरोग्य... मूलभूत सुविधांची वानवा ; भिवंडीकर आक्रमक
Mahapalikecha Mahasangram Amravati : भावी नगरसेवकांकडून अमरावतीकरांच्या अपेक्षा काय?
Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
Eknath Shinde: मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
मोठी बातमी! केवळ 500 रुपयांत स्टेडियम दिलं, 29 वर्षांचा करार; कोट्यवधींचा महसूल बुडवल्याचा धक्कादायक प्रकार
मोठी बातमी! केवळ 500 रुपयांत स्टेडियम दिलं, 29 वर्षांचा करार; कोट्यवधींचा महसूल बुडवल्याचा धक्कादायक प्रकार
Gold Silver Rate : 2025 मध्ये सोने- चांदीचे गुंतवणूकदार मालामालं, सोनं 52795 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 1 लाखांची वाढ, जाणून घ्या आजचे दर
सोने चांदीचे गुंतवणूकदार मालामाल, सोनं 52795 रुपयांनी महागलं तर चांदीच्या दरात 1 लाखांची वाढ
Patanjali : समर्पणासह देश सेवा, पतंजली व्यवसाय नव्हे तर पारदर्शक अन् स्वदेशी मिशन, जाणून घ्या
समर्पणासह देश सेवा, पतंजली व्यवसाय नव्हे तर पारदर्शक अन् स्वदेशी मिशन, जाणून घ्या
कोकणातील शेतकऱ्यांना केवळ 7 हजार, इतर जिल्ह्यात 22 हजार; निलेश राणेंचा थेट विधिमंडळात सवाल
कोकणातील शेतकऱ्यांना केवळ 7 हजार, इतर जिल्ह्यात 22 हजार; निलेश राणेंचा थेट विधिमंडळात सवाल
Uddhav Thackeray: अमित शाहांनी वंदे मातरमवर चर्चा संघाची कपडे उतरवण्यासाठी केली का? अजून बऱ्याच गोष्टी बाहेर येतील; उद्धव ठाकरेंनी थेट श्यामा प्रसाद मुखर्जींपासून कुंडलीच बाहेर काढली
अमित शाहांनी वंदे मातरमवर चर्चा संघाची कपडे उतरवण्यासाठी केली का? अजून बऱ्याच गोष्टी बाहेर येतील; उद्धव ठाकरेंनी थेट श्यामा प्रसाद मुखर्जींपासून कुंडलीच बाहेर काढली
Embed widget