एक्स्प्लोर

मुंबईकरांनो, रविवारच्या प्रवासाचं नियोजन आजच करा; मध्य, हार्बर रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक

Mumbai Megablock Update : मुंबईकरांनो, विकेंडच्या दिवशी घराबाहेर पडण्याचा प्लान करत असाल, तर सर्वात आधी मुंबई लोकलचं वेळापत्रक (Mumbai Local Timetable) पाहा

Mumbai Megablock Update : मुंबईकरांनो, विकेंडच्या दिवशी घराबाहेर पडण्याचा प्लान करत असाल, तर सर्वात आधी मुंबई लोकलचं वेळापत्रक (Mumbai Local Timetable) पाहा आणि त्यानंतरच बाहेर पडा. रविवार (21 जानेवारी 2024) मध्य रेल्वे (Central Railway) आणि हार्बर (harbour  Railway) मार्गांवर मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे आठवडी सुट्टीच्या दिवशी प्रवासाचं नियोजन करत असाल तर आधी वेळापत्रक पाहा आणि त्यानंतरच नियोजन करा. 

येणाऱ्या रविवारी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. मध्य रेल्वेवरील मुलुंड ते माटुंगावर ब्लॉक घेतला जाणार आहे. तर हार्बर मार्गावर कुर्ला-वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. पाहूयात नेमका मेगाब्लॉकची वेळ काय आहे... त्याबाबत सविस्तर 

मुलुंड - माटुंगा अप जलद मार्गावर सकाळी 11.05 ते दुपारी 3.55 वाजेपर्यंत

सकाळी 10.50 ते दुपारी 3.46 पर्यंत ठाणे येथून सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील सेवा मुलुंड आणि माटुंगा स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील आणि त्याच स्थानकांनुसार थांबून माटुंगा येथे अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि आपल्या गंतव्यस्थानी 15 मिनिटे उशिरा पोहोचतील. 

कुर्ला-वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 4.10वाजेपर्यंत
 
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.34 ते दुपारी 3.36 वाजेपर्यंत  वाशी/बेलापूर/पनवेलसाठी सुटणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि पनवेल/बेलापूर/वाशीहून 10.16 ते दुपारी 3.47 वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी  सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. 
 
हार्बर मार्गावरुन प्रवास करणाऱ्यासाठी दिलासा - 

ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते कुर्ला आणि पनवेल आणि वाशी दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ठाणे-वाशी/नेरूळ स्थानकावरून प्रवास करण्याची परवानगी आहे.

अभियांत्रिकी कामांसाठी मेगाब्लॉक 

दरम्यान रेल्वेकडून अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी हा मेगाब्लॉक घेण्यात आलाय. तसेच या प्रवाश्यांना देखील वेळापत्रक पाहूनच घरातून बाहेर पडण्याची विनंती रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आलीये. तसेच या दरम्यान प्रवाश्यांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल दिलगीरी देखील व्यक्त करण्यात आलीये. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
Sharad Pawar : मविआचं सरकार आल्यास रोहित पवारांवर मोठी जबाबदारी; कर्जत-जामखेडच्या सभेत शरद पवारांचे संकेत, नेमकं काय म्हणाले?
मविआचं सरकार आल्यास रोहित पवारांवर मोठी जबाबदारी; कर्जत-जामखेडच्या सभेत शरद पवारांचे संकेत, नेमकं काय म्हणाले?
Shirala Vidhan Sabha constituency : मानसिंगराव नाईक की सत्यजीत देशमुख, शिराळ्यात कोण गुलाल उधळणार? 'असं' आहे विधानसभेचं गणित
मानसिंगराव नाईक की सत्यजीत देशमुख, शिराळ्यात कोण गुलाल उधळणार? 'असं' आहे विधानसभेचं गणित
Sharad Pawar : राम शिंदेंनी 10 वर्ष काय दिवे लावले? दुष्काळी भागात स्वत:चा टोलेगंज बंगला बांधला; कर्जत जामखेडमधून शरद पवारांचा हल्लाबोल
राम शिंदेंनी 10 वर्ष काय दिवे लावले? दुष्काळी भागात स्वत:चा टोलेगंज बंगला बांधला; कर्जत जामखेडमधून शरद पवारांचा हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pratibha Pawar Banner : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगलं हुतंय', प्रतिभाताई पवारांच्या हाती फलकVinod Tawde PC : राहुल गांधींच्या टीकेला तावडेंकडून प्रत्युत्तर; राजीव गांधी ते अदानी काय म्हणाले?Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 1 PM :18 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 02 PM : 18 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
Sharad Pawar : मविआचं सरकार आल्यास रोहित पवारांवर मोठी जबाबदारी; कर्जत-जामखेडच्या सभेत शरद पवारांचे संकेत, नेमकं काय म्हणाले?
मविआचं सरकार आल्यास रोहित पवारांवर मोठी जबाबदारी; कर्जत-जामखेडच्या सभेत शरद पवारांचे संकेत, नेमकं काय म्हणाले?
Shirala Vidhan Sabha constituency : मानसिंगराव नाईक की सत्यजीत देशमुख, शिराळ्यात कोण गुलाल उधळणार? 'असं' आहे विधानसभेचं गणित
मानसिंगराव नाईक की सत्यजीत देशमुख, शिराळ्यात कोण गुलाल उधळणार? 'असं' आहे विधानसभेचं गणित
Sharad Pawar : राम शिंदेंनी 10 वर्ष काय दिवे लावले? दुष्काळी भागात स्वत:चा टोलेगंज बंगला बांधला; कर्जत जामखेडमधून शरद पवारांचा हल्लाबोल
राम शिंदेंनी 10 वर्ष काय दिवे लावले? दुष्काळी भागात स्वत:चा टोलेगंज बंगला बांधला; कर्जत जामखेडमधून शरद पवारांचा हल्लाबोल
''आपल्या राजाच्या वडिलांच्या नावाची बदनामी नको; शहाजी नाव काढून खोके पाटील ठेवा, कोर्टात जावा''
''आपल्या राजाच्या वडिलांच्या नावाची बदनामी नको; शहाजी नाव काढून खोके पाटील ठेवा, कोर्टात जावा''
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर दक्षिणमध्ये भाजप हॅटट्रीक साधणार की ठाकरेंचा उमेदवार गड जिंकणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर दक्षिणमध्ये भाजप हॅटट्रीक साधणार की ठाकरेंचा उमेदवार गड जिंकणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर मध्यमधून काँग्रेसची जादू चालणार की आडम मास्तरांना मताधिक्य मिळणार? कोण मारणार बाजी
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर मध्यमधून काँग्रेसची जादू चालणार की आडम मास्तरांना मताधिक्य मिळणार? कोण मारणार बाजी
Rohit Pawar : शरद पवार राजकारणातील वस्तादांचे वस्ताद,  रोहित पवारांचं आजोबांसमोर धडाकेबाज भाषण, राम शिंदेंवर डागली तोफ
शरद पवार राजकारणातील वस्तादांचे वस्ताद, रोहित पवारांचं आजोबांसमोर धडाकेबाज भाषण, राम शिंदेंवर डागली तोफ
Embed widget