Mumbai News: कोरोना काळात BMC अधिकाऱ्यांचा पंचतारांकित हॉटेलचा खर्च कोटींचा घरात, माजी विरोधी पक्ष नेत्यांची चौकशीची मागणी
Mumbai News: मुंबई महानगरपालिकेच्या 24 वॉर्डातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे राहणे, खाण्यावर तब्बल 34 कोटी 61 लाख 11 हजार 535 रुपये खर्च केल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबई: कोरोना काळात (CoronaVirus) अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या मुंबई महानगरपालिकेचे (Mumbai Municipal Corporation) अधिकारी, कर्मचारी यांना कामाच्या ठिकाणाजवळ राहण्यासाठी पंचतारांकित व इतर हॉटेलमध्ये (Five Star Hotel) ठेवण्यात आले होते. 24 वॉर्डातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे राहणे, खाण्यावर तब्बल 34 कोटी 61 लाख 11 हजार 535 रुपये खर्च केल्याची माहिती समोर आली आहे.
कॅगकडून चौकशी होत असताना हा 34 कोटींचा प्रस्ताव प्रशासक म्हणून आयुक्तांकडून मंजूर करण्यात आला. त्यामुळे या सगळ्या व्यवहाराची चौकशी व्हावी, अशी मागणी माजी बीएमसी (BMC) विरोधी पक्ष नेत्यांकडून केली जात आहे. शिवाय या हॉटेल्सला जर प्रॉपर्टी टॅक्स (Property Tax) त्या काळात माफ करण्यात आला तर एवढा खर्च कसा झाला? असा प्रश्न सुद्धा उपस्थित करण्यात आला आहे.
असा होता प्रस्ताव आणि खोलीचे दर!
- प्रत्येक हॉटेलमधील खोलीत दोन कर्मचारी राहणार
- फाईव्ह स्टार (Five Star Hotel) हॉटेल प्रती खोली (दोन हजार अधिक कर)
- फोर स्टार हॉटेल (Four Star Hotel) (दीड हजार अधिक कर)
- थ्री स्टार हॉटेल (Three Star Hotel) ( एक हजार रुपये अधिक कर)
- नॉन स्टार हॉटेल (Non Star Hotel) (509 रुपये अधिक कर)
- एकूण झालेला खर्च -34 कोटी 61 लाख 12 हजार 535
यावर मुंबई महापालिकेने स्पष्टीकरण देत असताना सांगितले की सर्व प्रस्ताव नियमानुसार मंजूर झालेली आहे. कोरोना काळात या सगळ्या गोष्टींवर तो खर्च झालाय त्याचे प्रस्ताव मंजुरीस आल्यानंतर त्याला प्रशासक म्हणून आयुक्तांकडून मंजुरी देण्यात आली. त्यामध्ये सर्व व्यवहार पारदर्शकपणे झाला असून कॅगकडून बीएमसी कामांची चौकशी असताना कुठल्याही प्रकारची माहिती महापालिका देण्यास सहकार्य करेल असे मुंबई महानगपालिकेने म्हटले आहे.
उद्धव गटाला कोंडीत पकडण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी खेळी
मुंबई महापालिकेचं शताब्दी रुग्णालय, गोखले पुलाचं रखडलेलं काम आणि डांबर खरेदीतील कथित घोटाळयासंदर्भात चौकशी करणार असल्याची घोषणाा राज्य सरकारने केली आहे. उद्धव गटाला कोंडीत पकडण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी खेळी असल्याची चर्चा सध्या सुरू आहे.
संबंधित बातम्या :