एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

School Bus: एक सप्टेंबरपर्यंत खड्डे बुजवा, नाहीतर स्कूल बस विसरा; बस मालकांचा इशारा

School Bus: रस्त्यांवर खड्डे असलेल्या भागातील स्कूल बस सेवा तात्पुरती बंद ठेवण्याचा इशारा स्कूल बस मालकांनी दिला आहे. एक सप्टेंबरपर्यंत खड्डे बुजवण्याची मागणी करण्यात आली आहे.

School Bus: मुंबई आणि परिसरातील रस्त्यावर असलेल्या खड्ड्यांमुळे (Mumbai Potholes) वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या खड्ड्यांमुळे अपघात घडत असून काहींचा मृत्यूदेखील झाला आहे. आता स्कूल बस चालकांनी खड्डे असलेल्या  भागातील स्कूल बस (School Bus) बंद करण्याचा इशारा दिला आहे. एक सप्टेंबरपर्यंत खड्डे बुजवण्याची मागणी स्कूल बस चालकांनी केली आहे. 

मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर रस्त्यांवर खड्डे पडलेले आहेत. या खड्ड्यांमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेचा विचार करता संबंधित भागातील खड्डे बुजवले जात नाहीत तोपर्यंत स्कूल बस बंद करण्याचा निर्णय स्कूल बस मालक संघटनेने घेतला आहे. खड्डे बुजवण्यासाठी एक सप्टेंबरपर्यंतचा अल्टिमेटम स्कूल बस मालकांनी दिला आहे. एक सप्टेंबरपर्यंत खड्डे न बुजवल्या त्या भागातील स्कूल बस वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  

स्कूल बस बंद करण्याचा निर्णय का?

विद्यार्थ्यांना सोडणाऱ्या स्कूलबस विरोधात अनेक तक्रारी पालकांनी केल्या आहेत. मुंबईतील विविध भागांमध्ये असणाऱ्या खड्ड्यांमुळे स्कूल बसचे टायर पंक्चर होणे, विद्यार्थ्यांना शाळेत नेण्यासा अथवा घरी सोडण्यास उशीर होणे आदी प्रकारच्या अडचणींना स्कूल बस मालकांना तोंड द्यावे लागत आहे. मुलांना शाळेत पोहचण्यास अथवा घरी पोहचण्यास उशीर होत असल्याने पालकांची नाराजी वाढत आहे. पालकांना रस्त्यावरील खड्ड्यांचे कारण दिले तरी त्यांच्या तक्रारी वारंवार सुरू असल्याचे स्कूल बस ओनर्स असोसिएशनने म्हटले आहे. त्यामुळे आता खड्डे बुजवल्यानंतरच त्या-त्या भागातील स्कूल बस सेवा सुरू करणार असल्याचे निर्णय स्कूल बस ओनर्स असोसिएशनने घेतला आहे. या संदर्भात शाळा प्रशासन, परिवहन विभाग व राज्य सरकारला असोसिएशनच्यावतीने पत्र देण्यात येणार असल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष अनिल गर्ग यांनी दिली आहे. 

मुंबईतील रस्त्यांवर 12 हजार कोटींचा खर्च; काँग्रेसची सीबीआय चौकशीची मागणी 

मागील पाच वर्षात मुंबईच्या रस्त्यांसाठी मुंबई महानगरपालिकेने तब्बल 12 हजार कोटी रुपये खर्च केले आहेत. मुंबईकरांचा पैसा लुटणाऱ्यांची सीबीआय चौकशी झाली पाहिजे अशी मागणी काँग्रेस नेते आणि माजी खासदार मिलिंद देवरा यांनी केली आहे. मुंबईतील रस्त्यांवरील मुद्यांवरून भाजपनंतर आता महाविकास आघाडीतील काँग्रेसनेही शिवसेनेवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. 

मिलिंद देवरा यांनी ट्वीट करत म्हटले की, मुंबई महापालिकेने 2017 ते 2022 या पाच वर्षात रस्त्यांसाठी तब्बल 12 हजार कोटींचा खर्च केला आहे. ही रक्कम म्हणजे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या बजेटच्या 10 टक्के इतकी आहे. मात्र, तरीदेखील मुंबईकरांना दरवर्षी रस्त्यांवरील खड्ड्यांच्या समस्येला सामोरे जावे लागते. देशातील सर्वाधिक श्रीमंत महापालिकेची कोण लूट करतेय, हे जाणून घेण्याचा मुंबईकरांना अधिकार असल्याचे मिलिंद देवरा यांनी म्हटले. हे भ्रष्टाचाराच्या हिमनगाचे टोक असून याची सीबीआय चौकशी करण्याची मागणी देवरा यांनी केली. या प्रकरणाचा तपास आणि मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचार उघड करण्याचा अधिकार राज्य सरकारलादेखील आहे. पण, महाराष्ट्र सरकारकडे सीबीआयकडे तपास देण्याची राजकीय इच्छाशक्ती आहे का, असा सवालही त्यांनी केला. 

