एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
शिवसेना आमदाराकडून हल्ल्याचा बनाव, संशयित आरोपीचा दावा
मेट्रोच्या सरकारी कामात सत्ताधारी पक्षाच्या आमदाराकडूनच कशी खंडणीची मागणी केली जाते याचा खुलासा संशयित फरार कॉन्ट्रॅक्टर महेश लोंढेने केला आहे.
मुंबई : शिवसेना आमदार तुकाराम काते यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणाला एक नवी कलाटणी मिळाली आहे. मेट्रो कारशेडच्या कामात तुकाराम कातेंनी प्रत्येक ट्रक मागे 300 रुपये खंडणी मागण्यासाठी हल्ल्याचा बनाव रचला, असा आरोप या प्रकरणातील संशयित फरार कॉन्ट्रॅक्टर महेश लोंढेने प्रथमच 'एबीपी माझा'वर केला आहे. तर मेट्रोची कंत्राटं एमएमआरडीएने गँगस्टर्सना दिल्याचा खळबळजनक दावा तुकाराम कातेंनी केला आहे. या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीत मुख्यमंत्र्यांचा महत्त्वाकांक्षी मेट्रो प्रकल्प गँगस्टर आणि खंडणीखोरांच्या विळख्यात सापडलाय का, अशी शंका उपस्थित होत आहे.
मानखुर्दच्या पट्ट्यात डीएननगर ते मंडाळा या मेट्रो 2 बी प्रकल्पाच्या कारशेडचं काम युद्धपातळीवर सुरु आहे. या प्रकल्पात अडीच हजार झोपडपट्टीधारकांचं पुनर्वसन होणार असल्याचा दावा स्थानिक शिवसेना आमदारांचा आहे. त्यामुळे स्थानिकांवर अन्याय होत असल्याची बोंब ठोकत सत्ताधारी शिवसेनेच्या आमदाराने 8 ऑक्टोबरला मोर्चा काढून मेट्रोचं काम बंद पाडलं. या रागातून 12 ऑक्टोबरच्या मध्यरात्री मेट्रोच्या कंत्राटदराने आमदारांवर तलवारीने जीवघेणा हल्ला केला, ज्यातून ते थोडक्यात बचावल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली.
आता या प्रकरणातील संशयित फरार आरोपी महेश लोंढेने समोर येऊन तुकाराम कातेंवर धक्कादायक आरोप केले आहेत. त्याने स्वेच्छेने 'एबीपी माझा'वर येऊन मेट्रोच्या सरकारी कामात सत्ताधारी पक्षाच्या आमदाराकडूनच कशी खंडणीची मागणी केली जाते याचा खुलासा केला आहे.
शिवसेना आमदार तुकाराम कातेंनी लोंढेचे सर्व आरोप फेटाळून लावले. एमएमआरडीएने मेट्रोच्या कामांचे कंत्राट दिल्लीतल्या आरसीसी कंपनीला दिलं. मात्र या कंपनीमार्फत स्थानिक गँगस्टर्सला पोसलं जात असल्याचा उलट दावा आमदार कातेंनी केला आहे. हल्लेखोरांना दोन दिवसात अटक झाली नाही, तर उपोषणाला बसण्याचा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे.
आगामी निवडणुकांच्या तोंडावर पायाभूत सुविधा उभारण्यावर फडणवीस सरकारचा जोर आहे. तर मिळेल त्या मुद्द्यांवरुन सरकारला कोंडीत पकडण्याच्या प्रयत्नात शिवसेना असते. कुरघोडीच्या या राजकारणात गुन्हेगारी फोफावते आणि विकासाच्या आड सर्वसामन्यांची लूट होते, याचं उत्तम उदाहरण मानखुर्द मधलं हे मेट्रोचं कारशेड.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement