एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पश्चिम, मध्य आणि हार्बर मार्गांवर आज मेगाब्लॉक
रेल्वेच्या अभियांत्रिकी कामांसाठी आज मध्य, हार्बर आणि पश्चिम मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.
मुंबई : पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकादरम्यान सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 वाजेपर्यंत अप आणि डाऊन धिम्या मार्गावर जम्बो ब्लॉक असेल. याशिवाय मध्य रेल्वेच्या मुलुंड ते माटुंगा या स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तर हार्बर मार्गावरील सीएसएसटी ते चुनाभट्टी/ वांद्रे स्थानका दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे.
पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकादरम्यान रविवारी सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 वाजेपर्यंत अप आणि डाऊन धिम्या मार्गावर जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वे मार्गावरील सर्व लोकल जलद मार्गावरून धावतील. तर धिम्या मार्गावरील काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.
तर मध्य मार्गावर मुलुंड ते माटुंगा अप धिम्या मार्गावर सकाळी 10.37 ते दुपारी 4.02 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या मेगाब्लॉक काळात ठाण्याहून सुटणाऱ्या अप धिम्या मार्गावरुन धावणाऱ्या सर्व उपनगरीय लोकल मुलुंड आणि माटुंगा स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळविण्यात येणार आहेत. या सर्व गाड्या मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव स्थानकादरम्यान थांबा देण्यात आला आहे.
तर कल्याणहून सकाळी 11.04 ते दुपारी 3.06 वाजेपर्यंतच्या काळात सुटणाऱ्या जलद लोकल दिवा, भांडुप, मुलुंड, विक्रोळी, घाटकोपर आणि कुर्ला या स्थानकांवर थांबतील.
याशिवाय, हार्बर रेल्वेमार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी/ वांद्रे दरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर सकाळी 11.10 ते दुपारी 4.40 वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉक काळात हार्बर रेल्वेमार्गावरील सीएसएमटी/वडाळा रोड येथून सकाळी 11.34 ते दुपारी 4.47 वाजेपर्यंत वाशी / बेलापूर/ पनवेल येथे जाणाऱ्या लोकल, तसेच सीएसएमटी येथून सकाळी 9.56 ते दुपारी 4.43 वाजेपर्यंत वांद्रे/अंधेरीकडे जाणाऱ्या सर्व लोकल रद्द करण्यात आल्या आहेत.
हार्बर मार्गावरील मेगाब्लॉक काळात कुर्ला स्थानकाच्या प्टॅलफॉर्म नंबर आठवरुन कुर्ला-पनवेल विशेष लोकल फेऱ्या चालविण्यात येतील.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
निवडणूक
Advertisement