श्वास गुदमरलेले प्रवासी काचा फोडून बाहेर, धापा टाकत थरार सांगितला, अडकलेल्या मोनोरेल मधून सुटका
Mumbai Monorail suffocating passenger broke the glass and escaped : मुंबईतील चेंबूर ते भक्तीमार्ग या मार्गावरील मोनोरेल अचानक बंद पडल्यानंतर प्रवासी तब्बल अडीच तास आतमध्ये अडकून पडले होते.

Mumbai Monorail suffocating passenger broke the glass and escaped : मुंबईतील चेंबूर ते भक्तीमार्ग या मार्गावरील मोनोरेल अचानक बंदी पडली. त्यानंतर प्रवासी तब्बल अडीच तास आतमध्ये अडकून पडले होते. श्वास गुदमरलेल्या प्रवाश्यांंवर अखेर काचा फोडून बाहेर पडण्याची वेळ आलीये. घटनास्थळावर अग्नीशामक दलाच्या मदतीने प्रवाशांना बाहेर काढण्याचं काम सुरु आहे. काही प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आलं आहे. दरम्यान, बाहेर पडल्यानंतर श्वास गुदमरलेल्या प्रवाशांनी धापा टाकत थरार सांगितलाय. प्रवाशी नेमकं काय काय म्हणाले पाहूयात..
प्रवासी म्हणाला, अडीच तास आतमध्ये अडकून पडलो होतो. सर्वकाही पॅक असल्यामुळे श्वास घेण्यास अडचण निर्माण झाली होती. आचार्य अत्रेकडून चेंबरला जायचं होतं. मात्र, गाडी मध्येच येऊन बंद पडली. दोन तासानंतर रेस्क्यू ऑपरेशन सुरु झालं आहे.
दरम्यान, सध्या हळूहळू प्रवाशांना बाहेर काढण्यास प्रशासनाने सुरुवात केली आहे. खरंतर मुंबईत अनेक जण कामावर जाण्यासाठी मोठा प्रवास करताना पाहायला मिळतात. त्यामुळे घराकडे जाण्यासाठी निघालेले अनेक प्रवासी या मोनोरेलमध्ये अडकून पडले आहेत. आपातकालीन परिस्थित काचा फोडल्यामुळे प्रवाशांना बाहेर काढण्यात यश आलं आहे. आत्तापर्यंत केवळ सहा जणांना बाहेर काढण्यात यश आलं असून बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याबाबत प्रतिक्रिया देताना म्हणाले, काही तांत्रिक कारणाने चेंबूर आणि भक्तीपार्क दरम्यान एक मोनोरेल अडकून पडली आहे. एमएमआरडीए, अग्निशमन दल आणि महापालिका अशा सर्वच यंत्रणा त्याठिकाणी पोहोचल्या आहेत. सर्व प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत आहे. त्यामुळे कुणीही काळजी करु नये, घाबरून जाऊ नये. सर्व प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात येईल. सर्वांनी संयम ठेवावा, ही माझी सर्वांना विनंती आहे. मी एमएमआरडीए आयुक्त, महापालिका आयुक्त, पोलिस आणि सर्वच यंत्रणांशी संपर्कात आहे. हा प्रकार का घडला, याचीही चौकशी करण्यात येईल.
इतर महत्त्वाच्या बातम्या























