एक्स्प्लोर
मध्य आणि हार्बर मार्गावर आज मेगाब्लॉक
मध्य आणि हार्बर मार्गावरील अभियांत्रिकी कामांसाठी आज मध्य रेल्वेकडून मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. मध्य रेल्वे मार्गावरील कल्याण ते ठाणे स्थानकादरम्यान जलद मार्गावर, तर हार्बर मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनन्स ते चुनाभट्टी आणि वांद्रे स्थानकादरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

फाईल फोटो
मुंबई : मध्य आणि हार्बर मार्गावरील अभियांत्रिकी कामांसाठी आज मध्य रेल्वेकडून मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. मध्य रेल्वे मार्गावरील कल्याण ते ठाणे स्थानकादरम्यान जलद मार्गावर, तर हार्बर मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनन्स ते चुनाभट्टी आणि वांद्रे स्थानकादरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वे मार्गावरील रुळांच्या दुरुस्ती व देखभालीसाठी कल्याण ते ठाणे स्थानकादरम्यान जलद मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी 11.15 ते दुपारी 4.15 दरम्यान हा मेगाब्लॉक घेण्यात येईल.त्यामुळे मेगाब्लॉक काळात जलद मार्गावरील लोकल फेऱ्या ठाण्यानंतर डाऊन धिम्या मार्गावरुन चालविण्यात येणार आहेत. दुसरीकडे हार्बर मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी आणि वांद्रे स्थानकादरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी 11.40 ते दुपारी 4.40 दरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येईल. या मेगाब्लॉक काळात छत्रपती शिवाजी टर्मिन्स येथून पनवेल आणि अंधेरीकडे जाणाऱ्या सर्व लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. दरम्यान कुर्ला ते पनवेलदरम्यान विशेष गाडय़ा चालविण्यात येणार आहेत.
Before You Go
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















