एक्स्प्लोर

Mumbai News : थीम पार्कसाठी महालक्ष्मी रेसकोर्सचा संपूर्ण भूखंड मिळावा यासाठी बीएमसी सरकारला पत्र लिहिणार

Mahalaxmi Race Course Theme Park : मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्समधील जागेवर थीम पार्क साकारण्यालाठी संपूर्ण भूखंडा मिळावा, अशी मागणी मुंबई महापालिका पुन्हा एकदा राज्य सरकारला करणार आहे. याबाबत बीएमसी पत्र पाठवणार आहे.

Mahalaxmi Race Course Theme Park : मुंबईतील (Mumbai) महालक्ष्मी रेसकोर्समधील (Mahalaxmi Race Course) जागेवर थीम पार्क (Theme Park) साकारण्यालाठी संपूर्ण भूखंडा मिळावा, यासाठी मुंबई महापालिका (Mumbai Municipal Corporation) पुन्हा एकदा राज्य सरकारला (Maharashtra Government) पत्र पाठवणार आहे. महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्यासोबत काल (6 जानेवारी) झालेल्या मुंबई सुशोभीकरण आढावा बैठकीत पुन्हा एकदा या संदर्भात चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. महालक्ष्मी रेसकोर्समधील जागेवर थीम पार्क साकारण्यासाठी रेसकोर्समधील जमिनीची मालकी मुंबई महापालिकेला मिळावी, अशी मागणी राज्य सरकारला लिहिलेल्या पत्रात करण्यात येणार आहे.

महालक्ष्मी रेसकोर्सच्या 30 टक्के भूखंडाची मालकी बीएमसीकडे

दक्षिण मुंबईतील महालक्ष्मी इथल्या मोक्याच्या ठिकाणी असलेला हा भूखंड रेसकोर्स व्यवस्थापनाला 1914 मध्ये 99 वर्षांच्या भाडेकरारावर देण्यात आला होता. महालक्ष्मी येथील रेसकोर्समधील जागेचा करार हा 10 वर्षांपूर्वी म्हणजे 2013 ला संपुष्टात आला होता. त्यामुळे या जागेवर थीम पार्क उभारण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. सद्यस्थितीत यातील 30 टक्के भूखंडाची मालकी बीएमसीकडे (BMC) आहे. त्यामुळे संपूर्ण भूखंड हा बीएमसीला थीम पार्क साकारण्यासाठी द्यावा, अशा मागणीचं पत्र मुंबई महापालिका राज्य सरकारला पाठवणार आहे

थीम पार्क उभारण्याचे शिवसेनेचे स्वप्न

महालक्ष्मी रेसकोर्सच्या या जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे भव्य असे थीम पार्क उभारण्याचे शिवसेनेचे स्वप्न होते. शिवसेनेचे तत्कालीन नगरसेवक राहुल शेवाळे यांनी तसा ठराव मांडल्यानंतर महानगरपालिका सभागृहाने मंजूर केला होता. मात्र त्यावर तत्कालीन राज्य राज्य सरकारने कोणताही निर्णय घेतला नाही. मात्र भाडेकरार संपून दहा वर्षे झाल्यानंतर हा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. 

महालक्ष्मी रेसकोर्सच्या नुतनीकरणाचे अधिकार राज्य सरकारकडे

दरम्यान 10 वर्षांपूर्वी जागेचा करार संपुष्टात आल्यानंतर राज्य सरकारने महालक्ष्मी रेसकोर्सच्या नुतनीकरणाचे अधिकार स्वतःकडे घेतले आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे रेसकोर्सच्या भूखंडाचे महानगरपालिकेला नुतनीकरण करता येणार नाही. त्यामुळे कराराचे नुतनीकरण किंवा त्यात बदल करण्यासाठी राज्य सरकारची मंजुरी घ्यावी लागणार आहे. महालक्ष्मी रेसकोर्सच्या भूखंडाचे क्षेत्रफळ 8.5 लाख चौरस मीटर इतके आहे. त्यापैकी केवळ 2.5 चौरस मीटर क्षेत्रफळाची जागा महानगरपालिकेच्या मालकीची आहे. त्यामुळे संपूर्ण भूखंड महानगरपालिकेच्या ताब्यात द्यावा, अशी मागणी पत्राद्वारे राज्य सरकारला करण्यात येणार आहे.

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Crime News: टिंडर डेटिंग ॲपवरुन पुरुषांना जाळ्यात ओढायच्या; मुंबईतील कॅफेमध्ये नेऊन भलतंच करायच्या, पोलिसांनी छापा टाकताच धक्कादायक वास्तव समोर
टिंडर डेटिंग ॲपवरुन पुरुषांना जाळ्यात ओढायच्या; मुंबईतील कॅफेमध्ये नेऊन भलतंच करायच्या, पोलिसांनी छापा टाकताच धक्कादायक वास्तव समोर
बीड महिला अत्याचारप्रकरणाची मुंबईतून दखल; पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावरही गुन्हा दाखल करण्याचे निर्देश
बीड महिला अत्याचारप्रकरणाची मुंबईतून दखल; पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावरही गुन्हा दाखल करण्याचे निर्देश
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मार्च 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मार्च 2026 | रविवार
बारामती अन् राहुरीची पोटनिवडणूक बिनविरोध होऊ द्या, अन्यथा..; देवेंद्र फडणवीसांचं आवाहन अन् इशाराही
बारामती अन् राहुरीची पोटनिवडणूक बिनविरोध होऊ द्या, अन्यथा..; देवेंद्र फडणवीसांचं आवाहन अन् इशाराही

व्हिडीओ

Baramati Rahuri Election : बारामती, राहुरीची पोटनिवडणूक 23 एप्रिलला, निवडणूक आयोगाची माहिती
North Korea Ballistic missile: एकीकडे इराण Vs अमेरिका युद्ध शिगेला, दुसरीकडे किम जोंग उन मैदानात, उत्तर कोरियाने 10 बॅलेस्टिक मिसाईल सोडल्या
Kishori Pednekar on Ritu Tawde : मुंबईच्या महापौर पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठ्या झाल्या का? पेडणेकर आक्रमक
kharg Island Special Report : इराणच्या मुकूटमणीवर अमेरिकेचा शक्तिशाली बॉम्बहल्ला
Election Comission PC : 5 राज्यांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार? निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump on Nato: इराणनं गुडघ्यावर आणताच ट्रॅप झालेल्या ट्रम्प यांची थेट NATO ला धमकी! म्हणाले, 'जर मदत नाही केली तर..' चीनला सुद्धा गर्भित इशारा
इराणनं गुडघ्यावर आणताच ट्रॅप झालेल्या ट्रम्प यांची थेट NATO ला धमकी! म्हणाले, 'जर मदत नाही केली तर..' चीनला सुद्धा गर्भित इशारा
Maharashtra Weather Alert: सावधान! महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचे इशारे, हवामान विभागाचे 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट
सावधान! महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचे इशारे, हवामान विभागाचे 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट
Odisha Government Hospital Fire: जगण्याने छळलं होतं, सरकारी दवाखान्याच्या आगीनं सुटका केली; ओडिशात दवाखान्यात लागलेल्या 10 रुग्ण जिवंत जळाले, 11 कर्मचारी सुद्धा होरपळले
जगण्याने छळलं होतं, सरकारी दवाखान्याच्या आगीनं सुटका केली; ओडिशात दवाखान्यात लागलेल्या 10 रुग्ण जिवंत जळाले, 11 कर्मचारी सुद्धा होरपळले
'सुपरस्टार'ची एन्ट्री अन् भाजपची सत्ताकांक्षा! तमिळनाडूतील तब्बल साठ वर्षांचा दुष्काळ संपवण्यासाठी भाजपने थलापती विजयना जागांपासून मंत्रीपदापर्यंत कोणकोणती ऑफर दिली?
'सुपरस्टार'ची एन्ट्री अन् भाजपची सत्ताकांक्षा! तमिळनाडूतील तब्बल साठ वर्षांचा दुष्काळ संपवण्यासाठी भाजपने थलापती विजयना जागांपासून मंत्रीपदापर्यंत कोणकोणती ऑफर दिली?
Gas Shortage Pune: राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय; गॅस एजन्सी, सिलेंडरच्या गाड्यांना संरक्षण देण्याचे पोलिसांना आदेश
राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय; गॅस एजन्सी, सिलेंडरच्या गाड्यांना संरक्षण देण्याचे पोलिसांना आदेश
राज्य मंडळाचा मोठा दणका! दहावी बारावी परीक्षा सामूहिक कॉपी प्रकरणी तब्बल 103 शिक्षकांवर सर्जिकल स्ट्राईक; आत्तापर्यंत सर्वात मोठी कारवाई
राज्य मंडळाचा मोठा दणका! दहावी बारावी परीक्षा सामूहिक कॉपी प्रकरणी तब्बल 103 शिक्षकांवर सर्जिकल स्ट्राईक; आत्तापर्यंत सर्वात मोठी कारवाई
Iran America war unemployment: गॅस टंचाईनंतर आता बेरोजगारीची लाट, आखाती देशांमधील हजारो भारतीय कामगारांच्या नोकऱ्या जाणार, घरी परतण्यासाठी विमानाचे पैसेही नाहीत
गॅस टंचाईनंतर आता बेरोजगारीची लाट, आखाती देशांमधील हजारो भारतीय कामगारांच्या नोकऱ्या जाणार, घरी परतण्यासाठी विमानाचे पैसेही नाहीत
इस्त्रायल अमेरिकेची दमछाक सुरु होताच इराणकडून ताकद दाखवण्यास सुरुवात; आजवर न वापरलेली सेजल मिसाईल इस्त्रायलवर डागली, 2500 किमी टार्गेटची क्षमता, दुबई एअरपोर्टवर पुन्हा ड्रोन हल्ला
इस्त्रायल अमेरिकेची दमछाक सुरु होताच इराणकडून ताकद दाखवण्यास सुरुवात; आजवर न वापरलेली सेजल मिसाईल इस्त्रायलवर डागली, 2500 किमी टार्गेटची क्षमता, दुबई एअरपोर्टवर पुन्हा ड्रोन हल्ला
Embed widget