Mumbai News : मुंबईत विलेपार्ले येथे आठ ते दहा घरे कोसळली, 40 पेक्षा जास्त घरांना तडे
Mumbai News Update : विलेपार्ले पश्चिमेकडील इंदिरा नगर परिसरात मेट्रोचे काम सुरू आहे. त्यामुळे आजुबाजूच्या घरांना तडे गेले आहेत. यातील आठ ते दहा घर कोसळली आहेत. तर 40 घरांना तडे गेले आहेत.
Mumbai News Update : मुंबईत विलेपार्ले येथे आठ ते दहा घरे कोसळली आहेत. तर 40 पेक्षा जास्त घरांना तडे गेले आहेत. मेट्रोच्या कामांमुळे घरांना हादरे बसत असल्याचा स्थानिक नागरिकांनी आरोप केलाय. विलेपार्ले पश्चिमेकडील इंदिरा नगर परिसरात रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली आहे. त्यामुळे येथील स्थानिक नागरिकांना जवळच्या महापालिकेच्या शाळेत स्थलांतरित करण्यात आले आहे. सुदैवाने घरं कोसळण्यापूर्वी सर्व घरे रिकामी करण्यात आली होती. त्यामुळे कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही.
विलेपार्ले पश्चिमेकडील इंदिरा नगर परिसरात मेट्रोचे काम सुरू आहे. त्यामुळे आजुबाजूच्या घरांना तडे गेले आहेत. यातील आठ ते दहा घर कोसळली आहेत. तर 40 घरांना तडे गेले आहेत. यातील काही घरे नाल्यालगतची कोसळू शकतात, अशी भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे. सध्या घटनास्थळी अग्निशमन दल पोहोचलेले असून बीएमसी या प्रकरणाचा तपास करत आहे.
विलेपार्ले पश्चिमेकडे जुहू रोड परिसरात मिठीबाई महाविद्यालयाच्याजवळ 30 ते40 दुमजली झोपड्या आहेत. याच झोपड्यांजवळ मेट्रोचं काम सुरू आहे. मेट्रोच्या कामाच्या हदऱ्यांमुळेच झोपड्या कोसळ्यात आहेत असा आरोप येथील नागरिकांनी केलाय.
महत्वाच्या बातम्या