एक्स्प्लोर

मुंबईच्या अंधेरीमध्ये Hit And Run; सायकलिंग करणाऱ्या दोन तरुणांना टेम्पोची धडक; एकाचा मृत्यू एक गंभीर जखमी

अंधेरी उड्डाणपुलावरून खाली पडल्याने जागेवरच मृत्यू झाला.  तर अमन यादव हा तरुण गंभीर जखमी झाला आहे याच्यावर जवळच रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे.

मुंबई :  पुण्यातील कल्याणीनगर पोर्शे अपघाताच्या (Porsche Car Accident)  घटनेनंतर अवघा महाराष्ट्र हळहळला. ती घटना ताजी असताना आता मुंबईतील   अंधेरीमध्ये हिट अॅन्ड रनची घटना समोर आली आहे. मॉर्निंग वॉकला गेलेल्या दोन तरुणांना भरधाव वेगाने जात असलेल्या बोलेरो पिकअपने धडक दिली आहे. या धडकेत  एक तरुणांचा जागेवरच मृत्यू तर दुसरा तरुण गंभीर जखमी त्याच्यावर जवळील रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. अपघातानंतर पोलिसांनी ड्रायव्हर बदलल्याचा गंभीर आरोप जखमीच्या वडिलांनी केला आहे. 

या अपघातानंतर  जखमी तरुण अमन यादव यांचे वडील अक्षय कुमार यादव यांनी पोलिसांवर गंभीर आरोप लावला आहे.  अक्षय कुमार यादव यांनी पोलिसांवर आरोप लावला आहे पोलिसांनी आरोपी ड्रायव्हरला बदलला आहे का? पाच  दिवसानंतर आरोपीला अटक केल्यामुळे ब्लड सॅम्पलमध्ये दारूचे सेवन केले आहे की नाही  हे कसे माहिती पडणार आहे?  असा गंभीर आरोप  जखमी तरूणाच्या वडिलांनी केला आहे.  बोलेरो पिकप ड्रायव्हर हा संध्याकाळी दारुचे सेवन करतो अशी कबुली त्याने पोलिसांसमोर दिली आहे. मात्र पाच दिवसानंतर आरोपीला अटक केल्यामुळे आरोपी हा दारुचे सेवन करून गाडी  चालवत होता का?  या संदर्भात कशी माहिती मिळेल असा प्रश्न जखमी तरुण अमन यादव यांच्या वडिलांनी उपस्थित केला आहेत.

अंधेरी उड्डाणपुलावरून खाली पडल्याने जागेवरच मृत्यू

 कॉलेजमध्ये शिकणारे तरुण 29 जून रोजी  सकाळी 5:45 सहाच्या सुमारास  अंधेरी पंप हाउस परिसरातून पश्चिम द्रुतगती महामार्गावर गुंदावली मेट्रोस्टेशन जवळ पोहचले. मागून भरधाव वेगाने बोलोरो पिकप कारने धडक दिल्यामुळे एक तरुण गंभीर जखमी तर दुसऱ्या तरुणाच्या जागेवरच मृत्यू झाला आहे.  विवेक यादव वय 18 वर्षे आणि अमन यादव वय 19 वर्ष असा दोन्ही तरुणांचा नाव आहे.  या अपघातात विवेक यादव अंधेरी उड्डाणपुलावरून खाली पडल्याने जागेवरच मृत्यू झाला.  तर अमन यादव हा तरुण गंभीर जखमी झाला आहे याच्यावर जवळच रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे.

कारचालकाच्या विरोधात गुन्हा  दाखल

घटनेची माहिती मिळताच अंधेरी पोलिसांनी धाव घेऊन कारचालकाच्या विरोधात गुन्हा  दाखल केला.  सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपी कारचालकाला चार दिवसानंतर अटक केली आहे. अटक आरोपीचे नाव धनंजय राय वय 30 वर्ष असून आरोपी बोलोरो पिकप ट्रान्सपोर्ट गाडी चालवतो. सध्या अंधेरी पोलिसांनी बोलोरो पिकप गाडीला आपल्या ताब्यात घेऊन या संदर्भात अधिक तपास करत आहेत. मात्र या अपघाताचा घटना घडल्यामुळे मुंबईत मोठा संख्या मध्ये मॉर्निंग वॉक आणि सायकलिंग करणारे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

हे ही वाचा :

पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणी अपडेट, अखेर दोन महिन्यांनी लाडोबाने 300 शब्दांचा लिहिला निबंध!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mamata Bannerjee: मी दोन तास वाट पाहिली, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास तयार; ममता बॅनर्जींकडून जनतेची माफी
मी दोन तास वाट पाहिली, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास तयार; ममता बॅनर्जींकडून जनतेची माफी
तृतीयपंथीयांचा धुमधडाक्यात गणपती बाप्पा; भक्तीगीतांसह गणरायाकडे केलीय खास प्रार्थना
तृतीयपंथीयांचा धुमधडाक्यात गणपती बाप्पा; भक्तीगीतांसह गणरायाकडे केलीय खास प्रार्थना
Sanjay Raut: सोलापुरातील जागेवर काँग्रेसनंतर शिवसेनेचाही दावा; संजय राऊतांचा पोलिसांनाही गर्भीत इशारा
सोलापुरातील जागेवर काँग्रेसनंतर शिवसेनेचाही दावा; संजय राऊतांचा पोलिसांनाही गर्भीत इशारा
Ajit Pawar : अजित पवारांचा महायुतीतील मित्र पक्षांना इशारा, म्हणाले; समाजात धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी
अजित पवारांचा महायुतीतील मित्र पक्षांना इशारा, म्हणाले; समाजात धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 12 Sep 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सKavita Raut : धावपटू कविता राऊत मिळालेल्या नियुक्तीवर नाराजSpecial Report Nitesh Rane : मुस्लिमांसोबत व्यवहार करू नका, नितेश राणेंनी गरळ ओकलीSpecial Report PM Modi : पंतप्रधान मोदींनी घेतलं सरन्यायाधीशांच्या घरच्या बाप्पाचं दर्शन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mamata Bannerjee: मी दोन तास वाट पाहिली, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास तयार; ममता बॅनर्जींकडून जनतेची माफी
मी दोन तास वाट पाहिली, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास तयार; ममता बॅनर्जींकडून जनतेची माफी
तृतीयपंथीयांचा धुमधडाक्यात गणपती बाप्पा; भक्तीगीतांसह गणरायाकडे केलीय खास प्रार्थना
तृतीयपंथीयांचा धुमधडाक्यात गणपती बाप्पा; भक्तीगीतांसह गणरायाकडे केलीय खास प्रार्थना
Sanjay Raut: सोलापुरातील जागेवर काँग्रेसनंतर शिवसेनेचाही दावा; संजय राऊतांचा पोलिसांनाही गर्भीत इशारा
सोलापुरातील जागेवर काँग्रेसनंतर शिवसेनेचाही दावा; संजय राऊतांचा पोलिसांनाही गर्भीत इशारा
Ajit Pawar : अजित पवारांचा महायुतीतील मित्र पक्षांना इशारा, म्हणाले; समाजात धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी
अजित पवारांचा महायुतीतील मित्र पक्षांना इशारा, म्हणाले; समाजात धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी
Ganeshotsav : जय देव जय देव जय मंगलमूर्ती; वर्षा निवासस्थानी क्लॉस श्वाब यांनी सपत्नीक केली बाप्पांची आरती
जय देव जय देव जय मंगलमूर्ती; वर्षा निवासस्थानी क्लॉस श्वाब यांनी सपत्नीक केली बाप्पांची आरती
Sitaram Yechury आयुष्यभर कष्टकऱ्यांसाठी झिजले, मृत्यूनतंरही समाजाच्या कामी आले; सिताराम येचुरींचे 'देहदान'
आयुष्यभर कष्टकऱ्यांसाठी झिजले, मृत्यूनतंरही समाजाच्या कामी आले; सिताराम येचुरींचे 'देहदान'
पगारवाढ 2020 नाही, तर 2024 पासून मिळणार, एसटी कामगारांना फसवलं; श्रीरंग बरगेंकडून संताप
पगारवाढ 2020 नाही, तर 2024 पासून मिळणार, एसटी कामगारांना फसवलं; श्रीरंग बरगेंकडून संताप
निरोप कॉम्रेड...  कामगार, शेतकऱ्यांचा आवाज हरपला; येचुरींच्या निधनानंतर शरद पवार, राहुल गांधींकडून शोक
निरोप कॉम्रेड... कामगार, शेतकऱ्यांचा आवाज हरपला; येचुरींच्या निधनानंतर शरद पवार, राहुल गांधींकडून शोक
Embed widget