Mumbai Local Train death: लोकल ट्रेनमधून उलट्या बाजूला उडी मारली अन् घात झाला, लोखंडी कुंपण मानेत शिरलं, प्रवाशाने जागेवरच जीव सोडला
Mumbai Local Train Accident: पश्चिम रेल्वेमार्गावरील मुंबई सेंट्रल स्थानकात बुधवारी सकाळी एक विचित्र अपघात झाला. यामध्ये 28 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे.

Mumbai Train Accident News: मुंबईच्या पश्चिम रेल्वे मार्गावर झालेल्या अपघातात एका 27 वर्षीय तरुणाचा भयंकर पद्धतीने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. हा तरुण मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकात (Mumbai Central) ट्रेन थांबल्यानंतर फलाट असलेल्या विरुद्ध दिशेला ट्रेनमधून (Mumbai Local Train) उतरण्याचा प्रयत्न करत होता. या प्रयत्नात तो दोन रेल्वे ट्रॅकमध्ये असणाऱ्या लोखंडी पट्ट्यांच्या कुंपणावर पडला. त्याची मान नेमकी लोखंडी पट्ट्यांमध्ये अडकली. यामुळे त्याला गंभीर दुखापत होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. मुंबई सेंट्रल स्थानकातील फलाट क्रमांक चारनजीक बुधवारी सकाळी हा प्रकार घडला. (Western Railway News)
रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी 9 वाजून 44 मिनिटांनी एक प्रवाशी मुंबई सेंट्रल स्थानकातील लोखंडी सुरक्षा जाळीला लटकलेल्या अवस्थेत दिसून आला. या घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी आणि स्थानक व्यवस्थापक या प्रवाशाजवळ गेले. बऱ्याच प्रयत्नानंतर या तरुणाची लोखंडी कुंपणाच्या पट्ट्यांमध्ये फसलेली मान मोकळी करुन त्याला खाली उतरवण्यात आले. यानंतर त्याला तातडीने रुग्णवाहिकेने नायर रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या तरुणाच्या खिशात एक आधार कार्ड मिळाले. त्यावर ढिला राजेश हमिरा भाई असे नाव होते. त्यावरुन संबंधित प्रवाशाची ओळख पटवण्यात आली. काही प्रवाशांच्या दाव्यानुसार, हा तरुण एका ट्रेनमधून दुसऱ्या ट्रेनमध्ये उडी मारत असताना खाली पडला. मात्र, रेल्वे अधिकाऱ्यांनी तो ट्रेनमधून उतरताना लोखंडी कुंपणावर पडल्याचे सांगितले आहे.
Local Train Accident: उडी मारल्यानंतर मान लोखंडी कुंपणात अडकली, तडफडत जीव सोडला
एका प्रत्यदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, ढिला राजेश हमिरा भाई तो असलेल्या लोकल ट्रेनमधून प्रवास करत होता. ट्रेन मुंबई सेंट्रल स्थानकात थांबली तेव्हा राजेश फलाटाच्या बाजूला न उतरता विरुद्ध दिशेने ट्रेनमधून उतरायला गेला. मात्र, त्याचा अंदाज चुकला आणि त्याची मान लोखंडी कुंपणाच्या पट्ट्यांमध्ये अडकली. लोखंडी पट्टी मानेत घुसल्यामुळे त्याला मोठी जखम झाली होती. ही दुखापत गंभीर असल्याने राजेशने तडफडत प्राण सोडला. राजेश ट्रेनमधून फलाटाच्या विरुद्ध बाजूने उतरण्याचा प्रयत्न का करत होता, याचे कारण कळू शकलेले नाही. प्राथमिक माहितीनुसार, मृत तरुण हा जोगेश्वरीत वास्तव्याला होता.
आणखी वाचा
मुंबईच्या नामांकित मॉलमध्ये फिरायला गेला, अचानक तिसऱ्या मजल्यावरुन उडी टाकून तरुणाने आयुष्य संपवलं





















