एक्स्प्लोर
लोकल 20 ते 25 मिनिटं उशिरा, पश्चिम रेल्वे विस्कळीत
सांताक्रूझ-विलेपार्ले स्टेशनदरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला आहे.
मुंबई : मुंबईतील पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकलची वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे ऐन पिक अवरच्या तोंडावर रेल्वेच्या वेळापत्रकाचा पुरता बोजवारा उडाल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला आहे.
सांताक्रूझ-विलेपार्ले स्टेशनदरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला आहे. परिणामी चर्चगेट आणि विरारच्या दिशेने जाणाऱ्या जलद आणि धीम्या मार्गावरील गाड्या 20 ते 25 मिनिटं उशिराने धावत आहेत.
सांताक्रूझ-विलेपार्लेदरम्यान, गाड्या एकामागोमाग उभ्या आहेत. त्यामुळे ऑफिसला जाणारे मुंबईकर खोळंबळे आहेत. दरम्यान, सिग्नल यंत्रणेतील बिघाड दुरुस्त करण्याचं काम सुरु असल्याची माहिती, रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement