एक्स्प्लोर

Chiplun Flood : चिपळूणच्या महापुराला एक वर्ष पूर्ण; गतवर्षीच्या आठवणी आजही मनात ताज्या, एका वर्षांत काय बदललं?

Chiplun Flood : गतवर्षीच्या महापुराची भिती अजूनही चिपळूणकरांच्या मनामध्ये आजही कायम आहे. नदी पात्राच्या बाजूला असणाऱ्या इमारती,चाळी ओस पडल्या आहेत.

Chiplun Flood : आज 22 जुलै हा दिवस म्हणजे महाड (Mahad) आणि चिपळूणकरांच्या (Chiplun) आठवणीतला दिवस आहे. या दिवशीं म्हणजेच गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे या दोन्ही शहरांना महापुराचा फटका बसला आणि क्षणांतच सारं उध्वस्त झाल होतं. त्यानंतर या दोन्ही शहरात आज एका वर्षांत काय बदल झाला आहे आणि यंदाचा पावसाळा कसा आहे? 

गतवर्षीच्या महापूराच्या आठवणी आजही मनात ताज्या
गेल्या वर्षी 22 जुलै रोजी धोधो बरसणाऱ्या पावसामुळे महाडच्या सावित्री आणि चिपळूणच्या वाशिष्टी नदीला पूर आला. या दोन्ही नद्या या शहरातून वाहत असल्याने या नद्यांचे पाणी शहरात शिरुन शहराचे प्रचंड नुकसान झाले. या दोन्ही शहरातील पाण्याची पातळी 7 ते 8 फुटांपेक्षाही जास्त असल्याने शहरातील घरांत, दुकानांत पाणी शिरले. काही ठिकाणची घरें अक्षरशः पडली तर काहींचा संसार या पुराच्या पाण्यात वाहून गेला. आयुष्यभर पै पै जमा करुन ठेवलेल सारंच वाहून गेले.

या घटनेला आज वर्षे झाले

एवढंच नाही, तर या महापुरात मुंबई गोवा महामार्गावरील वाशिष्टी नदीचा पुल व परशुराम घाटाचा काही भाग खचल्याने महामार्गावरील वाहतूक आठवडाभर बंद करण्यात आली होती. त्यानंतर तात्पुरत्या स्वरुपाची डागडुजी करून घाट पुन्हां सुरु करण्यात आला होता. या घटनेला आज वर्षे झाले. एक वर्षांत या घाटाचे काम अवघे 65 टक्केच पूर्ण झाले. तर चिपळूणचा एनरॉन पूल एका बाजूला खचला आहे. या पुलाविषयी अधिवेशनात आवाजही उठवला गेला, परंतु आजवर पुलाचे काहीच काम झालेले नाही.

नदी पात्राच्या बाजूला असणाऱ्या इमारती, चाळी ओस

गतवर्षी झालेल्या महापूराची भिती अजूनही चिपळूणकरांच्या मनामध्ये आजही कायम आहे. नदी पात्राच्या बाजूला असणाऱ्या इमारती,चाळी ओस पडल्या आहेत. पावसाळ्यात इथे कोणीच राहत नसून काही रुम मालक आपले रुम विकून दुसरीकडे स्थलांतरीत झाले आहेत. महापूराचे पाणी ओसरल्यावर चिपळूणकरांनी एकच मागणी शहरातून वाहणाऱ्या दोन नद्यांच्या पात्रातील गाळ उपसा व्हावा. यासाठी चिपळूणवासियांनी वेगवेगळी आंदोलनले, उपोषणेही केली. या गाळ उपशाच्या मागणीनंतर नाम फाउंडेशनने पुढाकार घेउन शिव नदीचा गाळ आणि प्रशासनामार्फत वाशिष्टीचा गाळ उपसा करण्यात आला.त्यामुळे यंदाच्या पावसात वशिष्टीच पात्र भरले पण पाणी पात्राबाहेर आले नाही..यंदा पुराचा कोणताही धोका जाणवला नाही.

यंदा प्रशासन वेळीच अलर्ट

गेल्या वर्षीच्या पुराचा आढावा घेत यावर्षी मात्र प्रशासन वेळीच अलर्ट झाले. पावसाळ्यापुर्वीच आपत्ती व्यवस्थापन, पाटबंधारे विभाग, पोलिस प्रशासन जिल्हाधिकारी यांनी बैठका घेउन पावसामुळे कुठे सतर्क राहिले पाहिजे? काय केले पाहिजे? याचे नियोजन केले. इतकेच नव्हे तर पावसाच्या सुरुवातीलाच शहरात NDRFची पथके तैनात करण्यात आली. या अतिवृष्टीमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण व खेड आणि महाड मधील तळीये या गावात दरड वस्तीवर येउन अनेक जणांचा यात मृत्यू झाला होता..त्यामुळे वेळी दरडप्रवण क्षेत्रात अतिदक्षता घेण्यात आली होती. चिपळूण आणि महाड शहरात गतवर्षीच्या महापूरातून हळूहळू सावरतय..पण या घटनेच्या आठवणी आणि भिती ह्या कायमस्वरूपी मनात राहणार आहेत.. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vinod Tawde EXCLUSIVE : पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? विनोद तावडेंची स्फोटक मुलाखतDilip Walse Patil : शरद पवार म्हणाले गद्दार, सुट्टी नाही! दिलीप वळसे-पाटलांची पहिली प्रतिक्रियाMahesh Sawant : नरेंद्र मोदींचा इफेक्ट संपला;त्यांची सभा आमच्यासाठी शुभ शकुनPrakash Mahajan on Amit Thackeray : भाजपचा अमित ठाकरेंना पाठिंबा , मोदींच्या सभेचा मनसेला फायदा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
Embed widget