Mumbai Cruise Drugs Case: एनसीबीच्या कारवाईनंतर आता मुंबई पोलीस सक्रिय; क्रूझ पार्टी प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची शक्यता
Mumbai Cruise Drugs Case: कोरोना संसर्गासंदर्भात महाराष्ट्रात महामारी कायद्याअंतर्गत अनेक निर्बंध आहेत. यानुसार, 5 पेक्षा जास्त लोकांच्या एकत्र येण्यासही मनाई आहे.
Mumbai Cruise Drugs Case: एनसीबीने अलीकडेच मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझवर ड्रग्ज पार्टी केल्याबद्दल अनेकांना अटक केली आहे. आता मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी सांगितले आहे की, त्यांना या क्रूझच्या कार्यक्रमाविषयी कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. या पार्टीशी संबंधित मुंबई पोलिसांकडून कोणतीही परवानगी घेण्यात आली नसल्याचेही पोलिसांचे म्हणणे आहे.
कोरोना संसर्गासंदर्भात महाराष्ट्रात महामारी कायद्याअंतर्गत अनेक निर्बंध आहेत. यानुसार, 5 पेक्षा जास्त लोकांच्या एकत्र येण्यासही मनाई आहे. सूत्रांचे म्हणणे आहे की, मुंबई पोलिस साथीच्या कायद्याचे उल्लंघन झाले की नाही याचीही चौकशी करत आहेत. आणि जर असे घडले असेल तर मुंबई पोलीस त्याची चौकशी करण्याची शक्यता आहे.
मुंबई पोलीस गुन्हा दाखल करण्याची शक्यता
या प्रकरणात जर नियम मोडल्याची बाब समोर आली तर मुंबई पोलीस त्यामध्ये कलम 188 अन्वये गुन्हा नोंदवू शकतात. मुंबई पोलिसांनी क्रूझ प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. या घटनेशी संबंधित माहिती गोळा करण्यासाठी मुंबई पोलीस क्रूझ टर्मिनलचे सीसीटीव्ही फुटेज तपासतील. पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे की ज्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्या घटनेशी संबंधित माहिती आली (Instagram) त्याचीही चौकशी केली जाईल.
आर्यनसह 8 लोकांना 7 ऑक्टोबरपर्यंत कोठडी
मुंबई पोलिसांनी शनिवारी रात्री क्रूझवर ड्रग्ज पार्टी केल्यामुळे शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह 8 जणांना ताब्यात घेतले होते. नंतर त्यांना अटक करण्यात आली. सध्या, आर्यनसह सर्व आठ जणांना 7 ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडीत पाठवण्यात आले आहे. एनसीबी या प्रकरणाची चौकशी करत आहे.
ड्रग्जसाठी बिटकॉईन, डार्कनेटचा वापर
शाहरुख खानचा मुलगा आर्यनला ज्या ड्रग्ज पार्टी प्रकरणी कोठडीची हवा खावी लागतेय. त्या प्रकरणाची व्यापी फक्त दिल्ली-मुंबईपुरती मर्यादीत नाही, तर याचे धागेदोरे आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचलेले आहेत. क्रूझवर पार्टीसाठी जे ड्रग्ज आणण्यात आलं होतं, त्यासाठी क्रिप्टोकरन्सीचा वापर करण्यात आला होता. क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी एनसीबीनं आर्यन खानसह एकूण 8 जणांना अटक केली आहे. यांच्या चौकशीदरम्यान मिळालेल्या माहितीनंतर, एनसीबीनं एका मोठ्या ड्रग्ज तस्कराला ताब्यात घेतलंय. या तस्कराच्या चौकशीनंतर ड्रग्जसाठी क्रिप्टोकरन्सीचा वापर झाल्याची माहिती मिळाली आहे.