Mumbai News : महालक्ष्मी रेसकोर्स मुलुंड डम्पिंग ग्राऊंडवर हलवण्याचा प्रस्ताव विचाराधीन
Mahalaxmi Race Course : महालक्ष्मी रेसकोर्सवर थीम पार्क तयार करण्याचे प्रयत्न सुरु झाले असतील तर महालक्ष्मी रेसकोर्स मुलुंड डम्पिंग ग्राऊंडवर हलवण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे.
Mahalaxmi Race Course : मुंबईतील (Mumbai) महालक्ष्मी रेसकोर्स (Mahalaxmi Race Course) मुलुंड डम्पिंग ग्राऊंडवर (Mulund Dumping Ground) हलवण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचं समोर येत आहे. मात्र खाजगी जागा संपादित करुन जर रेसकोर्स मुलुंडला हलवला जात असेल तर त्याला शिवसेना ठाकरे गट (Thackeray Group) त्याला विरोध करणार आहे. रेसकोर्स हा सरकारी जागेवरच व्हावा, अशी भूमिका शिवसेना ठाकरे गटाची आहे.
महालक्ष्मी रेसकोर्सवर थीम पार्क (Theme Park) तयार करण्याचे प्रयत्न सुरु झाले असतील तर महालक्ष्मी रेसकोर्स मुलुंड डम्पिंग ग्राऊंडवर हलवण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. मुलुंड डम्पिंग ग्राऊंडचा परिसर साधारणपणे 24 हेक्टर इतका आहे. इथे रेसकोर्स हलवण्यासाठी मुलुंडचं डम्पिंग ग्राऊंड आणि त्याच्या शेजारील खासगी मालकीची जागा रेसकोर्स आणि इतर सुविधांना सामावून घेण्यासाठी पुरेशी आहे.
बीएमसीला बाजारभावानुसार जमीन विकत घ्यावी लागणार
तसंच, खासगी जमीन संपादित करण्यासाठी बीएमसीला मोठी किंमत मोजावी लागेल कारण ती जागा सध्याच्या बाजारभावानुसार विकत घ्यावी लागेल. महालक्ष्मी रेसकोर्स मुलुंड इथे स्थलांतरित करण्यासाठी बीएमसीला खासगी जमीन संपादित करावी लागेल. नंतर ती मुलुंड डम्पिंग ग्राऊंडशी जोडावी लागेल. खाजगी जमीन खरेदी करुन ती रेसकोर्ससाठी सुपूर्द करणे शक्य होणार नाही. रेसकोर्स चालवणे हा सार्वजनिक उद्देश नसल्यामुळे, खाजगी जमीन खरेदी करण्यासाठी सार्वजनिक पैसा खर्च करण्यास विरोध होऊ शकतो
ठाकरे गटाचा विरोध
शिवसेना ठाकरे गटाने हा रेसकोर्स मुलुंडला हलवला जात असेल आणि त्यासाठी जर खाजगी जागा संपादित केली जात असेल आणि त्यासाठी जर पैसे मोजले असतील तर त्याला विरोध दर्शवला आहे. रेसकोर्स हा सरकारी जागेवरच व्हावा, अशी भूमिका शिवसेना ठाकरे गटाने घेतली आहे.
थीम पार्कसाठी महालक्ष्मी रेसकोर्सचा संपूर्ण भूखंड मिळावा, बीएमसी सरकारला पत्र पाठवणार
मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्समधील जागेवर थीम पार्क साकारण्यासाठी संपूर्ण भूखंडा मिळावा, यासाठी मुंबई महापालिका (Mumbai Municipal Corporation) पुन्हा एकदा राज्य सरकारला (Maharashtra Government) पत्र पाठवणार आहे. महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्यासोबत काल (6 जानेवारी) झालेल्या मुंबई सुशोभीकरण आढावा बैठकीत पुन्हा एकदा या संदर्भात चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. महालक्ष्मी रेसकोर्समधील जागेवर थीम पार्क साकारण्यासाठी रेसकोर्समधील जमिनीची मालकी मुंबई महापालिकेला मिळावी, अशी मागणी राज्य सरकारला लिहिलेल्या पत्रात करण्यात येणार आहे.
संबंधित बातमी