एक्स्प्लोर

Mumbai News : दहिसरमध्ये महिलांच्या अग्निशमन दलाच्या भरतीदरम्यान गोंधळ, मुलींना पोलिसांनी घेतलं ताब्यात 

Mumbai News : दहिसरमध्ये (Dahisar) महिलांच्या अग्निशमन दलाच्या भरतीदरम्यान (Fire Brigade Recruitment) गोंधळ झाला आहे.

Mumbai News : दहिसरमध्ये (Dahisar) महिलांच्या अग्निशमन दलाच्या भरतीदरम्यान (Fire Brigade Recruitment) गोंधळ झाला आहे. जास्त उंचीच्या मुलींना बाहेर काढल्याचा आरोप करण्यात आला आहे. सध्या मुलींनी दहिसरमध्ये आंदोलन (Agitation) सुरू केले आहे. गोंधळ झाल्यामुळं दहिसरमध्ये पोलिसांचा (Police) मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. 

162 सेमी पेक्षा जास्त उंची असलेल्या मुलींनाही बाहेर काढल्याचा आरोप 

जास्त उंचीच्या मुलींना देखील बाहेर काढल्याचा आरोपांवरुन दहिसरमध्ये (Dahisar) महिलांच्या अग्निशमन दलाच्या भरतीदरम्यान गोंधळ झाला आहे. 162 सेमी पेक्षा जास्त उंची असलेल्या मुलींनाही बाहेर काढल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे. या महिलांनी आता आंदोलनाचा (Agitation) पवित्रा घेतला आहे. या महिला उमेदवारांना अडवण्याच्या प्रयत्न सध्या पोलिसांकडून करण्यात येत आहे. मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त या ठिकाणी करण्यात आला आहे. अग्निशमन दलाच्या भरतीसाठी आलेल्या मुलींवर एम. एच. बी पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची माहिती मिळत आहे. पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये काही मुली जखमी झाल्याचा प्राथमिक माहिती मिळत आहे.

Fire Brigade Recruitment : विविध जिल्ह्यातून जवळपास दोन ते तीन हजार मुली दहीसरमध्ये दाखल 

दहिसरमध्ये महिला आणि पुरुष या दोन्ही गटासाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. मात्र, महिलांची उंची ही 162 सेंटीमीटर हवी, असा आग्रह इथे धरण्यात आला होता. आज सकाळपासूनच दहिसर येथील अग्निशमन दलाच्या केंद्रावर भरती प्रक्रिया सुरू आहे. सकाळपासूनच या ठिकाणी गोंधळ सुरू आहे. राज्याच्या विविध जिल्ह्यातून जवळपास दोन ते तीन हजार मुली दहीसरमध्ये दाखल झाल्या आहेत.  मात्र, मुलींना भरतीसाठी उंची 162 सेंटीमीटर असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, 163 किंवा 164 सेंटीमीटर ऊंची असलेल्या उमेदवाराला देखील बाहेर काढले जात असल्याचा आरोप मुलींनी केला आहे. त्यामुळं सकाळपासूनच मुलींनी या ठिकाणी गोंधळ घालायला सुरुवात केली आहे. त्यामुळं दहीसर परिसरात पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात केला आहे. राज्याच्या विविध जिल्ह्यातून आलेल्या मुली भर उन्हात आंदोलन करत आहेत.

मुलींना पोलिसांनी घेतलं ताब्यात 

दरम्यान, आंदोलन करणाऱ्या मुलींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. गोंधळ झाल्यामुळं दहीसर परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. जवळपास 2 बजार मुली दहिसरमध्ये आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. मुंबई महानगर पालिकेकडून अग्निशमन दलात 910 जागांसाठी भरती प्रक्रिया होत आहे. 13 जानेवारीपासून या भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. भरती प्रक्रियेचे अर्ज स्वीकारण्याची आजची म्हणजे 4 फ्रेब्रुवारी ही शेवटची तारीख होती.   