मुंबई महापालिकेने काढली निविदा 

मुंबई महानगरात मागील काही दिवसात झालेल्या जोरदार पावसामुळे डांबरी रस्त्यांवर खड्डे पडत आहेत. हे खड्डे तत्काळ बुजवण्यात आले तरी सततचा जोरदार पाऊस आणि वाहतुकीचा ताण यामुळे कोल्डमिक्स सारख्या पारंपरिक तंत्रज्ञानाच्या वापरावरही मर्यादा येत आहेत. त्यामुळे  खड्डे भरल्यानंतरही काही कालावधीत पुन्हा नवे खड्डे पडतात. मुंबईतील रस्त्यांवर जोरदार पावसामुळे होणारे खड्डे भरून काढण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने जिओपॉलिमर आणि रॅपिड हार्डनिंग काँक्रिट तंत्रज्ञानाचा उपयोग करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आगामी  15 महिन्यांच्या कालावधीसाठी खड्डे भरण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने निविदा 

कल्याण डोंबिवलीतील रस्त्यांची अक्षरशः चाळण

यंदाच्या पावसाळ्यात कल्याण डोंबिवली परिसरातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. हे खड्डे बुजवण्यासाठी महापालिकेने (KDMC) सुमारे 15 कोटीच्या निधीची तरतूद केली होती. मात्र पालिकेकडून वरवरचे काम करत खड्डे बुजवले गेल्याची तक्रार करण्यात आली. त्यामुळे तासभराच्या पावसाने पुन्हा खड्डे पडून रस्त्यांची दुरावस्था झाली असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

काँग्रेसची धुसफूस आली हमरीतुमरीवर! बंटी शेळके नाना पटोले वादात पदाधिकारीच उतरले मैदानात
काँग्रेसची धुसफूस आली हमरीतुमरीवर! बंटी शेळके नाना पटोले वादात पदाधिकारीच उतरले मैदानात
धक्कादायक! गोव्यात भारतीय नौदलाच्या पाणबुडीला मासेमारी करणाऱ्या बोटीची जोरदार धडक, 2 खलाशांचा जागीच मृत्यू
धक्कादायक! गोव्यात भारतीय नौदलाच्या पाणबुडीला मासेमारी करणाऱ्या बोटीची जोरदार धडक, 2 खलाशांचा जागीच मृत्यू
Waether Update: अरबी समुद्रावर फेंगल चक्रीवादळाचा कमी दाब, 'या' जिल्ह्यांत पावसाची शक्यता:IMD
अरबी समुद्रावर फेंगल चक्रीवादळाचा कमी दाब, 'या' जिल्ह्यांत पावसाची शक्यता:IMD
ईव्हीएमच्या व्हीव्हीपॅटमध्ये तुतारीचे मत भाजपला, उत्तम जानकरांचा गंभीर आक्षेप; नेमकं काय म्हणाले?
ईव्हीएमच्या व्हीव्हीपॅटमध्ये तुतारीचे मत भाजपला, उत्तम जानकरांचा गंभीर आक्षेप; नेमकं काय म्हणाले?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 3 डिसेंबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  9 AM : 3 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMarkadwadi Voting : प्रशासनाचा विरोध डावलून आज मारकडवाडीत मतदानTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 3 डिसेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसची धुसफूस आली हमरीतुमरीवर! बंटी शेळके नाना पटोले वादात पदाधिकारीच उतरले मैदानात
काँग्रेसची धुसफूस आली हमरीतुमरीवर! बंटी शेळके नाना पटोले वादात पदाधिकारीच उतरले मैदानात
धक्कादायक! गोव्यात भारतीय नौदलाच्या पाणबुडीला मासेमारी करणाऱ्या बोटीची जोरदार धडक, 2 खलाशांचा जागीच मृत्यू
धक्कादायक! गोव्यात भारतीय नौदलाच्या पाणबुडीला मासेमारी करणाऱ्या बोटीची जोरदार धडक, 2 खलाशांचा जागीच मृत्यू
Waether Update: अरबी समुद्रावर फेंगल चक्रीवादळाचा कमी दाब, 'या' जिल्ह्यांत पावसाची शक्यता:IMD
अरबी समुद्रावर फेंगल चक्रीवादळाचा कमी दाब, 'या' जिल्ह्यांत पावसाची शक्यता:IMD
ईव्हीएमच्या व्हीव्हीपॅटमध्ये तुतारीचे मत भाजपला, उत्तम जानकरांचा गंभीर आक्षेप; नेमकं काय म्हणाले?
ईव्हीएमच्या व्हीव्हीपॅटमध्ये तुतारीचे मत भाजपला, उत्तम जानकरांचा गंभीर आक्षेप; नेमकं काय म्हणाले?
Avinash Jadhav Resignation: राज ठाकरेंनी एक फोन फिरवला अन् अविनाश जाधवांना पुन्हा कामाला लावलं, म्हणाले....
राज ठाकरेंनी एक फोन फिरवला अन् अविनाश जाधवांना पुन्हा कामाला लावलं, म्हणाले....
देशातील बड्या नेत्याला बाथरुम स्वच्छ करण्याची शिक्षा; खरकटी भांडीही घासावी लागणार, काय आहे प्रकरण?
देशातील बड्या नेत्याला बाथरुम स्वच्छ करण्याची शिक्षा; खरकटी भांडीही घासावी लागणार, काय आहे प्रकरण?
Ajit Pawar: अजित पवारांवर दिल्लीत तिष्ठत बसण्याची वेळ, अमित शाहांची भेट मिळालीच नाही, वेगळ्याच चर्चांना उधाण
अजित पवार करायला गेले एक अन् झालं भलतंच, अमित शाह नाराज? दिल्लीत जाऊन भेट मिळालीच नाही
Mahayuti : महायुतीमध्ये एकाचवेळी मानापमान आणि संशयकल्लोळ, शिंदेंच्या मनात चाललंय काय? 
महायुतीमध्ये एकाचवेळी मानापमान आणि संशयकल्लोळ, शिंदेंच्या मनात चाललंय काय? 
Embed widget