(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Hardik Pandya Video : 6,0,6,6,4,6 हार्दिक पांड्याची पुन्हा एकदा त्सुनामी! एकाच षटकात 28 धावांचा पाऊस पाडत 52 चेंडूत सामना संपवला
हार्दिकने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये गुजरातविरुद्ध नाबाद 74 धावा केल्या होत्या. याशिवाय त्याने उत्तराखंडविरुद्ध 41 धावांची नाबाद खेळी खेळली. हार्दिकने तामिळनाडूविरुद्ध 69 धावा केल्या होत्या.
Hardik Pandya Video : हार्दिक पांड्या सध्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये सहभागी होत आहे. बडोद्याकडून हार्दिकची चमकदार कामगिरी सुरु आहे. आज 29 नोव्हेंबर रोजी त्रिपुराविरुद्ध 200 पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने धावा केल्या. हार्दिक पांड्या बऱ्याच दिवसांनी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी खेळत आहे. मात्र, या मोसमात या खेळाडूने आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. त्याने 23 चेंडूत 47 धावांची खेळी केली. यादरम्यान स्फोटक अष्टपैलू खेळाडूने 3 चौकार आणि 5 षटकार लगावले. या काळात पंड्याचा स्ट्राइक रेट 204.35 होता.
🚨 HARDIK PANDYA SMASHED 28 RUNS IN A SINGLE OVER IN SMAT. 🚨
— Johns. (@CricCrazyJohns) November 29, 2024
- The Madness of Pandya...!!!! pic.twitter.com/1DrY1vb5Ff
बडोद्याने 11.2 षटकांत सामना संपवला
या सामन्यात त्रिपुराने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 9 बाद 109 धावा केल्या. मनदीप सिंगने 40 चेंडूत 50 धावांची खेळी केली. याशिवाय एकाही फलंदाजाला मोठी खेळी खेळता आली नाही. लक्ष्याचा पाठलाग करताना बडोद्याने आश्चर्यकारक कामगिरी केली आणि 52 चेंडू शिल्लक असताना सामना जिंकला. बडोद्यासाठी सलामीवीर मिथलेश पालने 24 चेंडूत 37 धावांची खेळी केली. याशिवाय हार्दिक पांड्याने झटपट 47 धावा केल्या. त्यामुळे बडोद्याने हा सामना 7 गडी राखून जिंकला. बडोदाचे नेतृत्व कृणाल पांड्या करत आहे. त्याच्या नेतृत्वाखाली बडोदा चमकदार कामगिरी करत आहे.
Hardik Pandya was on fire again 🔥🔥
— BCCI Domestic (@BCCIdomestic) November 29, 2024
The Baroda all-rounder went berserk smashing 6⃣,6⃣,6⃣,4⃣,6⃣ in an over on his way to a whirlwind 47(23) against Tripura 🙌🙌#SMAT | @IDFCFIRSTBank
Scorecard ▶️ https://t.co/1WPFeVRTum pic.twitter.com/xhgWG63y9g
सलग चौथ्या तुफानी फटकेबाजी
हार्दिकने अलीकडेच बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या मालिकेत भारताकडून शानदार फलंदाजी केली होती. हार्दिकने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये गुजरातविरुद्ध नाबाद 74 धावा केल्या होत्या. याशिवाय त्याने उत्तराखंडविरुद्ध 41 धावांची नाबाद खेळी खेळली. हार्दिकने तामिळनाडूविरुद्ध 69 धावा केल्या होत्या. हार्दिकला देशांतर्गत क्रिकेटमध्ये अप्रतिम कामगिरी करून आयपीएल 2025 ची तयारी पूर्ण करायची आहे.
इतर महत्वाच्या बातम्या