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Job Majha : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड आणि महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत विविध पदांसाठी भरती  

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sunil Tatkare Meets Sharad Pawar: राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून नाव गायब; शरद पवारांच्या भेटीनंतर सुनील तटकरे म्हणाले..., मला काही बोलायचं नाही!
राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून नाव गायब; शरद पवारांच्या भेटीनंतर तटकरे म्हणाले...
Raj Thackeray 2008 Railway Case: गेल्या सुनावणीत म्हणाले, मला गुन्हा मान्य नाही; आज राज ठाकरे पुन्हा ठाणे न्यायालयात हजर राहणार, नेमकं प्रकरण काय?
गेल्या सुनावणीत म्हणाले, मला गुन्हा मान्य नाही; आज राज ठाकरे पुन्हा ठाणे न्यायालयात हजर राहणार, नेमकं प्रकरण काय?
धक्कादायक! मुंबईतील भायखळा परिसरात गोळीबार; एक जण जखमी, हल्लेखोर पसार, पोलीस घटनास्थळी दाखल 
धक्कादायक! मुंबईतील भायखळा परिसरात गोळीबार; एक जण जखमी, हल्लेखोर पसार, पोलीस घटनास्थळी दाखल 
धक्कादायक! मुंबईतील निवासी डॉक्टरने संपवलं जीवन, मानसिक तणावात असल्याची माहिती
धक्कादायक! मुंबईतील निवासी डॉक्टरने संपवलं जीवन, मानसिक तणावात असल्याची माहिती

व्हिडीओ

Chandrashekhar Bawankule on Narendra Modi : नरेंद्र मोदींच्या हातात देश सुरक्षित आहे!
Kolhapur Gold Silver : सोनं खरेदी थांबवा मोदींकडून आवाहन, कोल्हापुरातील सराफा व्यापारी काय म्हणाले?
Ambadas Danve on Modi : मोदींना आवाहन करावं लागतं म्हणजे त्यांनी अपयशाची कबुली दिली
Tamil Nadu News : तामिळनाडूत अण्णाद्रमुकमध्ये उभी फूट? प्रकरण काय?
Raj Thackeray On Modi : देशाच्या, राज्याच्या अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडून ठेवलंय- राज ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mandana Karimi Leaves India After 16 Years: 16 वर्षांनंतर, 37 वर्षांच्या इराणी अभिनेत्रीनं सोडला भारत; म्हणाली, 'इथे घरासारखं वाटत नाही...'
16 वर्षांनंतर, 37 वर्षांच्या इराणी अभिनेत्रीनं सोडला भारत; म्हणाली, 'इथे घरासारखं वाटत नाही...'
Sunil Tatkare Meets Sharad Pawar: राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून नाव गायब; शरद पवारांच्या भेटीनंतर सुनील तटकरे म्हणाले..., मला काही बोलायचं नाही!
राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून नाव गायब; शरद पवारांच्या भेटीनंतर तटकरे म्हणाले...
Jai Gidwani Latest Photos: 'शक्ती' सिनेमातल्या करिष्मा कपूरच्या 'त्या' गोंडस मुलानं स्वतःच्या जीवावर उभारलंय कोट्यवधींचं साम्राज्य; 24 वर्षांनी आता दिसतो कसा?
24 वर्षांनी समोर आला करिश्मा कपूरचा 'तो' मुलगा; गोंडस चिमुकला आता झालाय 33 वर्षांचा हँडसम जेंटलमन PHOTOs
Nashik TCS Case Matin Patel : मोठी बातमी! निदा खानला आश्रय देणं MIM नगरसेवकाला भोवलं; मतीन पटेलांच्या घरावर बुलडोझर कारवाई, नगरसेवक पदावरही गंडांतर येण्याची शक्यता
मोठी बातमी! निदा खानला आश्रय देणं MIM नगरसेवकाला भोवलं; मतीन पटेलांच्या घरावर बुलडोझर कारवाई, नगरसेवक पदावरही गंडांतर येण्याची शक्यता
Khan Sir On Paper Leak : मुलांचे 10 रुपयाचे डायपर लीक होत नाही, यांचा NEET पेपर लीक होतो; खान सर NTA वर संतापले
मुलांचे 10 रुपयाचे डायपर लीक होत नाही, यांचा NEET पेपर लीक होतो; खान सर NTA वर संतापले
Rahul Gandhi : पंतप्रधान मोदी 22 लाख विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळत आहेत, NEET पेपर लीकवर राहुल गांधी संतप्त
पंतप्रधान मोदी 22 लाख विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळत आहेत, NEET पेपर लीकवर राहुल गांधी संतप्त
महाराष्ट्रात सर्वाधिक तेल चंद्रकांत पाटील वापरतात; मोदींचे आवाहन, जितेंद्र आव्हाडांचा घोड्यावरुन हल्लाबोल
महाराष्ट्रात सर्वाधिक तेल चंद्रकांत पाटील वापरतात; मोदींचे आवाहन, जितेंद्र आव्हाडांचा घोड्यावरुन हल्लाबोल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2026 | मंगळवार
Embed widget