एक्स्प्लोर
कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रोच्या दोन किमीचं भुयारीकरण पूर्ण
या मुंबईतील पहिल्या भुयारी मेट्रो मार्गाची अंमलबजावणी करणाऱ्या मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने केवळ सहा महिन्यात 2192 मीटरचं भुयारीकरण पूर्ण केलं.
मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मुंबई मेट्रो 3 चं भुयारीकरण यशस्वीरित्या पूर्ण झालं आहे. या मुंबईतील पहिल्या भुयारी मेट्रो मार्गाची अंमलबजावणी करणाऱ्या मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने केवळ सहा महिन्यात 2192 मीटरचं भुयारीकरण पूर्ण केलं.
33.5 किमी लांबी असलेल्या या पूर्ण प्रकल्पाच्या भुयारीकरणासाठी रेल कॉर्पोरेशनला 17 टनेल बोअरिंग मशिन्सची (टीबीएम्स) आवश्यकता आहे. त्यापैकी 11 मशिन्स शहरात दाखल झाल्या आहेत. आतापर्यंत आठ मशीन्सद्वारे भुयारीकरणाचं काम करण्यात येत आहे. या मशीन्सला महाराष्ट्रातील सूर्या, वैतरणा, तानसा, कृष्णा, गोदावरी, तापी आणि वैनगंगा या नद्यांची नावे देण्यात आले आहेत.
मेट्रो-3 च्या विविध टप्प्यातील भुयारीकरण
आझाद मैदान - या पॅकेज-2 मधील वैतरणा 1 आणि 2 टीबीएम्सद्वारे ग्रँट रोडपर्यंत 4.5 किमी भुयारीकरण करण्यात येणार आहे. त्यापैकी 450 मीटर भुयारीकरण पूर्ण झालं आहे.
नयानगर - या पॅकेज-4 अंतर्गत कृष्णा 1 आणि 2 या टीबीएम्सद्वारे दादर मेट्रो स्थानकापर्यंत 2.5 किमी भुयारीकरण करण्यात येणार असून त्यापैकी 1005 मीटर भुयारीकरण पूर्ण झालं आहे.
विद्यानगरी - या पॅकेज 5 अंतर्गत गोदावरी 1 आणि 2 या मशिन्सद्वारे आंतरदेशीय विमानतळ स्थानकापर्यंत 2.98 किमी भुयारीकरण करण्यात येणार आहे. सध्या या पॅकेज अंतर्गत 342 मीटर भुयारीकरण पूर्ण झालं आहे.
मरोळ नाका - या पॅकेज 7 अंतर्गत 2 टीबीएमद्वारे आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंतचं 1.2 किमी भुयारीकरण करण्यात येणार आहे. या पॅकेजमध्ये सध्या वैनगंगा 1 आणि 2 या मशीनद्वारे 395 मीटर भुयारीकरण पूर्ण झालं आहे.
15 टीबीएम्सचे कारखाना स्वीकृती परिक्षण पूर्ण झालं असून प्रकल्पाला आवश्यक असणाऱ्या सर्वच्या सर्व म्हणजे सतरा टीबीएम्स जुलैअखेर दाखल होती. त्यानंतर पॅकेजमध्ये भुयारीकरणाला प्रारंभ होणं अपेक्षित आहे. यामुळे कामाला अधिक गती मिळणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement