एक्स्प्लोर
हिंदू धर्म आवडत नसल्याचं सांगून मुंबईतून तरुण बेपत्ता
'मला हिंदू धर्म आवडत नाही, मी मुस्लिम धर्म स्वीकारला आहे' असं फोनवर शेवटचं सांगितल्यावर सर्व संपर्क तोडत जगदीश दलराम परिहार हा तरुण बेपत्ता झाला आहे.

मुंबई : मुंबईतल्या मुलुंडमधील 23 वर्षीय तरुण मंगळवारपासून बेपत्ता आहे. 'मला हिंदू धर्म आवडत नाही, मी मुस्लिम धर्म स्वीकारला आहे' असं फोनवर शेवटचं सांगितल्यावर सर्व संपर्क तोडत जगदीश दलराम परिहार हा तरुण बेपत्ता झाला आहे. जगदीश पाकिस्तान किंवा आखाती देशात पळून गेल्याच्या शक्यतेने सध्या खळबळ उडाली आहे. जगदीश मुलुंड कॉलनी परिसरात राहतो. गेल्या दोन दिवसांपासून तो बेपत्ता असल्याची तक्रार त्याच्या नातेवाईकांनी मंगळवारी मुलुंड पोलिस ठाण्यात दिली. तो पाकिस्तानात पळून गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे. वाणिज्य शाखेत शेवटच्या वर्षात जगदीश शिकत आहे. परंतु गेलं वर्षभर तो फेसबुकवर एका पाकिस्तानी तरुणीच्या संपर्कात होता. याबाबत त्याच्या कुटुंबाने वारंवार त्याला हटकलं होतं. परंतु तरीही तो या तरुणीशी फेसबुक आणि इतर सोशल मीडियावरुन संपर्कात होता. दोन दिवसांपासून त्याने आपल्या बँक अकाऊंटमधून काही रक्कमही काढून घेतली होती. अखेर कालपासून तो बेपत्ता झाला आहे. त्याचं शेवटचे संपर्क ठिकाण हे मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ असल्याचं समजतं. इथूनच त्याने आपला भाऊ भावेशला शेवटचा फोन केला आणि मला हिंदू धर्म आवडत नाही, मी मुस्लिम धर्म स्वीकारला असून मला संपर्क करु नये, असं सांगितलं. जगदीशने सोबत स्वतःचे सर्व कागदपत्र आणि आवश्यक साहित्यही नेले आहे. सध्या मुलुंड पोलिसांसह दहशतवाद विरोधी पथकही या घटनेचा तपास करत आहेत. सध्या जगदीशने स्वतःचं अकाऊंटही फेसबुकवरुन डिलीट केल्याने पोलिसांना या तपासात मोठ्या अडचणी येत आहेत. परंतु या तरुणाच्या बेपत्ता होण्याला पाकिस्तानचा संदर्भ असल्याने त्याचं गांभीर्य वाढलं आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
नागपूर
राजकारण
महाराष्ट्र























